Do You Know White City Of India : भारत हा विविध परंपरांचा देश आहे. येथील अनेक शहरांची नावे त्यांच्या समृद्ध वारसा किंवा संस्कृतीवरून देण्यात आली आहेत. अशी काही शहरे आहेत, ज्यांची नावे त्यांच्या वास्तुकलेवर आधारित आहेत. उदाहरणार्थ, ‘जयपूरला गुलाबी शहर’ म्हटले जाते, कारण तेथील इमारती बहुतेक गुलाबी रंगात रंगवलेल्या असतात. अशाच कारणांमुळे मध्य प्रदेशातील ‘बद्री नगर शहराला रेड सिटी’ तर ‘जोधपूरला ब्लू सिटी’ आणि ‘राजस्थानमधील कालीबंगा हे ब्लॅक सिटी’ म्हणून ओळखले जाते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अशातच एक शहरदेखील आहे, ज्याला व्हाईट सिटी (White City Of India) म्हणून ओळखले जाते. तर तुम्ही या शहराचा अंदाज लावू शकता का? नाही… तर हे राजस्थानच्या दक्षिण भागात असलेले उदयपूर शहर आहे. हे शहर तलाव, सुंदर राजवाड्यांसाठी ओळखले जाते. इथल्या अनेक इमारती पांढऱ्या संगमरवरी दगडाने बनवलेल्या आहेत, त्यामुळेच वरून पाहिल्यावर हे शहर संपूर्ण पांढऱ्या रंगाचे दिसते.

हेही वाचा…Pan Card For Minor :१८ वर्ष पूर्ण होण्याआधी काढू शकता पॅन कार्ड, फक्त ‘ही’ कागदपत्रे लागणार; जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस…

व्हेनिस ऑफ द इस्ट

उदयपूरची स्थापना १५५९ मध्ये राजपूतांच्या सिसोदिया कुळातील महाराणा उदय सिंग यांनी केली होती. शाही राजवाडे, सुंदर तलावांमुळे याला व्हेनिस ऑफ द इस्ट (Venice of the East) असेही म्हणतात. दरवर्षी देश-विदेशातून येथे हजारो पर्यटक भेट देण्यासाठी येतात आणि शहराचे सौंदर्य पाहून मंत्रमुग्ध होतात. भारतातील प्रसिद्ध सिटी पॅलेसदेखील येथे आहे, ज्याला उदयपूर सिटी पॅलेस असेही म्हटले जाते. आजही महाराणा प्रताप यांचे वंशज लक्ष्यराज सिंह मेवाड हे आपल्या कुटुंबासह उदयपूर सिटी पॅलेसमध्ये राहतात.

प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे नेते राघव चड्ढा यांनी याच शहरात लग्न केल्यामुळे राजस्थानची व्हाईट सिटी (White City Of India) पुन्हा एकदा चर्चेत आली होती. त्यांचा विवाह उदयपूरच्या लीला पॅलेसमध्ये पार पडला होता. तसेच उदयपूरमध्ये सिटी पॅलेस, जो पिचोला तलावाच्या काठावर स्थित आहे. प्रतिष्ठित लेक पॅलेस, जगमंदिर इंडो-आर्यन जगदीश मंदिर, सहेलियों की बारी किंवा मेडन्सचे गार्डन, सज्जनगढ पॅलेस किंवा मान्सून पॅलेस आणि जयसमंद तलाव, ढेबर तलाव आदी अनेक लोकप्रिय स्थळे इथे आहेत.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: White city of india it is udaipur located in the southern part of rajasthan known for its beautiful lakes and royal palaces asp