मानवी इतिहासात अशा काही भव्य दिव्य वास्तू आहेत की, ज्या नेमक्या कोणी बांधल्या असाव्यात यावरून नेहमीच चर्चा आणि वादविवाद होताना दिसतात. त्याच यादीतलं गाजणार नाव म्हणजे इजिप्तमधले पिरॅमिडस्. आधुनिक जगातील उंच इमारती बांधल्या जाण्यापूर्वी इजिप्तचे पिरॅमिडस् हे जगातील सर्वात उंच वास्तू म्हणून ओळखले जात होते. जवळपास ४५०० हजार वर्षांपूर्वी या पिरॅमिडची रचना करण्यात आली होती. त्यामुळेच इजिप्तमधले पिरॅमिड हे प्राचीन जगातलं एक आश्चर्य मानल जात. कोणतीही आधुनिक यंत्रसामग्री हाताशी नसताना केवळ मानवी श्रमशक्तीच्या मदतीने या भव्य वास्तूचं बांधकाम झालेलं आहे. त्यामुळे या पिरॅमिडच्या बांधकामाविषयी ते कोणी आणि कसे बांधले असावेत असे प्रश्न पडतात. तब्बल ४५०० हजार वर्षांपूर्वी अशी कोणती शक्ती, तंत्रज्ञान अस्तित्त्वात होते? ज्याच्या मदतीने या वास्तू बांधल्या गेल्या? किंवा खरच एलियन्ससारख्या परग्रहवासियांनी तर या वास्तू बांधल्या नाहीत ना? हे जाणून घेण नक्कीच माहितीपूर्ण ठराव.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अधिक वाचा: विश्लेषण : इजिप्तमधील पिरॅमिड्सचा भारताशी काही संबंध आहे का?

परग्रहवासियांना श्रेय का दिल जात? Who built the pyramids in Egypt?

पिरॅमिडच्या बांधकामासाठी टनवारी वजन असलेले दगड निरनिराळ्या ठिकाणाहून बांधकामाच्या जागी आणले गेले होते, इतकच नाही तर त्यांना निरनिराळे आकार देऊन, दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या उंचीवर ते चढवण्यात आले होते, त्यांची योग्य भौमितिक रचनाबंधनात प्रतिष्ठापना करण्यात आली होती, एक ना दोन, अनेक कसोटी पाहणारी काम या वास्तूच्या बांधकामात होती. एवढी काम करायची म्हणजे तितकच मनुष्यबळ ही लागल असेल. म्हणूनच काही जणांनी ती अमानवी कामगिरी मानून, ती परग्रहवासियांनी पृथ्वीला दिलेली देणगी आहे असच मानल आहे.

तर काही अभ्यासकांनी या कामासाठी त्या काळच्या इजिप्तच्या राजांनी असंख्य गुलामांना वेठीला धरलं होत असा सिद्धांत मांडला आहे. तर काही पुरातत्त्व अभ्यासकांनी ग्रामीण रोजगार योजनेतून ही बांधकाम साकारली गेली असावीत असा अंदाज व्यक्त केला आहे.

पिरॅमिड बांधकामाच गणित

इजिप्तमध्ये सर्वात मोठा खुफुचा पिरॅमिड आहे. त्याची उंची १४७ मीटर असून पायाच्या प्रत्येक बाजूची लांबी २३० मीटर आहे. म्हणजे एकूण घनफळ झालं २६ लाख घनमीटर. त्याचं वजन ७ लाख टन भरेल. खुफुची राजवट २३ वर्ष चालली होती. त्या संपूर्ण कालावधीत हे बांधकाम चालल होत अस गृहीत धरल्यास दर दिवशी सरासरी ३१० घनमीटर बांधकाम झाल असाव अस गणित डॉ. बाळ फोंडके यांनी आपल्या कुठ? या पुस्तकात मांडल आहे. ते म्हणतात, ही झाली सरासरी. कारण सुरुवातीला कमी उंचीवर बांधकाम चालू असताना दगड वर चढवण्यासाठी कमी श्रम खर्ची पडले असणार आणि प्रत्यक्ष रचनाबंध आकारास आणण्यासाठी जास्त. पण जसजसं बांधकाम पूर्णत्त्वाकडे जाऊ लागल तसतशी बांधकामाची उंची वाढत गेली असणार. आणि मग त्या उंचीवर दगड चढवण्यात अधिक वेळ आणि श्रम कमी आले असणार. एका दिवसात माणूस किती श्रम करू शकतो. याच गणित शरीरशास्त्रज्ञांनी केंव्हाच केलेलं आहे. ते ध्यानात घेतल्यास सरासरी ३१० घनमीटरच बांधकाम करण्यासाठी एकूण किती श्रम खर्च करण भाग होत आणि त्यासाठी किती मजुरांनी काम करण आवश्यक होत याच त्रैराशिक (triarchic) वैज्ञानिकांनी मांडलं आहे. त्यानुसार साधारण ९०० ते १४०० मजुरांनी या बांधकामात भाग घेतला असावा, असं अनुमान त्यांनी काढलं आहे. त्यामुळे या बांधकामात प्रशिक्षित मजूर, कामगार काम करत होते हे सिद्ध होत.

अधिक वाचा: प्राचीन इजिप्शियन लोकांनी मेंदूच्या कर्करोगावर शोधला होता उपचार; नवीन संशोधन नेमके काय सांगते?

कुशल कारागिरांची किमया

२०१० साली इजिप्तमध्ये पुरातत्त्ववेत्त्यांना खुफुच्या पिरामिड्सजवळ अशा कारागीर-कामगार  वस्तीच्या खुणा मिळाल्या आहेत. त्यामुळे कुशल कामगारांनीच पिरॅमिडच बांधकाम केलं, याविषयी शंका राहिल्या नाहीत.  

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who built the pyramids in egypt 4500 years ago svs
Show comments