Why There Are Only 3 Blades In Ceiling Fans: गुलाबी थंडीचा ओघ कमी होऊन आता हळूहळू हवामानाचा पारा वाढू लागला आहे. मुंबईत तर आता दुपारी अगदी मे महिन्याप्रमाणे उन्हाचा तडाखा अनुभवता येतो. यंदाची थंडी पाहता उन्हाळा सुद्धा कडक असणार असे अंदाज आहेत. आता उन्हाळा सर्वांसाठी सारखा असला तरी त्याचा सामना करण्यासाठी प्रत्येकाच्या घरी एसी असेलच असं नाही. पण अगदी मध्यमवर्गीयांपासून ते श्रीमंतांपर्यंत सगळ्यांकडे पंखा मात्र नक्कीच असतो.

तुम्ही कधी नीट निरीक्षण केले आहे का आपल्याकडे पंख्याला तीन पाती असतात पण हेच इंग्रजी वेबसिरीज किंवा ब्रिटिशकालीन बांधकाम केलेल्या भागांमध्ये चार पाती असणारे पंखे असतात. असं का हा प्रश्न कधी तुमच्या मनात आला आहे का? फॅशन, स्टाईल, मर्जी इतकाच यामागे हेतू नसून याचे एक खास कारण सुद्धा आहे, ते काय हे आज आपण जाणून घेऊयात..

IND vs ENG Shubman Gill touched his head after Adil Rashid clean bowled Axar Patel video viral
IND vs ENG : स्वत:ची विकेट पाहून अक्षरही अवाक्, गिलने तर डोक्यालाच लावला हात; आदिलच्या जादुई चेंडूचा VIDEO व्हायरल
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Police will use five drones to monitor first odi match between England and India at Jamtha Stadium
नागपुरात क्रिकेट सामना बघायला जाताय? मग ‘हे’ वाचाच…नाही तर…
central railway Due to technical work at Pachora some trains are canceled and others timings changed
रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या… तांत्रिक कामांमुळे रेल्वे गाड्यांच्या फेऱ्या रद्द, काही गाड्या विलंबाने…
archana patil chakurkar marathi news
अर्चना चाकुरकरांच्या प्रश्नामुळे भाजपमधील जुन्या – नव्याचा वाद पुन्हा चव्हाट्यावर
people from Mumbai flew by airplane to Kolhapur for village fair
जत्रंला येऊ द्या …पण विमानाने; भादवणकरांचे असेही उड्डाण !
area around Teen Hat Naka gripped by traffic jam due to illegal constructions and metro project works
ठाण्याचा तीन हात नाका टपऱ्यांनी कोंडला
Mahakumbh, Airline companies , fares ,
‘महाकुंभ’साठीच्या दर ‘भरारी’चे नियंत्रण करण्याची मागणी, विमान कंपन्यांच्या भाडेवाढीविरुद्ध ग्राहक पंचायत आक्रमक

4 पाती असणारे पंखे कुठे वापरले जातात?

अधिक थंडी असणारे देश म्हणजेच पाश्चिमात्य देशात सिलिंग फॅन पेक्षा एगझोस्ट फॅन्सचा वापर अधिक होतो. याचा वापर आधी म्हंटल्याप्रमाणे हवा खेळती राहण्यासाठी केला जातो. अमेरिका व युरोपियन देशांमध्ये ४ पातींचा पंखा बहुतांश ठिकाणी वापरला जातो.

3 पातीच्या पंख्याचे लॉजिक काय सांगते?

तीन पाती असणाऱ्या पंख्यांचे वैज्ञानिक कारण पाहायचे तर, पंख्यात जितक्या जास्त पाती असतात तितकी कमी हवा लागते त्यामुळे उष्ण देशांमध्ये मुख्यतः तीन पातीचा पंखा वापरला जातो कारण त्याची हवा जास्त लागते तर थंड भागांमध्ये चार पाती असणारा पंखा वापरला जातो कारण त्याचे काम केवळ हवा खेळती ठेवणे इतकेच असते. भारतात उष्ण प्रदेश जास्त असल्याने अधिक भागांमध्ये आपल्याला तीन पातीचे पंखे पाहायला मिळतील.

अभ्यासक सांगतात की पंख्याच्या मोटर क्षमतेनुसार जेवढ्या कमी पाती असतील तितकी जास्त हवा पंखा तयार करतो. म्हणून ३ पाती असणाऱ्या पंख्याने ४ पातीच्या तुलनेत अधिक गार वारा लागतो. याचे आणखी एक कारण म्हणजे पातीच्या वजनाने मोटरची क्षमता कमी अधिक होते. ४ पाती असल्यास मोटारवर अधिक भार पडतो तर याउलट कमी पाती असल्यास मोटार वेगाने फिरू शकते. आपण कमी हवा देणारे टेबल फॅन्स पहिले असतील तर त्यात काही वेळा चार पाती असतात कारण त्यांचा वापर हा मर्यादित जागेसाठी केला जातो.

Story img Loader