भारतामध्ये फार पूर्वीपासून पाणी साठवण्यावर भर दिला जात आहे. पूर्वी विहिरी, कालव्यांमध्ये सार्वजनिकरित्या पाणी साठवले जात असे. कालांतराने लोक वैयक्तिकरित्या घरामध्ये पाणी साठवून ठेवायला लागले. बहुतांश ठिकाणी पाणी येण्याचा ठराविक कालावधी असतो. काही मिनिटांमध्ये दिवसभर पूरेल इतक्या पाण्याचा साठा करणे आवश्यक असते. एखाद्या दिवशी पाणी न आल्यास त्रास नको म्हणून प्रत्येकजण आपल्या घरामध्ये पाण्याची टाकी बसवून ठेवत असल्याचे पाहायला मिळते. सिमेंटच्या टाक्यांऐवजी पीव्हीसी किंवा प्लास्टिकच्या टाक्यांचा वापर अधिक प्रमाणात पाहायला मिळतो. ग्रामीण भागामध्ये यांचा जास्त वापर केला जात आहे.
उन्हाळ्यामध्ये काही ठिकाणी पाणी कमी प्रमाणात येत असते. तेव्हा या टाक्यांमध्ये साठवलेल्या पाण्याची मोठी मदत होते. घराच्या छतावर किंवा गच्चीवर असलेल्या या पाण्याच्या टाक्यांमुळे दैनंदिन जीवनामध्ये पाण्याची टंचाई भासत नाही. पण या टाक्या काळ्या रंगाचा का असतात असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? या काळ्या रंगामागील खरं कारण आज आम्ही सांगणार आहोत.
पाण्याच्या टाक्या काळ्या असण्यामागील कारण
घरात किंवा घराबाहेर पाणी साठवण्यासाठी टाक्याचा वापर केला जातो. या टाक्या प्रामुख्याने काळ्या, पांढऱ्या किंवा निळ्या रंगाच्या असतात. या व्यतिरिक्त रंगांमध्ये आणखीही पर्याय उपलब्ध आहेत. असे असले तरी ग्राहक मुख्यत्त्वे काळा रंग असलेली पाण्याची टाकी वापरणे पसंत करतात. पाणी एका ठिकाणी साठून राहिल्यावर त्याच्यावर शेवाळ तयार व्हायला लागते. तलाव किंवा डबक्यांवर अशा प्रकारचे शेवाळ पाहायला मिळतात. टाक्यांमध्ये पाणी साठवून ठेवल्यानंतर त्यामध्येही शेवाळ यायला सुरुवात होते. सूर्यप्रकाशामुळे शेवाळाच्या निर्मितीची वेग मंदावतो. काळा रंग हा इतर रंगांपेक्षा जास्त सूर्यांची किरणे शोषून घेत असतो. शेवाळ तयार होऊ नये यासाठी काळ्या रंगाच्या पाण्याच्या टाक्यांचा वापर केला जातो.
आणखी वाचा – …म्हणून पाणीपुरीच्या स्टॉलवर लाल रंगाचा कपडा ठेवला जातो; खरं कारण वाचून व्हाल थक्क
याचा एक दुष्परिणाम देखील आहे. उन्हाळ्यामध्ये या टाक्या जास्त गरम होतात. जास्त प्रमाणात गरम झाल्यावर त्या फुटण्याची शक्यता असते. अतिउष्णता आणि अतिदाबामुळे टाकी फुटू शकते. असे घडू नये म्हणून त्यांच्याभोवती गोलाकार पट्टा असल्याचे पाहायला मिळते. यामुळेच बहुतांश टाक्या या वर्तुळाकार आकारामध्ये असतात असेही म्हटले जाते.