Know Important Facts About Traffic Signal : एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी आपण रस्त्यांचा वापर करतो. दिवसेंदिवस गाड्यांची संख्याही वाढताना दिसत आहे. अशातच सुरक्षेच्या कारणास्तव ट्रॅफिक सिग्नलच्या नियमांचं पालन करणं खूप महत्वाचं आहे. रस्त्यावरून जात असताना तुम्ही अनेक प्रकारचे ट्रॅफिक साईन पाहिले असतील. याशिवाय ट्रॅफिक सिग्नल लाईटही पाहिली असेल. पण तुम्हाला माहितीय का, ट्रॅफिक सिग्नलचा शोध कुणी लावला? जाणून घेऊयात याबाबत सविस्तर माहिती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ट्रॅफिक सिग्नलचा शोध कुणी लावला?

ट्रॅफिक सिग्नलचा शोध रेल्वेसाठी लावण्यात आला होता. रेल्वे गाड्यांवर नियंत्रण ठेवण्याासाठी ब्रिटिश रेल्वे प्रबंधक जॉन पीक नाईट यांनी एक रेल्वेमार्ग पद्धत अवलंबवण्याचा उपाय सांगितला. अशातच रेल्वे सिग्नलिंग इंजीनियर जेपी नाईट यांनी पहिल्या ट्रॅफिक सिग्नलचा शोध लावला.

अशाप्रकारे सिग्नला व्हायचा वापर

रेल्वेमार्गांवर सेमाफोर प्रणालीचा वापर करण्यात येत होता. ज्यामध्ये एका खांबावर लावण्यात आलेल्या छोट्या बोर्डाद्वारे ट्रेनच्या जाण्याचा मेसेज दिला जायचा. दिवसा ‘थांबण्याचा’ आणि रात्री ‘जाण्याचा’ सिग्नल दिला जात असे. तर रात्री लाल आणि हिरव्या लाईटचा वापर करून हे सिग्नल दिले जायचे. या सिग्नलला प्रकाशित करण्यासाठी गॅस लॅम्पचा वापर केला जायचा. या लॅम्पला ऑपरेट करण्यसाठी प्रत्येक खांबाजवळ पोलीस तैनात केले जायचे.

नक्की वाचा – घराच्या बाल्कनीत लावलेल्या झाडांना सूर्यप्रकाश मिळत नाही? ‘हे’ सोपे उपाय करा, झाडे होतील हिरवीगार

जगातील पहिला ट्रॅफिक सिग्नल

जगातील पहिला ट्रॅफिक सिग्नल लंडनच्या वेस्टमिंस्टर क्षेत्रात ब्रिज स्ट्रीट आणि ग्रेट जॉर्ज स्ट्रीटजवळ संसद भवन आणि वेस्टमिंस्टर ब्रिजच्या जवळ डिसेंबर १८६८ ला स्थापन केला होता. तो दिसायला रेल्वे सिग्नलसारखाच होता. त्यालाही रात्री गॅसच्या माध्यमातून प्रकाशित केलं जायचं. परंतु, एक दिवस दुर्देवाने याचा स्फोट झाला होता आणि पोलीस कर्मचाऱ्याच मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर या पद्धतीत बदल करण्याच्या चर्चांना जोर देण्यात आला.

ट्रॅफिक लाईटचा इतिहास

ट्रॅफिक जामची समस्या १८०० च्या दशकापासून सुरु आहे. तेव्हा ऑटोमोबाईलचाही शोध लागला नव्हता. त्याचदरम्यान लंडनच्या रस्त्यावर प्रवासी चालत जायचे. तसंच घोडागाडीनेही प्रवास करायचे. गार्जियन यांच्या माहितीनुसार, आधुनिक ट्रॅफिक लाईटचा शोध अमेरिकेत लागला होता. तर वॉल्वरहॅम्प्टनने १९२६ मध्ये एका टाईम पीरिएडमध्ये काम करणारे आणि थोड्या थोड्या वेळाने बदलणारे ऑटोमॅटिक सिग्नल लावले होते.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who invented first traffic signal in which place worlds first signal is places know the history nss
Show comments