IPL Trophy Sanskrit shloka: आयपीएलचा १६ वा हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे. कारण या स्पर्धेतील अंतिम सामन्यासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे आज ही ट्रॉफी कोण पटकावणार ते निश्चित होईल. पहिल्या सीझनची ट्रॉफी सोडली तर आयपीएल ट्रॉफी तेव्हापासून आजतागायत एकाच स्वरुपाची आहे. ही ट्रॉफी जगातील सर्व मोठ्या क्रीडा स्पर्धांच्या ट्रॉफींइतकीच खास आहे. तसेच आज आम्ही या ट्रॉफीवर काय लिहिलं असतं, ते सांगणार आहोत, जे सहसा या ट्रॉफीच्या ब्राइटनेसमुळे चाहत्यांना नीट वाचता येत नाही.
ट्रॉफीवर संस्कृतमध्ये एक श्लोक लिहिलेला आहे –
आयपीएल ट्रॉफीचा रंग सोनेरी आहे, तरी ती कोणत्या धातूची आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण ही ट्रॉफी खूप महागडी आहे हे निश्चित. या ट्रॉफीची सर्वात मनोरंजक आणि खास गोष्ट म्हणजे त्यावर लिहिलेले काही शब्द आहेत. हा संस्कृतमध्ये लिहिलेला एक श्लोक आहे, जो थेट या स्पर्धेशी आणि या स्पर्धेच्या उद्देशाशी संबंधित आहे.
प्रतिभा आणि संधी यांचा संगम –
या सुवर्ण आयपीएल ट्रॉफीवर संस्कृतमध्ये लिहिले आहे, ‘यत्र प्रतिभा अवसरा प्राप्नोतिही’. याचा अर्थ जिथे प्रतिभेला संधी मिळते. त्याच वेळी, आतापर्यंत ही विजेतेपदे जिंकलेल्या सर्व संघांची नावे देखील ट्रॉफीच्या खाली नमूद केली आहेत.
हे आयपीएलचे ब्रीदवाक्यही आहे. साहजिकच, आयपीएलने गेल्या काही वर्षांमध्ये क्रिकेटच्या प्रतिभावन खेळाडूंना येथे येण्याची आणि त्यांचे कौशल्य दाखवण्याची संधी दिली आहे. विशेष म्हणजे, सर्वच क्रिकेटपटू आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्तरावर पोहोचत नाहीत, परंतु आयपीएलमध्ये सहभागी झाल्यानंतर त्यांना त्यांची प्रतिभा दाखवण्याचा मार्ग मिळाला. त्याद्वारे राष्ट्रीय संघासाठी खेळण्याची संधी देखील निर्माण होत आहेत.
हेही वाचा – IPL 2023: केकेआर कर्णधारपदाच्या शर्यतीत सुनील नरेनसह ‘या’ भारतीय खेळाडूचे आघाडीवर, दोन दिवसात होणार घोषणा
पहिला सामना चेन्नई विरुद्ध गुजरात संघात होणार –
आयपीएलमधून अनेक देशी-विदेशी खेळाडूंना ओळख मिळाली आहे. २००८ मध्ये आयपीएल स्पर्धेला सुरूवात झाल्यापासून आतापर्यंत या स्पर्धेने नवीन प्रतिभावन खेळाडूंना पंख लावण्याचे काम केले आहे. त्याचबरोबर ही स्पर्धा खेळाडूंसाठी उत्पन्नाचा एक अद्भुत स्रोत बनली आहे. दरम्यान आयपीएलच्या १६ व्या हंगामातील अंतिम सामना नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद येथे खेळला जाणार आहे. हा समारोपाचा सामना गुजरात जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज संघात होणार आहे. यामधील गुजरात संघ हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली आणि चेन्नई संघ धोनीच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरेल.