Why Airplanes do not fly over the Himalayas: लहानपणापासून शालेय पुस्तकांमध्ये हिमालय पर्वताबद्दल सर्वांनी वाचले आहे. शाळेत मुलांना शिकवले जाते की हिमालय पर्वत हा देशाचा मुकुट आहे. हिमालय पर्वताचे सौंदर्य आपण टीव्ही आणि सोशल मीडियावरही पाहू शकतो. प्रत्येकाला हिमालय पर्वत आपल्या डोळ्यांनी एकदातरी पाहावा अशी इच्छा असते. पण तुम्हाला माहीत आहे का की तुम्ही हिमालयाला वरून पाहू शकत नाही.
होय, हिमालयावरून उड्डाण करता येत नाही. त्यावरून तुम्ही प्रवास करू शकत नाही. वास्तविक, या विशाल पर्वताच्या शिखरावरून कोणत्याही प्रवासी विमानासाठी कोणताही मार्ग निश्चित करण्यात आलेला नाही. आता तुम्हालाही त्यामागील कारण जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. पण यामागे एकच नाही तर अनेक कारणे आहेत. चला तर मग जाणून घेऊया..
हवामान हे पहिले कारण आहे..
हिमालयाचे हवामान सतत बदलत राहते आणि खराब देखील असते. येथील हवामान विमानांच्या उड्डाणासाठी अनुकूल नाही आहे. बदलते हवामान विमानांसाठी अत्यंत धोकादायक आहे. विमानातील प्रवाशांनुसार हवेचा दाब ठेवला जातो. परंतु हिमालयातील वाऱ्याची स्थिती खूपच असामान्य असते. ज्यामुळे प्रवाशांचे मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळेच त्यावरून कोणताही मार्ग ठेवण्यात आलेला नाही.
हिमालयाची उंची हे सर्वात मोठे कारण आहे
त्यावरून विमाने न उडण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्याची उंची. हिमालय पर्वताची उंची सुमारे २९ हजार फूट आहे. विमाने सरासरी ३० ते ३५ हजार फूट उंचीवर उडतात. पण हिमालयाची उंची विमानांसाठी धोकादायक आहे. वास्तविक, आपत्कालीन परिस्थिती विमानात फक्त २० ते २५ मिनिटे ऑक्सिजन असतो, अशा परिस्थितीत विमानाला ८ ते १० हजार फूट उंचीवरच उड्डाण करावे लागते, जेणेकरून प्रवाशांना श्वास घेण्यात कोणताही त्रास होऊ नये. मात्र या विशाल पर्वतावरून ३० ते ३५ हजार फुटांवरून ८ ते १० हजार फुटांवर फक्त २० ते २५ मिनिटांत येणे शक्य नाही आहे.
( हे ही वाचा: ‘हा’ आहे जगातील सर्वात लहान देश; राहतात फक्त ८०० लोकं)
नेव्हिगेशनचा अभाव
हिमालयाच्या परिसरात कोणतीही नेव्हिगेशन सुविधा नाही. अशा आपत्कालीन परिस्थितीत विमान एअर कंट्रोलशी संपर्क साधू शकत नाही. आपत्कालीन परिस्थितीत, विमानाला कमीत कमी वेळेत जवळच्या विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावे लागते, तर हिमालयाच्या प्रदेशात दूरवर कोणतेही विमानतळ बांधलेले नाही. यामुळे विमानांना गोल फिरून जावे लागेल. म्हणून त्यांचा मार्ग हिमालयाच्या वर बनवला गेला नाही आहे.