मित्र असावा तर कृष्णासारखा, प्रियकर असावा तर कृष्णासारखा, नवरा असावा तर कृष्णासारखा, पूत्र असावा तर कृष्णासारखा… अशा कितीतरी नात्यांमध्ये आदर्श राहिलेल्या कृष्णाने आजन्म अनेक त्याग केलेत. त्याच्या वाट्याला अनेक दुःख आलीत. आपल्या जिव्हाळ्याच्या लोकांना सोडून द्यावं लागलं. जन्मताच आईपासून दुरावला, प्रियसखी राधाही दुरावली, गोकुळ सोडावं लागलं, मथुराही गेलं. पण कृष्णाची ख्याती जगभर पसरली. त्याच्या भक्तीरसात तल्लीन झालेल्या व्यक्तीच्या आयुष्यात उत्सव साजरे होऊ लागले. आनंद, समाधान, समृद्धीसाठी कृष्णभक्त त्याच्या चरणी लीन होतात. त्याचा पाळणा झुलवण्यासाठी आतुर होतात. मंदिरातल्या देव्हाऱ्यात त्याची छोटीशी बालकृष्णाची मूर्तीही पुजतात. हीच कृष्णभक्ती आता जगभरात पसरली आहे. किंबहुना कृष्णाच्या भक्तीचा प्रसार करण्यासाठी न्यू यॉर्क शहरातून सुरुवात करण्यात आली होती. कृष्णाच्या तेजरुपाचं दर्शन घडवणारं पहिलं इस्कॉन मंदिरही न्यू यॉर्क येथं बांधण्यात आलं होतं. त्यानंतर, भारतासह जगभरातील अनेक मुख्य शहरात कृष्णाची असंख्य इस्कॉन मंदिरं सापडतात. या मंदिरांमध्ये नित्यनियामाने भक्तांचा ओढाही असतो. त्यानिमित्ताने या इस्कॉन मंदिराचा इतिहास, इस्कॉनची स्थापना आणि त्यामागचा हेतु काय याविषयी जाणून घेऊयात.

हेही वाचा >> लग्नात वधू-वर एकमेकांना वरमाला का घालतात? ‘या’ प्रथेमागे नेमकं काय आहे कारण? जाणून घ्या…

Who is Abhinav Arora
Abhinav Arora: दहा वर्षांच्या आध्यात्मिक गुरूला बिश्नोई टोळीकडून धमकी, कुटुंबाचा दावा; व्हायरल व्हिडीओंमुळे आला होता चर्चेत
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
commissioner review facilities in girls ashram school
आयुक्तांकडून कन्या आश्रमशाळेतील सुविधांचा आढावा
laxmi vilas palace gujarat
Laxmi Vilas Palace: मराठी राजाने बांधलेला जगातील सर्वात मोठा राजवाडा गुजरातमध्ये; जाणून घ्या इतिहास
formation of the earth
भूगोलाचा इतिहास : धरतीची जन्मकथा
2000-year-old underwater 'Indiana Jones' temple discovered
2,000-year-old temple:समुद्राखाली सापडलेले २००० वर्षे प्राचीन मंदिर कोणता इतिहास सांगते?
History of Ajrak
History of Ajrakh: इजिप्तपासून ते मोहेंजोदारोपर्यंत आधुनिक अजरकचा इतिहास आहे तरी किती जुना?
Hindu temple being rebuilt in Pakistan
पाकिस्तानात होणार हिंदू मंदिराचा जीर्णोद्धार; एक कोटींचा निधी केला मंजूर, पाकिस्तानच्या या निर्णयामागील हेतू काय?

इस्कॉनचा पूर्ण अर्थ काय?

International Society for Krishna Consciousness असा इस्कॉनचा पूर्ण अर्थ होतो. कृष्णाची ख्याती जगभर पोहोचावी, कृष्णरसाचा प्रसार व्हावा याकरता इस्कॉन मंदिरांची निर्मिती करण्यात आली.

काय आहे इस्कॉनचा इतिहास?

श्री चैतन्य महाप्रभू यांनी कृष्णभक्ती चळवळीला भारतात चालना दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णभावनेच्या तत्त्वज्ञानावर शेकडो खंड संकलित केले गेले. अनेक भक्तांनी श्री चैतन्य महाप्रभूंच्या उपदेशात्मक पंक्तीचे पालन केले. १९ व्या शतकातील वैष्णव धर्मशास्त्रज्ञ भक्तिविनोद ठाकूर यांनीही त्यांच्या पंक्तीचा आदर राखत त्याचे पालन केले. एवढंच नव्हे तर भक्तिविनोद ठाकूर यांनी १८९६ साली कॅनडातील मॅकगिल विद्यापीठाला भगवान चैतन्य यांच्या कृष्णभक्तीचे पुस्तक पाठवून जगभर कृष्णभावना पोहोचवली.

