तुम्ही कधी सार्वजनिक शौचालय असो किंवा घरातील बाथरुम असो… तुम्हाला सहसा पांढरा रंगाचे कमोड किंवा बेसिन पाहायला मिळते. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, लोक रंगीबेरंगी कमोड का वापरत नाही. कदाचित बेसिन तुम्हाला रंगीबेरंगी पहायला मिळतीलही पण कमोड मात्र तुम्हाला पांढरेच पहायला मिळतात. जर तुम्हाला असे वाटतं असेल की यामागे फक्त स्वच्छता हे कारण असेल तर तुम्ही चुकीचे आहात. यामागील शास्त्रीय कारण काय आहे हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. त्यासोबत रंगीबेरंगी बेसिन घेणे योग्य असते की पांढरे बेसिन जास्त योग्य असते हे देखील सांगणार आहोत.
कमोडचा रंग पांढराच का असतो?
लोकांना वाटते की, शौचालयातील कमोड पांढरे असते कारण त्यावरी घाण लगेच दिसेल आणि व्यवस्थित स्वच्छता केली जाईल.काही लोक असेही मानतात की, पांढरा स्वच्छतेचा रंग आहे आणि नेहमी चांगला दिसतो त्यामुळे कमोडचा रंग पांढरा असतो. पण असे नाही. खरं तर कमोड ज्या मटेरिअलपासून तयार केले जाते, त्याला सिरॅमिक किंवा पोर्सिलेन म्हणतात. त्याचा रंग पुर्ण पांढरा असतो. त्यामुळे कमोड सहसा पांढरा रंगाचे असते. पण काही कंपन्या कमोड किंवा बेसिनमध्ये गुलाबी, पिवळा, निळा किंवा हिरवा रंग देखील उपलब्ध करून देतात पण बाजारात त्याची मागणी फार कमी आहे आणि ते तयार करण्यासाठी सिरॅमिकमध्ये रंग मिसळला जातो, ज्यामुळे त्याच्या गुणवत्तेमध्ये घट होते. त्यामुळे जास्त लोक पांढरे कमोड त्यांच्या बाथरुममध्ये लावण्यास प्राधन्य देतात.
हेही वाचा : कुल्फी विक्रेते बर्फामध्ये मीठ का टाकतात? काय आहे यामागील शास्त्रीय कारण, जाणून घ्या
आता सिरॅमिक किंवा पोर्सिलेन काय असते समजून घ्या
सिरॅमिक किंवा पोर्सिलेन ज्यामध्ये सोप्या भाषेमध्ये साखर मिठाच्या नावाने ओळखले जाते, हा असा पदार्थ आहे ज्याला विशेष प्रकारच्या मातीपासून तयार केले जाते. सिरॅमिक किंवा पोर्सिलेनला उच्च गुणवत्तेचे विसंवाहक पदार्थ मानले जाते. बहुतेकदा विजेच्या कामामध्ये विसंवाहक पदार्थाच्या स्वरुपामध्ये. याचा वापर केला जातो. तसेच या वापर टाईल्स, कमोड आणि भाडी तयार करण्यासाठी देखील केला जातो. सिरॅमिक किंवा पोर्सिलेनचा निर्माण सिलिका, अल्युमिना, मॅग्नेशिया, बोरॉन ऑक्साईड आणि झिरकोनियम इद्यादींचे मिश्रणातून तयार केले जाते.