जागतिक पातळीवर सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या नोबेल पारितोषिकांची घोषणा होण्यास सुरुवात झाली आहे. यंदाचं पहिलं नोबेल पारितोषिक वैद्यक क्षेत्रासाठी जाहीर करण्यात आलं आहे. करोना रोगावरील प्रभावी लशीच्या संशोधनात मोलाची कामगिरी बजावणारे शास्त्रज्ञ कॅटलिन करिको आणि ड्र्यु वेसमन यांना यांदाचा वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. स्विडनच्या कॅरिलोन्स्का संस्थेच्या नोबेल परिषदेकडून करिको आणि ड्र्यु वेसमन यांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. आजवर अनेक भारतीयांनाही नोबेल पारितोषिक मिळालं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्वातंत्र्यपूर्व काळात रवींद्रनाथ ठाकूर (साहित्य) आणि सी. व्ही. रमण (भौतिकशास्त्र) या दोन भारतीयांना नोबेल मिळालं होतं. तर स्वातंत्रोत्तर काळात आमर्त्य सेन, हर गोविंद खुराना, अभिजीत बॅनर्जी, मदर तेरेसा, सुब्रमण्यम चंद्रशेखर आणि कैलास सत्यार्थी यांना वेगवेगळ्या श्रेणींमधलं नोबेल मिळालं आहे. परंतु, तुम्हाला नोबेल पुरस्काराविषयी माहिती आहे का? हा पुरस्कार जगात सर्वोच्च का मानला जातो? त्याची सुरुवात कधीपासून झाली आणि कोणी केली? अशा प्रश्नांची उत्तरं तुम्हाला माहिती नसतील तर ती या लेखाद्वारे मिळतील.

रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, साहित्य, जागतिक शांतता, वैद्यकशास्त्र/जीवशास्त्र आणि अर्थशास्त्र या पाच क्षेत्रांमध्ये अतुलनीय कामगिरी करणाऱ्या दिग्गजांना दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. स्वीडिश वैज्ञानिक आल्फ्रेड नोबल यांनी त्यांच्या मृत्यूपत्रात या पुरस्कारांची तरतूद करून ठेवली आहे. त्यांच्या मृत्यूनंतर पाच वर्षांनी १९०१ सालापासून हा पुरस्कार देण्यास सुरुवात झाली. दरवर्षी १० डिसेंबर रोजी हा पुरस्कार प्रदान केला जातो. गेली १२३ वर्षे हा पुरस्कार दिला जात आहे. केवळ १९४० ते १९४२ या काळात यात खंड पडला होता. दुसऱ्या महायुद्धामुळे या तीन वर्षांमध्ये नोबेल पुरस्कार देता आले नव्हते.

नोबेल पुरस्कारांची सुरुवात कशी झाली?

आल्फ्रेड नोबेल १८८०-९० च्या काळात जगातल्या गर्भश्रीमंत लोकांपैकी एक होते. १० डिसेंबर १८९६ रोजी त्यांचं निधन झालं. त्यानंतर एक वर्षाने त्यांचं मृत्यूपत्र उघडून पाहण्यात आलं. या मृत्यूपत्रात त्यांनी लिहून ठेवलं होतं की त्यांनी कमावलेल्या अमाप संपत्तीचा एक मोठा भाग (३.१ कोटी स्वीडिश क्रोनार) नोबेल पारितोषिकांच्या निधीसाठी राखून ठेवले होते. हा निधी बँकांमध्ये सुरक्षित ठेवींमध्ये गुंतवून ठेवण्यात आला आहे. त्यातून व्याजाच्या स्वरुपात मिळणाऱ्या उत्पन्नाच्या ६० ते ७० टक्के रक्कमेचे पाच भाग केले जातात आणि हे पाच भाग दरवर्षी नोबेल विजेत्यांना बक्षीश म्हणून दिले जातात. तसेच पारितोषिकाचे निकष, पारितोषिक विजेत्यांची निवड करणाऱ्या संस्था आणि समित्यांचे प्रतिनिधी कोण असतील याबाबतही मृत्यूपत्रात विवेचन करण्यात आलं आहे.

हे ही वाचा >> BLOG : …म्हणून आल्फ्रेड नोबेल यांनाही म्हटलं गेलं होतं ‘मौत के सौदागर’

दरवर्षी ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला नोबेल पारितोषिक विजेत्यांची घोषणा केली जाते. त्यानंतर १० डिसेंबर रोजी (आल्फ्रेड नोबेल यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी) नॉर्वेमधील ओस्लो, आणि स्वीडनच्या स्टॉकहोम या शहरांमध्ये बक्षीस वितरण सोहळे आयोजित केले जातात. औषध, भौतिकशस्त्र, रसायनशास्त्र, साहित्य आणि अर्थशास्त्रातील नोबेल विजेत्यांना पारितोषिकं वितरीत केली जातात. किंग कार्ल, राणी सिल्विया यांच्यासह जगभरातील विविध क्षेत्रातील मान्यवर आणि दिग्गजांच्या उपस्थितीत पारितोषिकं वितरित केले जातात. तर ओस्लो येथे शांततेचं नोबेल पारितोषिक दिलं जातं.

हे ही वाचा >> Nobel Prize 2023 : रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा, क्वांटम डॉट्सचा शोध लावणाऱ्या तीन शास्त्रज्ञांचा सन्मान

आल्फ्रेड नोबेल कोण होते?

पेशाने अभियंते असलेल्या इमॅन्युएल नोबेल यांच्या घरी स्टॉकहोमध्ये २१ ऑक्टोबर १८३३ रोजी आल्फ्रेड नोबेल यांचा जन्म झाला. रशियात त्यांचं बालपण गेलं. तर फ्रान्स आणि अमेरिकेत त्यांचं शिक्षण झालं. अमेरिकेत त्यांनी रसायनशास्त्र आणि तंत्रज्ञानाचं शिक्षण घेतलं. साहित्य, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्रातही त्यांना रस होता. डायनामाईटचा शोधही त्यांनीच लावला. जगप्रसिद्ध उद्योगपती लुडविंग नोबेल, रॉबर्टन नोबेल, एमी ऑस्कर नोबेल हे आल्फ्रेड नोबेल यांचे मोठे बंधू होते.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who was alfred nobel when where and why nobel prize started know everything about highest prize world asc