सकाळी सकाळी उठल्यावर वीजेच्या तारांवर किंवा झाडाच्या फांद्यांवर पक्षांचा किलबिलाट सुरु झालेला पाहायला मिळतो. अनेक पक्षी गाढ झोपलेले असतात. पक्षी शांतपणे कसे झोपतात, हे पाण्यासाठी तुम्हाला सकाळी सूर्योदय होण्याआधी उठावे लागेल. मग अशातच सवाल उपस्थित होतो की, हे पक्षी झोपेत असतानाही त्यांचा तोल जाऊ देत नाहीत आणि तारेवरून किंवा झाडाच्या फांदीवरून खाली का पडत नाहीत, यामागे कशाप्रकारचं विज्ञान दडलेलं आहे, याबाबत जाणून घेऊयात सविस्तर माहिती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पक्षी झोपेत असताना खाली का पडत नाहीत?

तज्ज्ञ सांगतात की, पक्षी जेव्हा झोपतात तेव्हा ते दोन्ही डोळे बंद करत नाहीत. तर ते एक डोळा उघडा ठेवून झोपतात आणि याच उघड्या डोळ्यामुळे त्यांचा अर्धा मेंदू सक्रिय राहतो. याच सक्रिय मेंदूच्या मदतीने ते तारेवर किंवा फांद्यांवर त्यांचा तोल सांभाळत असतात. म्हणजेच पक्षी पूर्णपणे गाढ झोपत नाहीत. ते नेहमी अर्ध्या झोपेत असतात. तसंच पक्षांच्या पायाची रचना अशा पद्धतीची असते की, ते जिथे कुठे बसतात त्या ठिकाणी ते घट्ट पकड करून ठेवतात.

नक्की वाचा – कुणी घर देतं का घर? मुंबईत घर शोधताना मुस्लीम तरुणीला करावा लागला संघर्ष, मित्र ट्वीटरवर म्हणाला, ‘द केरला स्टोरी’ चित्रपटामुळे…”

कोणते पक्षी दोन्ही डोळे उघडे ठेवून झोपतात ?

आतापर्यंतच्या सर्वेक्षणातून अशा गोष्टी समोर आल्या आहेत की, जास्तीत जास्त पक्षी झोपताना डोळे बंद ठेवतात. परंतु, घुबड हा एकमेव पक्षी असा आहे, जो डोळे बंद करून झोपतो. परंतु, वैज्ञानिक दृष्टीकोनातून पाहिलं तर, हे सुद्धा तितकचं खरं वाटणार नाही. कारण घुबडाचे एक किंवा दोन नाही तर तीन पंख असतात. एक पंख झोपण्यासाठी, दुसरा पंख डोळ्यांची साफसफाई करण्यासाठी तर तिसरा पंख उडण्यासाठी. त्यामुळे बाहेरचा पंख खाली पडू न देता घुबड त्यांच्या आतील पंखांच्या मदतीने झोपत असतात.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why birds dont fall down after sleeping on electric wires know the science behind birds life general knowledge latest news nss
Show comments