Why Toilet Paper Is Always White: जगभरात वर्षानुवर्षे टॉयलेटमध्ये टिश्यूसारखा पेपर वापरला जातो. भारतीयांनी आपल्या सोयीनुसार टॉयलेटमध्ये जेट स्प्रे व बादली सुद्धा ठेवली असली तरी अलीकडे टॉयलेट पेपर सुद्धा सर्वत्र वापरला जातोच. या टॉयलेट पेपरबाबत तुम्ही एका गोष्टीचे निरीक्षण केले आहे का? तुम्ही कुठेही वॉशरूमला जा.. महागडा मॉल, विमानतळ, ऑफिस, कॉलेज अगदी एखाद्या फॅन्सी नातेवाईकाच्या घरी सुद्धा टॉयलेट पेपर हा पांढराच का असतो? तुम्हाला माहित आहे का, टॉयलेट पेपर १९५० पर्यंत वास्तूच्या रंग व थीम नुसार विविध रंगांमध्ये विकले जात होते पण मग असं काय झालं की सर्व कंपन्यांनी एकत्र मिळून टॉयलेट पेपरचा रंग पांढरा ठेवण्याचे ठरवले? चला तर जाणून घेऊयात..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

टॉयलेट पेपर कसा बनवला जातो?

१९५० च्या दशकात रंगीत टॉयलेट पेपर वापरला जात होता. टॉयलेट पेपरचा रंग सुद्धा हॉटेलच्या एकूण थीमला साजेसा असेल रंग टॉयलेट पेपरसाठी निवडला जात होता. मात्र नंतर हा ट्रेंड संपला आणि बाजारात पांढऱ्या रंगाच्या टॉयलेट पेपरची विक्री वाढीस लागली. टॉयलेट पेपर सेल्युलोज फायबरपासून बनवला जातो. झाडाच्या खोडापासून बनणारा कागद वापरून किंवा पुनर्वापर करून टॉयलेट पेपर बनवले जातात. आवश्यकतेनुसार या कागदाचे भाग करून त्याला पांढरा रंग देण्यासाठी हायड्रोजन पेरॉक्साइड किंवा क्लोरीनने ब्लीच केले जाते.

टॉयलेट पेपर पांढरा का असतो?

१) टॉयलेट पेपरचा रंग पांढरा असतो कारण तो ब्लीच केलेला असतो. ब्लीचशिवाय कागदाचा रंग तपकिरी होईल. अन्य कोणत्या रंगात टॉयलेट पेपर तयार करण्यासाठी अधिक पैसे खर्च करावे लागू शकतात ज्यामुळे टॉयलेट पेपर महाग विकावा लागेल. हा खर्च टाळण्यासाठी पांढऱ्या रंगात टॉयलेट पेपर ब्लीच केला जातो.

२) केवळ खर्चच नव्हे तर पर्यावरणाच्या दृष्टीने सुद्धा पांढऱ्या रंगाचा टॉयलेट पेपर अधिक उपयुक्त ठरू शकतो. पांढरा टॉयलेट पेपर रंगीत कागदापेक्षा लवकर विघटित होतो.

हे ही वाचा<< वॉशरूमला जाण्यासाठी करंगळीच का दाखवली जाते? शास्त्रात सांगितलं आहे ‘हे’ कारण

३) सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे रंगीत कागदासाठी वापरण्यात येणारे रंग हे शरीराला हानिकारक ठरू शकतात. आरोग्याच्या जोखमींमुळे पांढऱ्या रंगाचा टॉयलेट पेपर हा स्वस्त व सुरक्षित पर्याय ठरतो.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why colourful toilet paper was changed to only white tissue three important reasons did you know svs
Show comments