Elon Musk Property News : एलॉन मस्क पुन्हा एकदा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती झाले आहेत. ब्लूमबर्गच्या एका रिपोर्टनुसार, एलॉन मस्क यांनी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होण्याचा किताब मिळवला आहे. टेस्लाच्या शेअर्सच्या किमतीत झालेली वाढ, हे त्यामागचं कारण आहे. डिसेंबर २०२२ मध्ये मस्क यांना जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या टायटलमधून हटवण्यात आलं होतं. कारण टेस्लाच्या शेअर्समध्ये घसरण झाली होती. त्यावेळी एलॉन मस्कच्या जागेवर लुई वुइटनचे सीईओ बर्नार्ड अरनॉल्ट जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती झाले होते. परंतु, मस्क यांनी हा किताब पुन्हा त्यांच्या नावावर केला आहे.

एलॉन मस्क यांचं नेटवर्थ किती आहे?

एलॉन मस्क पुन्हा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती झाले आहेत. मस्क यांचं नेटवर्थ आता १८७ अरब डॉलर आहे. वर्षाच्या सुरुवातीला नेटवर्थ १३७ अरब डॉलर होतं. एलन मस्क यांचा सप्टेंबर २०२१ पासून जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत समावेश होत असल्याचं दिसत आहे. त्यांच्याआधी अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस यांच्या नावाची चर्चा होती.

Indian rupee latest marathi news
रुपयाची प्रतिडॉलर ८५ च्या दिशेने वाटचाल
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Puneri pati shopkeeper display puneri pati on borrow photo viral on social media funny puneri pati
PHOTO: पुणेकरांचा विषयच हार्ड! उधारी रोखण्यासाठी जुगाड; दुकानात लावली अशी पाटी, लोकं स्वप्नातही मागणार नाही उधार 
What is LIC Bima Sakhi Yojana ?
LIC ची विमा सखी योजना काय आहे? महिन्याला ७ हजार रुपये देणाऱ्या खास स्कीमच्या अटी आणि नियम काय आहेत?
News About Osho
Osho : आचार्य रजनीश अर्थात ओशो कोण होते? त्यांच्या विषयीची ही रहस्यं तुम्हाला ठाऊक आहेत का?
Mahindra Thar Earth Edition With More Than 3 Lakh Rupees Discount, See Thar Other Variant Offers
महिंद्रा थारवर मिळतेय ३ लाखांपर्यंत सूट; थार प्रेमींनो आत्ताच उचला संधीची फायदा, जाणून घ्या ऑफर्स डिटेल्स
Alia Bhatt
आलियाची लेक राहा कपूर आजीला कोणत्या नावाने मारते हाक? सोनी राजदान म्हणाल्या…
prajakta mali marathi actress reveals her weight
प्राजक्ता माळीचं वजन किती? भलंमोठं कॅप्शन लिहित केला खुलासा; म्हणाली, “लोक म्हणू लागलेत एवढी बारीक…”

नक्की वाचा – सैनिक व्हायचंय? ‘असं’ मिळेल सैनिक शाळेत अ‍ॅडमिशन, फॉर्म आणि शुल्कबाबत जाणून घ्या सविस्तर

मस्क यांच्या नावावर अनोखा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड

श्रीमंती आणि एलॉन यांच्याशी जोडलेला आणखी एक किस्सा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. वर्षाच्या सुरुवातीला समोर आलेल्या एका रिपोर्टनुसार, मस्क यांना भूतकाळात सर्वात जास्त पैसै गमावल्याचा विक्रम मोडल्याबद्दल गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड्समध्ये सामिल केलं आहे. एलॉन मस्क यांनी वैयक्तीक संपत्तीचं सर्वात मोठ्या नुकासानीचा विक्रम मोडला असल्याची माहती समोर आली होती. याआधी हा विक्रम मासायोशी यांच्या नावावर होता. ज्यांना ५६ बिलियन अमेरिकी डॉलरच्या नुकसानाला सामोरं जावं लागलं होतं. मस्क यांच्या वैयक्तीक संपत्तीचा बहुतांश हिस्सा टेस्लाच्या शेअर्सशी जोडलेला आहे.

मस्क यांचं ट्विटरवर टेकओवर

मस्क यांनी ऑक्टोबर २०२२ मध्ये ४४ बिलियन अमेरिकी डॉलरने ट्वीटर खरेदी केलं होतं. अरबपतींनी त्यांची नवीन भूमिका सांभाळल्यानंतर कंपनी खूप मोठे बदल केले होते आणि तेव्हापासून ट्वीटर नेहमीच प्रकाशझोतात राहिलं आहे. मस्क यांच्या कारकिर्दीत ट्वीटरच्या अनेक कर्मचाऱ्यांनी एक तर राजीनामा दिला, किंवा त्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आलं. मस्क यांनी नोव्हेंबर २०२२ नंतर दावा केला होता की, भविष्यात कंपनीत नोकर कपात होणार नाही. पण नोकर कपात झाल्यामुळं ट्वीटरकडे असणाऱ्या ७५०० कर्मचाऱ्यांची संख्या आता जवळपास २३०० कर्मचाऱ्यांवर पोहोचल्याची माहिती आहे.

Story img Loader