New Year 2025 : घड्याळातले दोन्ही काटे १२ वर येऊन थांबले आणि शहरभर ‘हॅप्पी न्यू इअर’चा एकच जल्लोष झाला. २०२५ चे नव्या उत्साहात आणि जल्लोषात स्वागत झाले, पण तुम्हाला माहित आहे का? की जेव्हा आपण ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री १२ वाजता नवीन वर्ष साजरे करत असतो, नाचत असतो आणि एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत असतो, तोपर्यंत अनेक देशांनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा साजरे केलेले असतात, त्याचे कारण त्या देशाचे भौगोलिक स्थान आहे. दरम्यान तुम्हाला माहितीये का? जगात कोणत्या देशातील लोक नवीन वर्ष प्रथम साजरे करतात आणि कोणत्या देशात नवीन वर्ष साजरे करण्याची संधी सर्वात शेवटी येते? जाणून घ्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जगभरात नवीन वर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे. ३१ डिसेंबरच्या रात्रीपासूनच नवीन वर्षाचा जल्लोष सुरू होतो. लोक आपापल्या पद्धतीने नवीन वर्ष साजरे करतात. येणारे नवीन वर्ष जगभरात विविध प्रकारे साजरे केले जाते. ३१ डिसेंबरच्या रात्री १२ वाजल्यानंतर भारतात नवीन वर्षाचे आगमन होते, परंतु असे अनेक देश आहेत जिथे दिवस लवकर सुरू होतो.

ओशनिया प्रदेशातील लोक प्रथम नवीन वर्षाचे स्वागत करतात. यापैकी टोंगा, सामोआ आणि किरिबाटी हे नवीन वर्षाचे स्वागत करणारे पहिले देश आहेत. टोंगा या पॅसिफिक बेटावर नवीन वर्षाचा दिवस पहिला येतो, याचा अर्थ नवीन वर्ष साजरा करणारा पहिला देश आहे. भारतीय वेळेनुसार, सामोआ आणि ख्रिसमस बेट/किरिबाटी येथे ३१ डिसेंबर रोजी दुपारी ३:३० वाजता नवीन वर्षाची सुरूवात होते. आशियाई देशांमध्ये नवीन वर्षाचे स्वागत सर्वप्रथम जपान आणि दक्षिण कोरियामध्ये केले जाते. येथे ३१ डिसेंबर रोजी रात्री ८:३० वाजता नवीन वर्ष सुरू होते. त्याच वेळी, नवीन वर्ष यूएस मायनर आउटलाइंग बेटावर सर्वात शेवटी साजरे केले जाते. भारतीय वेळेनुसार, १ जानेवारीच्या संध्याकाळी ५:३५ वाजता साजरा केला जातो.

हेही वाचा >> PHOTO: भारतातील पहिल्या सेल्फीची कहाणी; ‘या’ राजानं आपल्या राणीसोबत काढलेला पाहिला सेल्फी पाहिला का?

हा’ देश भारतापेक्षा ७ तास ३० मिनिटे पुढे धावतो

नवीन वर्ष साजरे करणारा या पृथ्वीवरील पहिला देश टोंगा हा दक्षिण पॅसिफिक महासागरातील बेट समूह आहे. टोंगा भारतापेक्षा ७ तास ३० मिनिटे पुढे धावतो. म्हणजेच, ३१ डिसेंबर रोजी, जेव्हा भारतात दुपारी ४:३० वाजले असतील, त्याच वेळी टोंगामध्ये म्हणजेच ०१ जानेवारी २०२५ रोजी नवीन वर्ष सुरू होईल. होय, हा जगातील पहिला देश आहे, जिथे नवीन वर्ष प्रथम साजरे केले जाते. यानंतर सिडनीचा (ऑस्ट्रेलिया) क्रमांक लागतो. युनायटेड स्टेट्सपासून जवळच असलेल्या हॉलँड आणि बेकर द्वीप समूह, अगदी शेवटी नवीन वर्षाचे स्वागत करते. येथील लोक नवीन वर्षाची सुरुवात १ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता (जीएमटीनुसार) किंवा संध्याकाळी ०५.३० (भारतीय वेळेनुसार) करतात.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who celebrates new year first and who rings it in last country wise details here srk