Election Commission SOP for Bag Checking : निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचलेला असताना नव्या वादाला तोंड फुटलं आहे. विविध स्टार प्रचारक अन् महत्त्वाच्या नेत्यांच्या बॅगा तपासल्या जात आहेत. उद्धव ठाकरे यांनी यावरून आवाज उठवल्यानंतर अनेक नेत्यांनी यावरून बोलायला सुरुवात केली. आतापर्यंत सर्वपक्षीय नेत्यांच्या बॅगा तपासण्यात आल्या आहेत. परंतु, विरोधी पक्षांना जाणीवपूर्वक टार्गेट केलं जातंय, असा दावा विरोधकांनी केलाय. त्यामुळे आचारसंहितेच्या काळात अशा पद्धतीने बॅगा तपासण्याचे अधिकार निवडणूक आयोगाला असतात का? त्यासाठीची निवडणूक आयोगाची नियमावली नेमकी काय हे जाणून घेऊयात.

राजकीय नेत्यांचे हेलिकॉप्टर अन् बॅग तपासणारे अधिकारी कोण असतात?

निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आचारसंहिता लागू होते. त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी चार प्रकारची पथकं स्थापन केली जातात. यापैकी फ्लाईंग स्क्वाड टीम ( एफएसटी) आणि स्टॅटीक सर्विलन्स टीम ( एसएसटी ) ही दोन मुख्य पथकं असतात, याशिवाय नेत्यांच्या सभांवर लक्ष ठेवण्यासाठी व्हिडीओ रेकॉर्डीग टीम आणि भाषणं तपासण्यासाठी व्हिडीओ तपासणी टीम या दोन पथकांचाही समावेश असतो. लोकप्रतिनिधी कायद्यांतर्गत या पथकांची नियुक्ती केली जाते आहे. निडणुकीची घोषणा झाल्यापासून ते निकाल जाहीर होईपर्यंत ही पथकं कार्यरत असतात, अशी माहिती छत्रपती संभाजीनंतरचे निवडणूक अधिकारी विकास मीणा यांनी दिली आहे. ते एबीपी माझा यावृत्तावाहिनीशी बोलत होते.

yogi Adityanath told mahavikas aghadi problem
काँग्रेस आघाडी ‘समस्या’; तर भाजपा महायुती ‘समाधान’ – योगी आदित्यनाथ
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
sharad pawar replied to devendra fadnavis
“…तर देवेंद्र फडणवीसांनी माझं स्थान ओळखलं पाहिजे”, ‘त्या’ गौप्यस्फोटावरून शरद पवारांचा टोला!
pimpri chinchwad Sanjay raut
Sanjay Raut: १७ तारखेला शिवतीर्थावर सांगता सभा होणार – खासदार संजय राऊत
BJP Brought these issues in Election
BJP : ‘लव्ह जिहाद’ ते ‘व्होट जिहाद’, ‘रझाकार’ ते ‘हिंदुत्व’ भाजपाने विधानसभा निवडणुकीत कुठले मुद्दे आणले?
politics of religion and caste still resonate in Maharashtra
लेख : जात खरंच जात नाही का?
Maval Vidhan Sabha, Sunil Shelke, Bapu Bhegade,
मावळ विधानसभा: अजित पवारांचे शिलेदार सुनील शेळकेंच्या आमदारकीची वाट बिकट! महायुतीत पडले एकटे?
Kasba Constituency, Ravindra Dhangekar,
विचारांची लढाई विचारांनी लढली पाहिजे : रविंद्र धंगेकर

हेही वाचा >> बॅग तपासणीवरून वादंग; उद्धव ठाकरे आणि मल्लिकार्जुन खरगेंसह ‘या’ नेत्यांचेही सामान तपासले

बॅग तपासणीबाबत नियमावली काय? (Election Commission SOP)

महाराष्ट्रभर सहा हजार फ्लाईंग स्क्वाड टीम (एफएसटी) आणि स्टॅटीक सर्विलन्स टीम (एसएसटी) कार्यरत आहेत. तर १९ यंत्रणाही कार्यरत आहेत. एफएसटी, एसएसटी आणि अंमलबजावणी यंत्रणांकडून जप्तीची कार्यवाही केली जाते. वाहनातून रोकड, मद्यसाठा सापडल्यास त्याचे धागेदोरे तपासण्याचे काम या यंत्रणांकडून केले जाते, अशी माहिती अतिरिक्त निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी यांनी दिली. ते एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

किरण कुलकर्णी पुढे म्हणाले, “बॅग चेक करणे एफएसटीचा कार्यवाहीचा भाग आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाने नियमावली दिली आहे. एखादा नेता, स्टार प्रचारक हेलिकॉप्टर किंवा खासगी विमानाद्वारे नॉन कमर्शिअल विमानतळावर उतरत असेल तर त्याच्या बॅगेची तपासणी केली पाहिजे. यामध्ये त्या व्यक्तीची किंवा हॅलिकॉप्टरची तपासणी करणं अपेक्षित नसतं. हॅण्डबॅगचीही तपासणी केली जात नाही. परंतु, अशा काही बॅगा जर मतदारसंघात उतरत असतील तर त्यांची चेकिंग झाली पाहिजे अशी नियमावली आहे. अशा पद्धतीने निवडणूक आयोगाची टीम काम करत असते. सर्वपक्षीय नेत्यांच्या बॅगा तपासल्या जातात. सर्वसामान्य प्रवाशांच्याही बॅगा तपासल्या जातात. आचारसंहितेच्या काळात हा प्रक्रियेचा भाग असतो.”

हेही वाचा >> राजकीय नेत्यांचे हेलिकॉप्टर अन् बॅग तपासणारे अधिकारी कोण असतात? एफएसटी पथक म्हणजे काय? जाणून घ्या!

फक्त विरोधकांच्याच बॅगा तपासल्या जातात का?

आचारसंहितेच्या काळात फक्त विरोधकांच्याच बॅगा तपासल्या गेल्या असा दावा विरोधकांकडून केला जातोय. या आरोपावर किरण कुलकर्णी म्हणाले, “निवडणूक आयोगाच्या नियमानुसार आम्ही सिलेक्टिव्ह कारवाई करत नाही. सर्वच राजकीय पक्षांचे स्टार प्रचारक आणि नेत्यांच्या बॅगची तपासणी केली जाते.”