Duck In Cricket: आजकाल सर्वत्र आयपीएलची धामधूम आहे. ५ वेळा आयपीएलची ट्रॉफी मिळवणारा मुंबई इंडियन्सचा संघ सध्या गुणतालिकेमध्ये वरच्या स्थानावर आहे. सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये मुंबईच्या संघातील बऱ्याचशा खेळाडूंना अपेक्षित कामगिरी करणे शक्य झाले नव्हते. आता कर्णधार रोहित शर्मा गवळता अनेकजण फॉर्ममध्ये आल्याचे पाहायला मिळते.

आयपीएल २०२३ हा हंगाम रोहित शर्मासाठी फारसा चांगला ठरत नसल्याचे पाहायला मिळते. खेळलेल्या एकूण सामन्यांमध्ये त्याची कामगिरी ही बऱ्याचअंशी निराशाजनक आहे. याशिवाय त्याच्या नावावर एक लाजिरवाणा विक्रम जोडला गेला आहे. सीएसके विरुद्धच्या सामन्यात शून्यावर बाद होऊन आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक वेळा Duck होणारा रोहित शर्मा हा दुसरा क्रिकेटपटू बनला. रोहितच्या एकूण आयपीएल कारकीर्दीमध्ये तो तब्बल १६ वेळा शून्यावर बाद झाला आहे. दिनेश कार्तिक हा आयपीएलमध्ये सर्वात जास्त वेळा डक मिळणारा खेळाडू हा होता. रोहितने दिनेश कार्तिकशी बरोबरी केल्याचे आपल्याला पाहायला मिळते.

IND vs AUS Pitch Invader At The MCG Tried to Hug Virat Kohli and Dances on Ground in Melbourne Test Watch Video
IND vs AUS: विराटच्या खांद्यावर ठेवला हात अन् मग केला डान्स, मेलबर्न कसोटीत अचानक मैदानात घुसला चाहता; VIDEO होतोय व्हायरल
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Rohit Sharma To Open in MCG Test Confirms India Assistant Coach Abhishek Nayar IND vs AUS
IND vs AUS: रोहित शर्मा मेलबर्न कसोटीत कितव्या क्रमांकावर फलंदाजी करणार? अखेर गूढ उकललं; कोचने दिले मोठे अपडेट
Jasprit Bumrah Bowled Out Travis Head on Duck and Breaks Anil Kumble Record of Most Wickets At MCG IND vs AUS
IND vs AUS: ऑस्ट्रेलियाचा तारणहार हेड असा झाला त्रिफळाचीत; जसप्रीत बुमराहने नावावर केला अनोखा विक्रम, पाहा VIDEO
IND vs AUS Ricky Ponting statement on Virat Kohli and Sam Konstas argument at MCG
IND vs AUS : “त्याने टक्कर होण्यास…”, विराट-कॉन्स्टासच्या धक्काबुकीवर प्रकरणावर रिकी पॉन्टिंगचे मोठे वक्तव्य
IND vs AUS Sam Konstas Statement on Fight With Virat Kohli at Melbourne Test Watch Video
IND vs AUS: “मैदानावर जे काही…”, विराट कोहलीबरोबर झालेल्या धक्काबुक्कीवर सॅम कोन्स्टासचं वक्तव्य, पाहा नेमकं काय म्हणाला?
Sam Konstas hit six against Jasprit Bumrah after 4483 balls in IND vs AUS Boxing Day Test at Melbourne match
IND vs AUS : सॅम कॉन्स्टासने जसप्रीत बुमराहविरुद्ध षटकार लगावत लावली विक्रमांची रांग! पाहा संपूर्ण यादी
IND vs AUS Boxing Day Test Sam Konstas hit six against Jasprit Bumrah after 4483 balls
IND vs AUS : १९ वर्षीय खेळाडूने जसप्रीत बुमराहविरुद्ध केला मोठा पराक्रम, ११४५ दिवसांनी मोडला खास विक्रम

Duck होणं म्हणजे नक्की काय?

फक्त रोहित शर्माच नाही तर या हंगामामध्ये अनेक दिग्गज खेळाडूंना Duck मिळाले आहे. क्रिकेटमध्ये डक हा शब्द सर्रास वापरला जातो. फलंदाजी करणारी व्यक्ती शून्यावर बाद झाल्यास त्याला ‘डक’ असे म्हटले जाते. बदकाचे अंडं हे शून्याप्रमाणे दिसते. त्याच्यावरुनच किक्रेटमध्ये हा शब्द प्रचलित झाला आहे. या शब्दाचा उल्लेख १८६६ मध्ये झाला होता. ‘प्रिन्स ऑफ वेल्स’ शून्यावर बाद झाल्यावर एका वर्तमानपत्रामदध्ये “प्रिन्स हे बदकाच्या अंड्यावर बसून आपल्या तंबूत परत गेले” अशी बातमी प्रकाशित करण्यात आली होती. तेव्हा शून्यावर बाद होणाऱ्या व्यक्तीला Duck Egg असं म्हणत चिडवले जात असे. पुढे त्यातील Egg शब्दाचा वापर करणं लोकांनी सोडून दिले आणि फक्त Duck हा शब्द उरला.

क्रिकेटमधील Ducks चे प्रकार कोणकोणते आहेत?

Golden Duck – पहिल्याच चेंडूवर एकही धाव न करता फलंदाज बाद झाल्यास त्याला ‘गोल्डन डक’ म्हटले जाते.

Diamond Duck – Non-Stricker असलेला फलंदाज एकही धाव न करता आणि एकही चेंडू न खेळता बाद झाल्यास त्याला ‘डायमेड डक’ म्हटले जाते.

Platinum Duck – इनिंग्सच्या पहिल्या चेंडूवर बाद झाल्यावर फलंदाजाला ‘प्लॅटिनम डक’ मिळाला असे म्हटले जाते.

Titanium Duck – सलामीवीर फलंदाज इनिंग्सच्या पहिल्या चेंडूवर बाद झाला, तर त्या गोष्टीला ‘टायटेनियम डक’ म्हटले जाते.

आणखी वाचा – तुम्हाला ‘CRICKET’चा फुल फॉर्म माहीत आहे का? जेंटलमन्स गेम म्हणण्याला आहे ‘हे’ खास कारण

Pair – एखादा फलंदाज कसोटी सामन्यातील दोन्ही डावांमध्ये एकही धाव न करता बाद झाल्यास त्याला ‘पेअर’ म्हणतात.

King Pair – सामन्यातील दोन्ही डावांमध्ये पहिल्याच चेंडूत बाद झाल्यास ‘किंग पेअर’ असे म्हणतात.

Audi – जर एखादा फलंदाज सलग चार वेळा डक मिळाल्यावर त्याला ‘ऑडी’ असे म्हटले जाते. चार डक्समुळे (००००) अशी आकृती दिसते. ही आकृती ऑडी कंपनीच्या लोगो प्रमाणे असल्याने हा शब्द क्रिकेटमध्ये प्रचलित झाला. काहीजण या स्थितीला ‘Olympic rings’ असेही म्हणतात.

आतापर्यंत बॉब हॉलंड (१९८५), अजित आगरकर (१९९९-२०००) आणि मोहम्मद आसिफ (२००६) या तीन खेळाडूंच्या नावावर ऑडी करण्याचा विक्रम आहे. अजित आगरकर हे मुळचे मुंबईचे असल्याने त्यांना ‘Bombay Duck’ असे नाव पडले होते.

Story img Loader