मित्र असावा तर कृष्णासारखा, प्रियकर असावा तर कृष्णासारखा, नवरा असावा तर कृष्णासारखा, पूत्र असावा तर कृष्णासारखा… अशा कितीतरी नात्यांमध्ये आदर्श राहिलेल्या कृष्णाने आजन्म अनेक त्याग केलेत. त्याच्या वाट्याला अनेक दुःख आलीत. आपल्या जिव्हाळ्याच्या लोकांना सोडून द्यावं लागलं. जन्मताच आईपासून दुरावला, प्रियसखी राधाही दुरावली, गोकुळ सोडावं लागलं, मथुराही गेलं. पण कृष्णाची ख्याती जगभर पसरली. त्याच्या भक्तीरसात तल्लीन झालेल्या व्यक्तीच्या आयुष्यात उत्सव साजरे होऊ लागले. आनंद, समाधान, समृद्धीसाठी कृष्णभक्त त्याच्या चरणी लीन होतात. त्याचा पाळणा झुलवण्यासाठी आतुर होतात. मंदिरातल्या देव्हाऱ्यात त्याची छोटीशी बालकृष्णाची मूर्तीही पुजतात. हीच कृष्णभक्ती आता जगभरात पसरली आहे. किंबहुना कृष्णाच्या भक्तीचा प्रसार करण्यासाठी न्यू यॉर्क शहरातून सुरुवात करण्यात आली होती. कृष्णाच्या तेजरुपाचं दर्शन घडवणारं पहिलं इस्कॉन मंदिरही न्यू यॉर्क येथं बांधण्यात आलं होतं. त्यानंतर, भारतासह जगभरातील अनेक मुख्य शहरात कृष्णाची असंख्य इस्कॉन मंदिरं सापडतात. या मंदिरांमध्ये नित्यनियामाने भक्तांचा ओढाही असतो. त्यानिमित्ताने या इस्कॉन मंदिराचा इतिहास, इस्कॉनची स्थापना आणि त्यामागचा हेतु काय याविषयी जाणून घेऊयात.
जाणून घ्या! इस्कॉनची स्थापना कोणी आणि का केली? काय आहे कृष्ण चळवळीमागचा इतिहास?
भारतासह जगभरातील अनेक मुख्य शहरात कृष्णाची असंख्य इस्कॉन मंदिरं सापडतात. या मंदिरांमध्ये नित्यनियामाने भक्तांचा ओढाही असतो. त्यानिमित्ताने या इस्कॉन मंदिराचा इतिहास, इस्कॉनची स्थापना आणि त्यामागचा हेतु काय याविषयी जाणून घेऊयात.
Written by लोकसत्ता ऑनलाइन
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 06-09-2023 at 18:01 IST
मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who founded iskcon and why what is the history behind the krishna movement sgk