भारतामध्ये तुरुंगवासाची शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांसाठी ठराविक गणवेश असतो. बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये आपण कैद्यांचे हे कपडे पाहिलेले असतात. शिक्षा झालेल्या गुन्हेगारांना पांढऱ्या रंगावर काळ्या रंगाच्या पट्ट्या असलेले हे कपडे परिधान करावे लागतात. कारागृहातील नियमांमध्ये कपड्यासंबंधित नियमांचा समावेश असतो.

कैद्यांना वेगळा गणवेश देण्याची सुरुवात कधी झाली?

अठराव्या शतकात अमेरिकेमध्ये न्यायव्यवस्थेमध्ये काही नवे नियम तयार केले गेले होते. यात शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांनी ठराविक गणवेश परिधान करावा असा नियम लागू करण्यात आला होता. या व्यतिरिक्त त्यांनी तुरुंगामध्ये कसे राहावे, काय काम करावे याबाबतही काही गोष्टी निश्चित करण्यात आल्या होत्या. यामुळे आधुनिक तुरुंगांची सुरुवात झाली असे म्हटले जाते. ब्रिटीशांच्या काळात हा नियम आपल्या देशामध्ये लागू करण्यात आला होता. सुरुवातीला कैद्यांचा गणवेश हा करड्या-काळ्या रंग असलेल्या कपड्यावर पट्टे असलेल्या कपड्याचा वापर आपल्या देशातील कैद्यांना करावा लागत असे.

Ajit Gavane statement that distribution of money is defamatory because defeat is visible
भोसरी विधानसभा: पराभव दिसत असल्याने पैसे वाटप केल्याची बदनामी – अजित गव्हाणे
voter turnout increase
Voter Turnout Increase: ‘शेवटच्या तासात लाखोंच्या संख्येने मतदान…
Cash theft of four lakhs by breaking the door of the clothing store pune news
वस्त्रदालानाचा दरवाजा उचकटून पावणेचार लाखांची रोकड चोरी
Soybean Price, Vidarbha, Ladki Bahin Yojana,
विरोधकांचे ‘सोयाबीन अस्त्र’ ‘लाडक्या बहीण’चा प्रभाव रोखणार ?
makarand deshpande starrer movie pani puri
आहे चटकदार पण…
in pune katraj person with country made pistol arrested by Crime Branchs Anti Robbery Squad
पिस्तूल बाळगणारा सराइत गजाआड, कात्रज बाह्यवळण रस्ता परिसरात कारवाई
husband of former BJP corporator, kidnapping,
पिंपरी : अपहरण, मारहाण प्रकरणी भाजपच्या माजी नगरसेविकेचा पती, माजी स्वीकृत सदस्यासह ११ जणांवर गुन्हा

या गणवेशाच्या रंगामागील खरं कारण काय आहे?

अनेक अहवालांनुसार, जर एखादा गुन्हेगार तुरुंगातून पळून जाण्यात यशस्वी ठरला, तर कपड्यांवरुन त्याला ओळखणे सोपे होते. अशा पद्धतीचे कपडे सामान्य: कोणीही परिधान करत नाहीत. त्यामुळे गर्दी असतानाही पळून जाणाऱ्या कैद्याकडे पांढऱ्या गणवेशामुळे सहज लक्ष जाते. कधीकधी सर्वसामान्य लोकदेखील कपडे पाहून कैद्यांची माहिती पोलिसांना देतात.याशिवाय कपड्यांची ही रंगसंगती Symbol of shame दर्शवते असेही म्हटले जाते.

आणखी वाचा – भारतात एकूण किती प्रकारची कारागृहे आहेत; त्यात कैदी कसे राहतात, काय करतात? जाणून घ्या

पांढऱ्या रंगाचा फायदा

भारतातील तुरुंगांमध्ये पंखा, कूलर अशा कोणत्याही व्यवस्था नसतात. कैद्यांना उकडत असतानाही गरम वातावरणामध्ये झोपावे लागते. उन्हाळ्यात हा त्रास वाढत जातो. कपड्याच्या रंगामुळेही गरम होऊ शकते. अन्य रंगांच्या तुलनेमध्ये पांढरा रंग कमी प्रमाणात उष्णता शोषून घेत असतो. पांढऱ्या रंगामुळे कैद्यांना कमी त्रास होतो.