भारतामधील ओडिसा हे राज्य सध्या सगळ्यांच्या चर्चेचा आणि कौतुकाचा विषय बनला आहे. त्याचे कारण म्हणजे, ओडिसामधील ‘सिमिलीपाल काइ चटणी.’ या चटणीला नुकताच GI टॅग म्हणजेच, भौगोलिक मानांकन प्राप्त झालेले आहे. एखादे उत्पादन विशिष्ट भागात घेतले जात असून, त्याला आपली अशी एक विशिष्ट ओळख असली तरच त्यांना भौगोलिक मानांकन दिले जाते. एखाद्या वस्तू, पदार्थाला भौगोलिक मानांकन मिळाल्यास त्याचे उगमस्थान निश्चित होण्यास मदत होते. आता ही सिमिलीपाल काइ चटणी विशेष ठरते, कारण ही चटणी चक्क लाल मुंग्यांचा वापर करून बनवला जाणारा एक पदार्थ आहे.

मात्र, तुम्हाला माहीत आहे का की, भारतामध्ये केवळ ओडिसाच नव्हे तर इतर भागांमध्येही लाल मुंग्या वेगवेगळ्या पद्धतीने खाल्ल्या जातात. चला तर मग, भारत आणि भारताबाहेर लाल मुंग्यांपासून कोणते पदार्थ बनवले जातात आणि त्यांचे सेवन कसे केले जाते ते पाहू.

Rahul Gandhi Criticized Mohan Bhagwat
Rahul Gandhi :”…तर मोहन भागवतांना अटक झाली असती”, राहुल गांधींनी व्यक्त केला संताप
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
gul poli
“तिळगुळ घ्या, गोड गोड बोला!” संक्रातीनिमित्त झटपट बनवा खमंग खुसखुशीत तिळाची पोळी! ही घ्या रेसिपी
When Is Bhogi Celebrated in 2025
भोगीचा सण केव्हा साजरा केला जातो? जाणून घ्या सर्व काही एका क्लिकवर…
NG Acharya Udyan, Butterfly Festival, Mumbai,
मुंबई : एन. जी. आचार्य उद्यानात फुलपाखरू महोत्सवाला सुरुवात
Special Makar Sankranti Ukhane in Marathi
Makar Sankranti Ukhane : महिलांनो, हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात घ्या एकापेक्षा एक हटके उखाणे, एकदा लिस्ट पाहाच
Excessive use of chemical fertilizers disrupts the natural chain says MLA Arun Lad
रासायनिक खतांच्या बेसुमार वापरामुळे निसर्ग साखळी विस्कळीत – आमदार अरूण लाड
raj Thackeray
…अन् राज ठाकरे यांनी घरी बोलावले; गंधर्व कलामंचच्या कलाकारांचे कौतुक

हेही वाचा : हत्तीची स्मशानभूमी? खरंच हा बुद्धिमान प्राणी शेवटचा श्वास घेण्यासाठी विशिष्ट ठिकाणी जातो? जाणून घ्या…

मुंग्या का खाल्ल्या जातात?

किडे, कीटक खाण्याला एंटोमोफॅजी [entomophagy] असे म्हणतात. हे ऐकण्यासाठी जरी विचित्र वाटत असेल, तरीही जगभरात अगदी सामान्य पदार्थांप्रमाणे त्याचे सेवन केले जाते. परंतु, मुंग्या या प्रथिनांचे उत्तम स्रोत असून, त्यामध्ये भरपूर प्रमाणात खनिजे, लोह, झिंक, पोटॅशियम, मॅग्नेशिअम, फायबर, जीवनसत्त्वे असे पौष्टिक घटक असतात; अशी माहिती इंडिया टुडेच्या एका लेखावरून समजते.

मुंग्यांच्या या गुणधर्मांमुळे चीनमध्ये त्यांचा अनेकदा पौष्टिक पदार्थ म्हणून किंवा एखाद्या औषधात वापर केला जातो. “१९९६ सालापासूनच राज्य अन्न आणि औषध प्रशासन आणि चीनच्या राज्य आरोग्य मंत्रालयाने ३० पेक्षा अधिक मुंग्या असलेल्या उत्पादनांना मान्यता दिली आहे, अशी माहिती युनायटेड नेशनच्या फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशनने २०१३ मध्ये प्रसिद्ध केलेल्या अभ्यासात दिली आहे.

जगभरात मुंग्या खाण्याच्या पद्धती

१. GI टॅग सिमिलीपाल काइ चटणी – ओडिसा

ओडिसमधील मयुरभंज जिल्ह्यातील आदिवासी या लाल विणकर मुंग्यांपासून ही खास चटणी तयार करतात. आशियातील सगळ्यात मोठं जंगल असलेल्या मयुरभंजच्या जंगलात या मुंग्या आढळतात. ही चटणी औषधी आणि पोशाक घटकांनी भरलेली असते. सर्वप्रथम लाल मुंग्या आणि त्यांची अंडी वाळवून नंतर त्यामध्ये आले, लसूण, कोथिंबीर, चिंच, वेलची आणि मीठ हे पदार्थ वापरले जातात.