भक्तिविनोद ठाकूर यांचा मुलगा भक्तिसिद्धांत सरस्वती गोस्वामी हे भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांचे गुरु बनले. पश्चिमेकडील इंग्रजी भाषिक लोकांपर्यंत कृष्णभावना पसरवण्याची जबाबदारी भक्तिसिद्धांत सरस्वती गोस्वामी यांनी प्रभुपाद यांच्यावर सोपावली. या आदेशावरून स्वामी प्रभुपादांनी १९६५ मध्ये अटलांटिक महासागर ओलांडून अमेरिकेपर्यंत धोकादायक प्रवास केला. तिथं जाऊन त्यांनी International Society for Krishna Consciousness ही अध्यात्मिक चळवळ सुरू केली. १९६६ साली भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांनी न्यूयॉर्क शहरात पहिल्या इस्कॉनची स्थापना केली. त्यानंतर, अवघ्या ११ वर्षांत इस्कॉनचा प्रसार जगातील प्रमुख शहरांमध्ये झाला होता.

भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद कोण?

भक्तिवेदांत स्वामी प्रभुपद यांचा जन्म १८९६ चा असून ते मुळचे कोलकत्त्याचे होते. १९२२ साली त्यांची भक्तिसिद्धांत सरस्वती गोस्वामी यांच्याशी भेट झाली. भक्तिसिद्धांत सरस्वती गोस्वामी हे धार्मिक विद्वान आणि चौसष्ट वैदिक संस्थांचे संस्थापक होते. त्यांचा वैदिक धर्माचा गाढा अभ्यास होता. यामुळे प्रभुपदांनी १९३३ सालापासून त्यांच्याकडे वैदिक ज्ञानग्रहणाला सुरुवात केली.

या दरम्यान, प्रभुपाद यांनी भगवद्गीतेवर सखोल अभ्यास केला. वैदिक मठामध्ये सेवा दिली. १९४४ साली बॅट टू गॉडहेड हे पाक्षिक सुरू केले. हेच मासिक आताही त्यांच्या शिष्यांकडून सुरू आहे. १९५० साली आपल्या अभ्यास आणि लेखनाला अधिक वेळ देण्यासाठी संन्यास स्वीकारून त्यांनी वैवाहिक जीवनातून निवृत्ती घेतली. संन्यास घेतल्यानंतर ते वृंदावन येथे दाखल झाले. तिथे त्यांनी राधा-दामोदरच्या ऐतिहासिक मंदिरात तपश्चर्या सुरू केली. तेथे त्यांनी अनेक वर्षे सखोल अभ्यास आणि लेखन केले.

१९६५ साली कृष्णभक्तीची चळवळ जगभरात पोहोचवण्याच्या उद्देशाने ते न्यू यॉर्क शहरात गेले. वर्षभराने म्हणजेच, जुलै १९६६ मध्ये International Society for Krishna Consciousness ची त्यांनी स्थापना केली. इस्कॉनची स्थापना केल्यानंतर त्यांनी मार्गदर्शनही केलं. या काळात शंभर आश्रम, शाळा, मंदिरे, संस्थांचीही निर्मिती केली. त्यामुळे प्रभुपदा यांचीही किर्ती जगभर पसरू लागली. परंतु, १४ नोव्हेंबर १९७७ साली त्यांची प्राणज्योत मालवली.

कृष्णचळवळ महत्त्वाची का?

कृष्णभक्ती आपल्याकडे पूर्वापार चालत आलेली आहे. जन्माष्टमीच्या निमित्ताने मथुरेतही हा भक्तीसागर ओसंडून वाहताना दिसतो. देशभरातील विविध शहरात असलेल्या कृष्णमंदिरात जन्माष्टमीला मोठी गर्दी झालेली असते. कृष्णभक्तीत तल्लीत होताना भक्तांच्या मनात काय विचार असतात? लोक श्रीकृष्णाच्या इतकं अधीन का जातात? याचं उत्तर सोपं आहे. श्रीकृष्णाची भक्ती करणाऱ्याच्या आयुष्यात उत्साह भरून राहतो. कृष्णाच्या भजन-किर्तनात तल्लीन होणारी कृष्णप्रेमी मंडळी आयुष्यभर आनंद साजरा करत असतात, अशी समजूत आहे. इस्कॉनच्या अधिकृत संकेतस्थळावरील माहितीनुसार, सुखाच्या शोधासाठी इस्कॉनची निर्मिती झाली आहे.

इस्कॉन म्हणजे आनंदाचे निवासस्थान आहे. तिथं अनुभवलेला आनंद हा सर्वोच्च आनंदाचा शिखर आहे. इस्कॉन ही अशी वास्तू आहे जिथं दुःख, वृद्धत्व, रोग आणि मृत्यूला अस्तित्व नाही. तर, मग तुमच्या शहरातही असेल एखादं इस्कॉन मंदिर तर आवर्जुन भेट द्या.