कॉलेजचा कट्टा असो वा मित्रांसोबत कुठे बाहेर फिरायला जायचा प्लॅन असो, आपल्या बॅगमध्ये आपण सर्वात आधी भरुन ठेवतो ते म्हणजे चिप्सचे पॅकेट. चिप्स हा देशभरातील जास्त खपाचा आणि लोकप्रिय असा खाद्यपदार्थ आहे. चिप्स हे चटपटीत आणि हलके-फुलके असतात त्यामुळे ते सर्वच वयोगटातील लोकं ते आवडीने खातात.

पण चिप्स खाणाऱ्या जवळपास सगळ्याच लोकांच्या मनात एकच प्रश्न उपस्थित होतो. तो म्हणजे, या पॅकेटमध्ये चिप्सपेक्षा जास्त हवाच का भरली जाते? यावर अनेक जणांची अनेक प्रकारची उत्तर देखील तुम्ही ऐकली असतील. काही लोकं म्हणतात, पॅकेटच वजन वाढवण्यासाठी ही हवा भरली जात असावी. तर काही म्हणतात केवळ पॅकेट छान दिसावं म्हणून ही हवा भरली जाते. या सगळ्या ऐकीव गोष्टी झाल्या पण चिप्सच्या पॅकेटमध्ये हवा का भरली जाते? त्या पॅकेटमध्ये कोणता गॅस असतो आणि तो गॅस या पॅकेटमध्ये भरणं किती गरजेचं असतं ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Boondi curry recipe in Marathi how to make Boondi curry recipe
रोज काय भाजी करावी सुचत नाही? घरात असलेल्या बुंदीची करा “बूंदी करी”; झक्कास होईल बेत
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
nashik Crowd management preparations for Kumbh Mela are based on Ramani Commissions reports
नाशिकच्या कुंभमेळ्यातील गर्दी व्यवस्थापनासाठी रमणी अहवालाचा आधार
lays classic potato chips recall from market in us
Lays Potato Chips: ‘लेज’च्या ‘या’ चिप्समुळे जिवाला धोका? तक्रारीनंतर कंपनीनं हजारो पाकिटं माघारी घेतली, नेमकं घडलं काय?
Fried Modak Recipe
Modak Recipe : माघी गणेश जयंतीला फक्त १ वाटी गव्हाच्या पिठाचे बनवा कुरकुरीत ‘मोदक’; रेसिपी वाचा पटकन
Khandeshi Shev Bhaji Recipe In Marathi
अस्सल झणझणीत खानदेशी शेव भाजी, रेसिपी वाचून तोंडाला सुटेल पाणी
nikki tamboli and samir choughule
Video: निक्की तांबोळी आणि समीर चौघुले यांनी सांगितली चमचमीत बटाटावड्याची रेसिपी; पाहा व्हिडीओ
Cooking Hacks For Every Working Woman Cream Sandwich recipe in marathi
सकाळी लवकर उठून डबा बनवायचा कंटाळा आला तर एक दिवस आधी बनवा सँडविच; सोबतच या टिप्स फॉलो करा स्वयंपाक होईल सुपरफास्ट

आणखी वाचा- Plastic Bottles: विकत घेतलेल्या प्लॅस्टिकच्या बाटलीतील पाणी आपल्या आरोग्यासाठी सुरक्षित आहे की विषारी कसे ओळखाल? फक्त ‘हा’ कोड लक्षात ठेवा…

पॅकेटमध्ये हवा भरण्याचं कारण –

अनेकजण म्हणतात की, पैसे कमावण्यासाठी कंपन्या चिप्सच्या पॅकेटमध्ये हवा भरते. मात्र, तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की, चिप्सच्या पॅकेटमध्ये हवा भरुन ते पॅकेट दुकानदारांपर्यंत पोहचवण्यासाठी खूप खर्च येतो. त्यामुळे चिप्सचा दर देखील वाढतो. तरी देखील कंपन्यांना पॅकेटमध्ये गॅस भरणं गरजेचं असतं. समजा जर चिप्सच्या पॅकेटमध्ये गॅस भरला नसता तर, फॅक्ट्रीमधून चिप्स तुमच्या हातात येईपर्यंत त्याचा पूर्ण चूरा झाला असता आणि ते खाण्यायोग्य राहिले नसते.

पॅकेटमध्ये कोणता गॅस असतो –

आणखी वाचा- वेस्ट डिटर्जंट पावडरच्या पाण्याचाही करता येतो अनेक ठिकाणी वापर; जाणून घ्या कसा

पॅकेटमध्ये चिप्स भरल्यानंतर त्या ठिकाणी ऑक्सिजन किंवा साधारण हवा नसते तर तो नायट्रोजन गॅस असतो. चिप्सच्या पॅकेटमध्ये नायट्रोजन गॅस भरला जातो. कारण, चिप्स बनवताना बटाट्याचे लहान लहान तुकडे केले जातात. यावेळी वातावरणातील काही घटकामुळे बटाट्याच्या चिप्समध्ये बैक्टीरिया तयार होतो. बाहेर उघड्या हवेत कोणताही पदार्थ ठेवलात तर तो खराब किंवा नरम होतो.

शिवाय नरम झालेले पदार्थ आपणाला खावेसे वाटतं नाहीत. नायट्रोजन पॅकेटमध्ये इतर कोणत्याही गॅसप्रमाणे रासायनिक क्रिया करत नाही. त्यामुळे चिप्स कुरकुरीत, फ्रेश आणि चविष्ट रहावेत म्हणून पॅकेटमध्ये नायट्रोजन गॅस भरला जातो.

Story img Loader