२. चापडा चटणी – छत्तीसगढ

दगडी पाटा-वरवंटा वापरून छत्तीसगढची ही पारंपरिक चटणी बनवली जाते. याची आंबट अशी चव असते. मुख्यतः तिखट मिरच्या आणि मीठ यांचा वापर करून स्थानिक मसाले, लाल मुंग्या आणि त्यांच्या अंड्यांपासून ही चटणी बनवली जाते. इतकेच नव्हे तर सुप्रसिद्ध शेफ गॉर्डन रॅमसी जेव्हा भारतात आले होते तेव्हा त्यांनी हा पदार्थ खाऊन पाहिला होता. ही चटणी बनवणे अत्यंत अवघड असते. कारण- जेव्हा मुंग्या आणि त्यांची अंडी गोळा करण्यासाठी व्यक्ती जात असते, तेव्हा मादी मुंग्यांची, अंड्यांची रक्षा करण्यासाठी नर मुंग्या व्यक्तीवर हल्ला करून त्यांना चावण्याचा प्रयत्न करत असतात.

३. मुंग्यांच्या अंड्यांचे सूप – लाओस [आशियातील एक देश]

लाओसमध्ये, मुंग्यांच्या अंड्यांपासून सॅलेड, सूप यांसारखे विविध पदार्थ बनवले जातात. लार्वा [मुंग्यांच्या अळ्या] म्हणजेच विणकर मुंग्यांची अंडी. लाओसचे हे सूप चांगलेच प्रसिद्ध आहे. वेगवेळ्या भाज्या, हर्ब्स यांच्यासोबत ही अंडी शिजवली जातात. अशाप्रकारचा पदार्थ थायलंडमध्येही खाल्ला जातो. ऑमलेट, सॅलेड अशा अनेक पदार्थांमध्ये मुंग्यांची अंडी घालून पदार्थाची चव आणि प्रोटिनची मात्रा वाढवण्यासाठी तेथील नागरिक मुंग्यांच्या अंड्यांचा वापर करत असतात. या मुंग्यांची-अंड्यांची आंब्याच्या, नारळाच्या झाडाजवळ शेती केली जाते, अशी माहिती इंडिया टुडेच्या एका लेखावरून समजते.

हेही वाचा : बापरे, कॉकटेलच्या ग्लासवर केली ‘काळ्या मुंग्यांची’ सजावट! व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया पाहा

४. मुंग्यांचे सॅलेड – थायलंड

थायलंडमध्ये तर या लाल मुंग्या चक्क लहान लहान डब्यांमध्ये विक्रीसाठी ठेवल्या जातात. खाई मोट डेइंग [khai mot daeng] असे मुंग्यांच्या अंड्यांना म्हटले जाते. अंड्यांना वारुळातून काढून, व्यवस्थित स्वच्छ करून मग विविध पदार्थांमध्ये वापरले जाते. शक्यतो स्थानिक हर्ब्स आणि मसाल्यांसोबत ही अंडी परतली जातात; तर कधी सॅलेडमध्ये घालून अगदी ताजीदेखील खाल्ली जातात.

केवळ मुंग्यांची अंडीच नाही, तर लाल मुंग्याही कच्च्या पपई सॅलेडवर घातल्या जातात, त्याला सॉम टॅमकाई मोड डेइंग [Som Tam Kai Mod Daeng] असे म्हटले जाते.

५. रिकाम्या वेळेत खाण्यासाठी मुंग्यांचा वापर – कोलंबिया

आपण मधल्यावेळेत काहीतरी तोंडात टाकण्यासाठी सुकामेवा, वेफर्स, चणे-फुटाणे खातो, त्याचप्रमाणे कोलंबियामध्ये मुंग्यांचा वापर केला जातो. या मुंग्या खाण्याआधी तळून किंवा भाजून त्यावर थोडे मीठ टाकून कुरकुरीत केलेल्या असतात. शरीराचा मागचा भाग मोठा असणाऱ्या या मोठया आकाराच्या मुंग्या असतात, ज्याला इंग्रजीमध्ये hormigas culonas असे म्हटले जाते. खाण्यासाठी मादी मुंग्यांचा शक्यतो वापर केला जातो. पंख असलेल्या, गडद लाल रंगाच्या, जाड आणि आकाराने मोठ्या अशा या मुंग्या असतात. या मुंग्यांचे पंख, डोकं आणि पाय काढून मग त्यांना तळले किंवा भाजले जाते.

Gordon Ramsay- YouTube

याव्यतिरिक्त मेक्सिको, ब्राझील आणि ऑस्ट्रेलिया यांसारख्या देशातही मुंग्यांचे सेवन केले जाते.

Story img Loader