History Of Clock : लहान मुलांना घड्याळात किती वाजले हे पाहायला शिकवत असताना घड्याळातील तीन काट्यासंदर्भात माहिती सांगितली जाते. मात्र, यावेळी घड्याळाशी संबंधित काही प्रश्नाचं उत्तर किंवा त्याबाबतची माहिती त्यांना सांगितली जात नाही. कदाचित त्या प्रश्नाचं उत्तर आपल्यालाही माहिती नसेल. सर्व घड्याळात बारा वाजल्यानंतर एक वाजतो. त्यानंतर दोन आणि नंतर तीन वाजतात, असं चक्र सुरु राहतं. घड्याळांचे काटे उजवीकडून डावीकडे फिरतात. मात्र, तुम्ही कधी असा विचार केला आहे का? की घड्याळाचे काटे एकाच दिशेला का फिरतात? अनेकांनी याचा विचार केला असेल किंवा अनेकांनी याचा विचार केला नसेलही. मात्र, यामागे देखील काही कारणे आहेत. यासंदर्भात आपण थोडक्यात माहिती समजून घेऊयात.

आता घड्याळाचे काटे एका दिशेने फिरतात, म्हणजे वरतीपासून सुरु होतात पुढे उजवीकडे फिरतात आणि नंतर डावीकडे जाऊन पुन्हा वरती उजवीकडे येतात. मग तुम्हाला असं कधी वाटलं नाही का? की या घड्याळांच्या काट्यांची ही हालचाल कोणी ठरवली? ते काटे विरुद्ध दिशेने का फिरत नाहीत? असा प्रश्न अनेकांच्या मनात आला असेल. मात्र, या प्रश्नांची उत्तर माहिती असलेले लोक फार कमी असतील.

हेही वाचा : History of exit polls: भारतातील मतदानोत्तर चाचण्यांची (एग्झिट पोल) सुरुवात कधी झाली?

एका अहवालानुसार, प्राचीन काळात बहुतेक लोक उत्तर गोलार्धात स्थायिक झाले होते. त्यावेळी त्यांना असं आढळलं की, सूर्य प्रकाशानुसार सावलीची दिशा बदलतेय. त्यानंतर अशीच पद्धत पुढे बराच काळ सुरु राहिली आणि घड्याळाच्या दिशेने मानली गेली. पुढे यामध्ये कोणताही बदल होऊ नये म्हणून ही पद्धत घड्याळाच्या दिशेने निश्चित करण्यात आली. मात्र, यामध्ये उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुवामुळे बदल होतो. इजिप्त सारख्या उत्तर गोलार्धातील देशात जर कोणी सूर्यप्रकाश पाहिला तर त्याची सावली घड्याळाच्या दिशेने फिरते. पण जर तुम्ही दक्षिण आफ्रिकेत म्हणजे दक्षिण गोलार्धातील कोणत्याही देशामध्ये सूर्यप्रकाश पाहिला तर त्याची सावली घड्याळाच्या विरुद्ध दिशेने पाहायला मिळते, म्हणजे हा संपूर्ण खेळ पृथ्वीच्या फिरण्यामुळे घडतो. हे सर्व दोन्ही ध्रुवांवर अवलंबून असतं. उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुवावरून घड्याळाची हालचाल देखील त्या प्रकारे केली जाते.

घड्याळाचा शोध कधी लागला?

माहितीनुसार, पोप सिल्व्हेस्टरने इसवी सन ९६६ मध्ये घड्याळाचा शोध लावला. १२५० मध्ये युरोपीय देशात विकसित घड्याळे बनवली जाऊ लागली. इंग्लंडमधील वेस्टमिंस्टर येथे एक वॉचहाऊस बनवण्यात आले होते. भारतातही अगदी आपल्या मुंबईतही अशी अनेक वॉच हाऊस म्हणजेच बिल्डिंग व त्याला वरच्या बाजूला मोठं घड्याळ असणारी वास्तू पाहायला मिळतात.

घड्याळाच्या आधी वेळ कशी ओळखली जात होती?

घड्याळाचा शोध लागण्यापूर्वी लोक सूर्याच्या किरणांवरून वेळेचा अंदाज लावत होते. म्हणूनच आजही आपल्याकडे उजाडलं की झोपेतून उठण्याची वेळ, सूर्य डोक्यावर आला की मध्यान्ह, सूर्य पश्चिमेकडू वळू लागला की संध्याकाळ व सूर्यास्तानंतर पुन्हा झोपण्याची वेळ असं गणित फॉलो केलं जातं.