Kismet and the Evolution of AI: डॉ. बाळ फोंडके यांनी त्यांच्या ‘कोण?’ या पुस्तकात म्हटल्याप्रमाणे, “आज संगणकांची क्षमता आणि वेग खूपच वाढले आहेत. संगणक एका सेकंदात अब्जावधी गणितं सोडवू शकतात. माहिती साठवण्याची त्यांची क्षमता देखील खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे. संगणक बुद्धिबळातील ग्रँडमास्टरलाही हरवू शकतात आणि कोणत्याही भाषेचे दुसऱ्या भाषेत भाषांतर करू शकतात. माणसाला ज्या गणितांसाठी तासन् तास मेहनत घ्यावी लागते, ती संगणक चुटकीसरशी सोडवतो.” यातून संगणकांच्या वाढत्या सामर्थ्याचा अंदाज येतो.

तरीही, मानवी बुद्धिमत्तेच्या अनेक गोष्टींशी तुलना करणं संगणकांला अजूनही शक्य झालेलं नाही असं मानलं जात होत. माणूस विचार करू शकतो, अनुभवांमधून शिकतो, आणि माहितीचं ज्ञानात रूपांतर करू शकतो. संगणक तर्कसंगत विश्लेषण करू शकतो, पण तो स्वतःहून नव्या गोष्टी शोधू शकत नाही किंवा मिळालेल्या ज्ञानाच्या आधारे नवी समस्या सोडवू शकत नाही, अशी धारणा होती. मात्र, एआय तंत्रज्ञानाने या धारणेला छेद दिलेला आहे. भविष्यात संगणक सर्व काही करू शक्ती म्हणूनच कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स विकसित करण्यावर भर वैज्ञानिकांनी दिला. या दिशेने पहिलं पाऊल ‘किस्मत’ नावाच्या रोबोच्या रूपात उचलण्यात आलं होत. त्यामुळेच किस्मतला आताच्या प्रगत एआय तंत्रज्ञानाची आजी म्हटलं जातं.

अधिक वाचा: ‘Sector 36’ on Netflix: गळा दाबून मारले, नंतर शरीराचे भाग चिरून, शिजवून खाल्ले; कॅनिबलिजम आणि नेक्रोफिलिया आहे तरी काय? निठारी हत्याकांड काय होते?

किस्मत रोबो हा एक प्रगत रोबोट आहे, जो मुख्यतः शिक्षण, संशोधन आणि सामाजिक संवादासाठी विकसित करण्यात आला होता. हा रोबो ‘ह्यूमनॉइड’ प्रकारातील आहे, म्हणजेच तो माणसासारखा दिसतो आणि वागतो. किस्मत रोबोला संवाद साधण्यासाठी प्रोग्राम करण्यात आले आहे, त्यामुळे तो चेहऱ्यावरील हावभाव, आवाज आणि हालचालींच्या माध्यमातून माणसांशी संवाद साधू शकतो.

किस्मत रोबोची वैशिष्ट्ये:

१. भावनात्मक संवाद: किस्मत हा रोबो चेहऱ्यावर हावभाव दाखवून आपल्या भावना व्यक्त करू शकतो. त्याच्या चेहऱ्यावरील भागांची (डोळे, ओठ, आणि कान) हालचाल करून तो आनंद, दु:ख, आश्चर्य यांसारख्या भावना व्यक्त करू शकतो.

२. शिकण्याची क्षमता: किस्मत रोबोचे डिझाइन असे आहे की, त्यामुळे तो सभोवतालचं निरीक्षण करून शिकू शकतो. उदाहरणार्थ, त्याला कोणत्याही स्थितीत योग्य प्रतिसाद मिळाला, तर तो त्यातून शिकतो आणि भविष्यातील संवादांमध्ये त्या शिकलेल्या प्रतिसादांचा वापर करतो.

३. सोशल इंटरॅक्शन: हा रोबो मुख्यतः समाजशास्त्रीय संशोधन आणि शिक्षणासाठी तयार करण्यात आला होता. तो विविध सामाजिक संवादांमध्ये सहभागी होऊ शकतो आणि संवादाच्या परिस्थितीनुसार आपल्या वर्तनात बदल करू शकतो.

किस्मतची विकास प्रक्रिया:

किस्मत रोबोची निर्मिती मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (MIT) या संस्थेमध्ये प्रोफेसर सिंथिया ब्रिझेल आणि त्यांच्या टीमने केली होती. हा प्रकल्प मुख्यतः रोबोटिक शिक्षणाच्या क्षेत्रात भावनात्मक बुद्धिमत्तेचे अध्ययन करण्यासाठी विकसित करण्यात आला होता. किस्मत रोबो १९९० च्या दशकाच्या उत्तरार्धात विकसित करण्यात आला. विशेषतः, किस्मत रोबोची निर्मिती १९९८-२००१ या काळात झाली.

किस्मतला यंत्र मानव म्हणता येईल, पण तिचं फक्त डोकं आहे, शरीर नाही. शरीराच्या हालचालींसाठी ऊर्जा खर्च न करताच, तिच्या साऱ्या क्षमतांचा वापर उच्च बुद्धिमत्तेसाठी केला गेला. किस्मतनं आतापर्यंत अनेक भावनांचं प्रदर्शन स्पष्टपणे केलं होत. लहान मुलं जशी त्यांच्या आसपास वावरणाऱ्या प्रौढ व्यक्तींच्या तोंडातून बाहेर पडणाऱ्या ध्वनित चढ-उतारांचा आणि डोळ्यांना दिसणाऱ्या हालचालींमधून मिळणाऱ्या संकेतांना प्रतिसाद देत त्यांच्याशी मूक संवाद साधण्याचा प्रयत्न करतात, त्याच प्रकारे किस्मतच काम सुरु होत. ही मानवी बुद्धिमत्तेच्या विकासाची पहिली पायरी होती.

अधिक वाचा: Sino-Indian tensions:अरुणाचल प्रदेशातील शिखराला दलाई लामांचे नाव दिल्यामुळे चीनचा संताप; काय आहे नेमकं प्रकरण?

AI तंत्रज्ञानाची आजी

किस्मत रोबोला काही प्रमाणात AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानाच्या सुरुवातीच्या टप्प्यातील एक महत्त्वाचा प्रयोग मानलं जातं. म्हणूनच त्याला “AI तंत्रज्ञानाची आजी” म्हणून संबोधणे योग्य ठरू शकते असे जाणकार मानतात. किस्मत रोबोच्या माध्यमातून आधुनिक AI तंत्रज्ञानाच्या विकासाच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल होते. किस्मत रोबोच्या माध्यमातून मानवी संवादाशी संबंधित हावभाव, आवाज आणि परस्परसंवादाच्या तत्त्वांवर आधारित प्रयोग करून रोबोटिक बुद्धिमत्तेची संकल्पना विकसित केली. त्यातूनच पुढे AI आणि रोबोटिक्सच्या क्षेत्रातील तंत्रज्ञान प्रगत झाले. म्हणूनच किस्मत रोबोला AI तंत्रज्ञानाच्या सुरुवातीच्या काळातील एक महत्त्वपूर्ण घटक मानले जाते, जिथे भावनात्मक बुद्धिमत्तेचा वापर करण्यात आला होता