गोवा म्हटले की आपल्या नजरेसमोर समुद्रकिनारा येतो. गोव्याच्या किनाऱ्यांवर लोकांना फिरायला जाण्याची इच्छा असते. कित्येक जण मित्र-मैत्रिणींसोबत ट्रिपसाठी गोव्याला जातात. निसर्गसौंदर्याशिवाय आणखी एका गोष्टीसाठी गोवा प्रसिद्ध आहे, ती म्हणजे बिअर. जे लोक गोव्याला कधीही गेले नाही त्यांना असे वाटते की, गोव्यामध्ये बिअर स्वस्त मिळते. कित्येकांचे असे मत आहे की, पाण्याच्या किमतीत बिअर मिळते. कित्येक लोक हे बिअर कल्चर अनुभवण्यासाठी तेथे जातात. तुमच्या मनातदेखील गोव्यामध्ये मिळणाऱ्या बिअरबाबत असे प्रश्न आहेत का? आज तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आम्ही तुम्हाला देणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सर्वात आधी आम्ही तुम्हाला सांगतो की. गोव्यामध्ये बिअर स्वस्त मिळते की नाही आणि मिळत असेल तर ती इतकी स्वस्त का मिळते? तसेच हेदेखील जाणून घेऊ या की गोव्यामध्ये असे काय आहे ज्यामुळे बिअरचा दर इतका कमी आहे आणि येथील बिअरची इतकी चर्चा का होते? चला तर मग जाणून घेऊ या.

गोव्यामध्ये बिअर स्वस्त मिळते का?

गोव्यामध्ये मिळणाऱ्या बिअरबाबत सांगायचे झाले, तर येथील दर देशातील इतर राज्यांच्या तुलनेने कमी आहे. जर दिल्लीशी तुलना केली, तर बिअरचे दर खूपच कमी आहेत. सहसा बिअरचा दर ब्रँड, क्वालिटी या गोष्टींवर अवलंबून असतो, पण येथे सरासरी बिअरचा दर खूप कमी आहेत. हा फरक ब्रँडनुसार वेगवेगळा असतो, पण येथे बिअरचा दर सरासरी साधारण २५ टक्के कमी असतो. त्यामुळे गोव्यात येऊन लोक बिअर पिण्यास पसंती देतात.

हेही वाचा – Chat नव्हे ChaiGPT, चहा विक्रेत्याचा स्मार्ट जुगाड! दुकानाला दिले भन्नाट नाव, व्हायरल झाले फोटो

उदाहरणार्थ, काही ब्रँडची बिअर जी दिल्लीमध्ये १३० रुपयांना मिळते तीच बिअर गोव्यामध्ये ९०-१०० रुपयांमध्ये खरेदी केली जाऊ शकते. दरांमधील फरक बाटलीचा प्रकार, पॅकेजिंगच्या आधारावर वेगवेगळा असू शकतो. आता तुम्ही अंदाज बांधू शकता की, गोव्यात बिअर किती स्वस्त मिळते.

गोव्यात बिअर इतकी स्वस्त का मिळते?

  • गोव्यामध्ये बिअर स्वस्त होण्याची अनेक कारणे आहेत, ज्यामुळे बिअरचे दर खूप कमी असतात. याचे मुख्य कारण आहे येथील कर प्रणाली. गोव्यामधील कर प्रणालीनुसार मद्यावरील कर खूप कमी आहे. ज्यामुळे इतर राज्यांपेक्षा बिअरचा दर येथे खूप कमी आहे. आपल्या देशामध्ये मद्य जीएसटीच्या अंतर्गत येत नाही. ज्यामुळे मद्याचे दर निश्चित करण्यामध्ये राज्य सरकार महत्त्वाची भूमिका पार पाडते. त्यामुळे तेथील बिअरवरील कराची टक्केवारी खूपच कमी आहे.
  • याशिवाय गोव्यामध्ये मद्य विक्रीचे टेंडर मिळवणे फार अवघड काम नाही. त्यामुळे येथे मद्याच्या दुकानांची संख्या खूप जास्त आहे. त्यामुळे स्पर्धादेखील खूप जास्त असल्यामुळे मद्याचे दर कमी असू शकतात. गोव्यात दारूची दुकाने इतकी आहेत की, तुम्हाला काही मीटर अंतरावर एक मद्यविक्री करणारे दुकान मिळेल. त्यामुळेदेखील मद्याचे दर कमी असू शकतात.
  • याशिवाय पर्यटनाला चालना देण्यातदेखील बिअर महत्त्वाची भूमिका पार पाडते. त्यामुळे बिअरसाठी लोक गोव्यात पर्यटनाला येतात. पर्यटनाला चालना देण्यासाठी दर जास्त वाढवले जात नाहीत.
  • गोव्यामध्ये इतर राज्यांच्या तुलनेत कित्येक स्थानिक ब्रँडदेखील आहेत ज्यामुळे साहजिकच मद्याचे दर कमी होतात. तसेच मद्यासाठी लागणारा कच्चा मालदेखील येथे सहज उपलब्ध होतो.
  • गोव्यामध्ये इतर राज्यांच्या तुलनेत मद्यउत्पादन स्वस्त आहे आणि त्याचा परिणाम दरावरदेखील होतो.
मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why beer prices are cheap in goa than other states know all details here beer rates in goa snk
Show comments