विमान प्रवास करताना नागरिकांना विविध नियमांचे पालन करावं लागलं. यामध्ये तुमच्या बॅगचे वजन ते खाण्या-पिण्याच्या वस्तूंपर्यंतच्या नियमांचा समावेश असतो. पण असा एक नियम आहे, जो ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. त्या नियमानुसार, एक असं फळ आहे. जे तुम्हाला विमान प्रवास करताना बरोबर नेता येत नाही, हे ऐकताना तुम्हाला विचित्र वाटेल, पण हे खरं आहे.

आता तुम्ही विचार करत असाल, की ते फळ नेमकं कोणतं? तर ते फळ आहे नारळ. नारळ हे असं फळ आहे, जे तुम्हाला विमान प्रवास करताना बरोबर नेता येत नाही. विमानात प्रवास करताना नारळ नेण्यावर बंदी का आहे? आणि अशी बंदी घालण्यामागे वैज्ञानिक कारण काय? याविषयी जाणून घेऊया.

हेही वाचा – वाढदिवसाला तुम्ही आनंदी असता की दुःखी? ‘या’ दोन्ही गोष्टींचा ‘Birthday Blues’शी काय संबंध ? ‘बर्थडे ब्लूज’ म्हणजे नेमकं काय, जाणून घ्या…

…म्हणून विमान प्रवास करताना नारळावर बंदी

खरं तर विमान प्रवास करताना तुमच्या बॅगचे वजनानुसार दोन प्रकार पडतात. एक म्हणजे हॅंड बॅग आणि दुसरं म्हणजे चेक-इन बॅग. या दोन्ही बॅगमध्ये तुम्ही पावर बॅंक किंवा ई-सिगरेट यासारख्या सारख्या वस्तू नेऊ शकत नाही. याबरोबर तुम्ही या दोन्ही प्रकारच्या बॅगमध्ये नारळही नेऊ शकत नाहीत.

हेही वाचा – जगातील ‘या’ पाच देशांमध्ये आहेत सर्वाधिक शाकाहारी लोक; यात भारताचा नंबर कितवा? जाणून घ्या

यामागचं मुख्य कारण म्हणजे नारळ हा एक ज्वलनशील पदार्थ आहे. त्यामुळे विमान प्रवास करताना, तुम्हाला ओलं किंवा सुखं असा तसेच फोडलेलं किंवा पूर्ण नारळ अशा कोणत्याही प्रकारचं नारळ बरोबर नेता येत नाही. कारण नारळमध्ये तेलाचं प्रमाण अधिक असतं. आणि तेल हा ज्वलनशील पदार्थ आहे. त्यामुळेच विमान प्रवासात नारळ नेण्याची परवानगी तुम्हाला दिली जात नाही.

हेही वाचा – Independence day 2024: १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीच्या ध्वजारोहणात काय फरक आहे? अनेकांना उत्तर माहीत नसणार

नारळ बरोबरच या वस्तूंवरही आहे बंदी

नारळा बरोबरच विमान प्रवासादरम्यान सिगारेट, तंबाखू, गांजा, ड्रग्ज, तसेच मद्य या वस्तूंवरदेखील बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय काही विमानतळं आहेत, जिथे तूप आणि लोणच्यावरदेखील बंदी घालण्यात आली आहे. मात्र, काही राज्यात यासंदर्भातील नियम वेगळ आहेत. तिथे तूप आणि लोणचं बरोबर नेण्याची परवानगी दिली जाते.