Hindu Wedding Rituals : लग्न हे असं पवित्र बंधन आहे की, ज्या बंधनात अडकल्यानंतर दोन व्यक्तींचं नवं आयुष्य सुरू होतं. भारतीय संस्कृतीत लग्नाला विशेष महत्त्व आहे. लग्नाच्या वेळी अनेक प्रथा-परंपरा पाळल्या जातात. प्रत्येक प्रथेमागे एक विशिष्ट कारण असतं.
लग्न हा शब्द जर उच्चारला, तर डोळ्यांसमोर नवरा नवरी एकमेकांना वरमाला घालतानाचं चित्र डोळ्यांसमोर येतं. पण, तुम्हाला माहीत आहे का की, लग्नात नवरा नवरी एकमेकांना वरमाला का घालतात? या प्रथेमागे नेमकं कारण काय? आज आपण त्याविषयीच जाणून घेणार आहोत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लग्नात नवरा – नवरी एकमेकांना वरमाला का घालतात?

वरमाला घालण्याची ही प्रथा शंकर-पार्वती आणि राम-सीतेच्या लग्नाच्या वेळी होती. वरमाला घालून वधू-वर नव्या आयुष्याची सुरुवात करतात. ते एकमेकांना वरमाला घालतात याचा अर्थ संपूर्ण आयुष्यभरासाठी ते एकमेकांचा नवरा-बायको म्हणून स्वीकारतात.

हेही वाचा : कुत्र्याकडून शिका बॅलन्स कसा असावा, कपाळावर पाण्याने भरलेला ग्लास घेऊन ऐटीत चालतोय, व्हिडीओ एकदा पाहाच

नवरी नवऱ्याला सर्वांत आधी वरमाला का घालते?

पूर्वी मुलीबरोबर लग्न करण्यासाठी स्वयंवर ठेवले जायचे तेव्हा ही प्रथा सुरू करण्यात आली होती. जो पुरुष मुलीला आवडायचा, त्या पुरुषाच्या गळ्यात ती वरमाला घालायची. याच कारणामुळे नवरी नवरदेवाला त्याच्याआधी वरमाला घालते.

लग्नातील या हारांना ‘वरमाला’च का म्हणतात?

पूर्वीच्या काळी स्वयंवर या पद्धतीमध्ये वधू वराची निवड करायची. जो वर आवडला त्याच्या गळ्यात वरमाला घालायची. वरमाला ही खास ‘वरा’साठी असायची. तेव्हापासूनच ‘वरमाला’ हा शब्द वापरला जातो.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why bride and groom exchange garland in hindu marriage rituals know reason ndj