प्रश्न: आपल्या रक्ताचा रंग लालच का असतो?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उत्तर : रक्तात असणाऱ्या हिमोग्लोबिन या प्रथिनामुळे आपल्या रक्ताचा रंग लाल होतो. हिमोग्लोबिनमध्ये ‘हीम’ हा लाल रंगाचा घटक असतो. हिममध्ये असणारे लोह हे ऑक्सिजनबरोबर क्रिया करून शरीरात सर्वत्र ऑक्सिजन पोहोचविण्याचे काम करतो. लोहात लाल रंग परावíतत करू शकण्याची क्षमता असते. तसे बघता एखादी वस्तू आपल्याला विशिष्ट रंगाची का दिसते? प्रकाशकिरण त्या वस्तूवर पडल्यावर काही किरणे ती वस्तू परावर्तित करते तर काही शोषून घेते. जो रंग ती (विशिष्ट रंगाची तरंगलांबी (वेव्हलेंथ ) असणारे किरण) वस्तू परावर्तित करते त्या रंगाची ती वस्तू आपल्याला दिसते. ऑक्सिजनबरोबर असणारा हिमोग्लोबिनचा रेणू निळा व हिरवा रंग शोषून घेतो व लाल रंगाला परावर्तित करतो म्हणून आपल्याला रक्त तांबडय़ा रंगाचे दिसते.

– डॉ. मनीषा कर्पे (मराठी विज्ञान परिषद, अंबरनाथ विभाग)

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why blood is red scsg
Show comments