Do you know? मोबाइल ही अशी वस्तू झाली आहे, जिच्याशिवाय आता कोणीच राहू शकत नाही. मोबाइलच्या गरजेचं रुपांतर व्यसनात कधी झालं हे आपल्याला कळलंच नाही. अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांसाठीच मोबाइल ही जीवनावश्यक वस्तू बनून गेली आहे. पण, तुम्हाला माहीत आहे का, जगातील पहिला मोबाइल कोणी बनवला आणि त्याची किंमत काय होती. ग्रॅहम बेलने १८७६ मध्ये टेलिफोनचा शोध लावला हे सर्वांना माहीत आहे; परंतु सेल फोनचा शोध लावणाऱ्याबद्दल अनेकांना कल्पना नाही. आज आम्ही तुम्हाला याबद्दल माहिती देणार आहोत.
मोबाइलची निर्मिती कुणी केली?
मार्टिन कूपर यांनी १९७३ मध्ये मोबाइल फोनची निर्मिती केली होती. त्यांना Inventor of Cell Phone म्हणून देखील ओळखले जाते. या सेलफोनला बनवण्यासाठी मार्टिन यांना केवळ तीन महिने लागले होते. पहिला मोबाइल फोन त्यांनी १९७३ साली बनवला. त्यानंतर १९८३ साली तो मार्केटमध्ये आला. म्हणजे पहिला मोबाइल फोन सामान्यांना उपलब्ध होण्यासाठी तब्बल १० वर्ष लागली.
पहिल्या मोबाइलची किंमत काय?
या फोनची विक्री पहिल्यांदाच यूएस मार्केटमध्ये सुरू झाली. त्यावेळी या मोबाइलची किंमत ३,३९९ डॉलर म्हणजेच भारतीय रुपयांत २,४०,७१२ इतकी ठरविण्यात आली होती.
चार्जिंगसाठी प्रचंड वेळ
मोटोरोला कंपनीचा हा मोबाइल फोन चार्ज करण्यासाठी १० तासांचा वेळ लागायचा. विशेष म्हणजे इतका वेळ चार्जिंग करूनही मोबाइलची बॅटरी अवघी ३० मिनिटं टिकायची.
हेही वाचा >> Earthquake in Delhi : दिल्लीत भूकंपाचे धक्के वारंवार का जाणवतात? जाणून घ्या कारण….
सेल फोन नेटवर्क तयार करण्यासाठी आणि सेल फोनला व्यवहार्य व्यावसायिक उत्पादन बनवण्यासाठी बरीच वर्षे लागली. आज पृथ्वीवरील जवळजवळ प्रत्येक दुसऱ्या व्यक्तीकडे मोबाइल किंवा सेल फोन आहे.