Why Blue tiles used in swimming pool: उन्हाळ्याची झळ बसायला लागली की पर्यटक थंड हवेच्या ठिकाणी फिरण्याचा मार्ग शोधत असतात. यात पर्यटक आणि जलतरणपटूंची आवडीची जागा म्हणजे रिसॉर्ट किंवा स्विमिंग पूल. स्विमिंग पूलचं क्रेझ भारतासह जगभरात वाढलेलं आहे. थंड पाण्यात आपला वीकेंड घालवण्यासाठी लोक आपल्या कुटुंबासह आणि मित्रपरिवारासह स्विमिंग पूल असणाऱ्या ठिकाणी जातात. पण, तुम्ही कधी विचार केला आहे का की स्विमिंग पूलमध्ये असणाऱ्या टाइल्स नेहमी निळ्या रंगाच्याच का असतात?
पूलमध्ये वेगवेगळ्या कारणांसाठी निळ्या रंगाच्या टाइल्स वापरतात. इतर रंगांपेक्षा निळ्या रंगाच्या टाइल्सला प्राधान्य का दिले जाते हे शोधण्यासाठी यातील विज्ञान समजून घेणे आवश्यक आहे. जलतरण तलावांमध्ये निळ्या टाइल्स इतक्या सामान्य का आहेत, याची मुख्य कारणे खालीलप्रमाणे:
पाण्याची अभिजातता (The elegance of water)
निळ्या टाइल्समुळे जलतरण तलाव सुंदर दिसतात आणि स्वागतार्ह वाटतात. निळ्या रंगाशी पाणी, शांतता अशा अनेक गोष्टी जोडल्या गेल्या आहेत; यामुळे आकर्षण वाढतं. निळ्या टाइल्सच्या रंगछटादेखील सभोवतालच्या वातावरणाशी सुसंगत होतात, जसं की हिरवळ आणि निळे आकाश.
पाण्याची पारदर्शकता (Transparency of water)
निळ्या टाइल्समुळे स्विमिंग पूलमधील पाणी पारदर्शक वाटतं, जेणेकरून पाण्याचा तळही सहज दिसून येतो. जेव्हा निळ्या टाईल्सवरून पाण्याची लाट जाते, तेव्हा मोठ्या लाटेपेक्षा लहान लाट जास्त प्रकाश पसरवते, या घटनेला रेले स्कॅटरिंग म्हणून ओळखलं जातं. यामुळे निळा प्रकाश स्विमिंग पूलभोवती पसरतो, ज्यामुळे स्विमिंग पूलची खोली आणि कोणतेही संभाव्य धोके ओळखणे सोपे होते.
हेही वाचा… तुमच्या पगाराव्यतिरिक्त तुमची सगळी उत्पन्न आयटीआरमध्ये दाखवणं आवश्यक आहे का?
निळ्या टाइल्समुळे पाण्याची पारदर्शकता वाढते, तसंच यामुळे स्विमिंग करणं सुरक्षित होतं.
मानसिक प्रभाव (Psychiatric Effect)
निळ्या रंगामुळे मानवी मन शांत होते. जेव्हा लोक निळा रंग पाहतात तेव्हा त्यांना शांत, आरामशीर आणि विश्वासार्ह वाटू शकते. या मानसिक परिणामांमुळे जलतरणपटूंना संपूर्णपणे पोहण्याचा आनंद घेता येतो, तसेच तलावाचे वातावरण अधिक आरामदायी आणि आनंददायी होते.
निळा रंग हा स्वच्छतेशी संबंधित आहे. निळ्या टाइल्सच्या वापरामुळे पुलाची देखभाल चांगली केली जात आहे अशी छाप पडू शकते. यामुळे पुलाच्या स्वच्छतेविषयी जलतरणपटूंचा विश्वास वाढतो.
तापमानाचे नियमन (Regulation of Temperature)
निळ्या टाइल्स पाण्याला आल्हाददायक तापमानात ठेवण्यास मदत करतात. पांढऱ्या किंवा हलक्या निळ्यासारख्या फिकट रंगछटा, जास्त सूर्यप्रकाश परावर्तीत करतात, ज्यामुळे तलावातील पाण्यात कमी उष्णता शोषली जाते.
थेट सूर्यप्रकाशाच्या संपर्कात असलेल्या विशेषत: बाहेरील तलावांमध्ये, या प्रतिबिंबामुळे पाणी थंड राहते.
जेव्हा वातावरण उष्ण असते, तेव्हा निळ्या टाइल्स पाण्याचं तापमाण थंड ठेवण्यास मदत करतात.