Dhammachakra Pravartan Din: भारतीय राज्यघटनेचे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपुरात बौद्ध धम्म स्वीकारला. बाबासाहेबांसोबतच त्यांच्या लाखो अनुयायांनीही बौद्ध धम्म स्वीकारला. नागपूर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) मुख्यालय असल्याने आंबेडकरांच्या नागपूर शहराच्या निवडीवर मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्माच्या पार्श्वभूमीवर नागपूर निवडले, असा कयास बांधला जात होता. त्या संदर्भात बाबासाहेबांना विचारले असता त्यांनीच शहराच्या निवडीचा रा.स्व.संघाशी (आरएसएस) काहीही संबंध नाही, असे स्पष्ट केले होते.

१५ ऑक्टोबर १९५६ रोजी केलेल्या ऐतिहासिक भाषणात बाबासाहेबांनी स्पष्ट केले, “अनेक लोक मला विचारतात, या कामासाठी नागपूर का ठरवले?, धर्मांतर इतर शहरात का झाले नाही?, काही लोक म्हणतात आरएसएसची बटालियन इथे नागपुरात होती, म्हणूनच आम्ही आमची बैठक या शहरात नेली. परंतु हे पूर्णपणे असत्य आहे. या कारणामुळे हा कार्यक्रम आम्ही नागपुरात आणला नाही. आमचे कार्य इतके महान आहे की, आयुष्यातील एक मिनिटही वाया घालवता येत नाही. नाक खाजवून इतरांसाठी अपशकुन करण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही!”

dilapidated railway bridge on Nagpur Chhindwara route will be opened
नागपूर – छिंदवाडा मार्गावरील खचलेला रेल्वे पुला सुरू होणार,मुहूर्त ठरला
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
cm devendra fadnavis personally helped poor tribal youth from Bhamragarh during undergoing treatment in Nagpur
मुख्यमंत्र्यांकडून ‘लोकसत्ता’च्या वृत्ताची दखल, भामरागडमधील ‘त्या’ रुग्णासाठी…
Navi Mumbai , APMC , Unauthorized Construction ,
नवी मुंबई : एपीएमसीतील अनधिकृत बांधकामाला प्रशासनाचे अभय? कारवाई करून देखील धान्य बाजारातील अनधिकृत बांधकाम सुरूच
Bangladesh Settlement name change demand by local residents
ऐकावे ते नवलच! नागपूरच्या एका वस्तीच्या नावाने तेथील हजारो लोकांसमोर संकट…
upper tehsil office at ashvi in sangamner taluka
संगमनेर तालुक्यातील आश्वी येथे अप्पर तहसील कार्यालय
Nagpur, mango tree , Bhonsale period ,
भोसलेकालीन ‘आमराई’ ओसाड होण्याच्या मार्गावर!
coastal road issue environmentalists oppose giving part of land close to sea to breach candy
कोस्टल रोड मार्गात नवा पेच; भराव भूमीचा भाग ब्रीच कँडीला देण्यास पर्यावरणवाद्यांचा विरोध

आणखी वाचा: Dr. Babasaheb Ambedkar १४ ऑक्टोबर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर धर्मांतर दिन- बौद्ध धम्माची दीक्षा का घेतली?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, आम्ही नागपूरची निवड केली कारण “नाग” लोक बौद्ध धर्माचा विस्तार करण्यात आघाडीवर होते. त्यांनी आर्यांशी युद्ध केले. “हे शहर निवडण्याचे कारण वेगळे आहे. बौद्ध इतिहास वाचणाऱ्यांना हे कळेल, भारतात बौद्ध धर्माचा प्रसार जर कोणी केला असेल तर ते नाग लोक होते. नाग लोक आर्यांचे शत्रू होते. आर्य आणि गैर-आर्य यांच्यात एक भयंकर आणि लढाऊ युद्ध झाले होते,” असे ते म्हणाले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुढे स्पष्ट करतात: “आर्य लोकांकडून नागांच्या छळाची उदाहरणे पुराणात आढळतात. अगस्ती मुनींनी केवळ एका नाग माणसाला त्यातून सुटण्यास मदत केली. आपली उत्पत्ती त्या माणसापासून झाली आहे. ज्या नाग लोकांना खूप त्रास सहन करावा लागला, त्यांना कोणीतरी महापुरुष हवा होता. त्यांची भेट गौतम बुद्ध या महापुरुषाशी झाली. नाग लोकांनी भगवान बुद्धाची शिकवण भारतभर पसरवली. त्यामुळे आपण नाग लोकांसारखे आहोत. असे दिसते की, नाग लोक प्रामुख्याने नागपूर आणि आसपासच्या प्रदेशात राहत होते. म्हणून या शहराला नागपूर म्हणतात, म्हणजे नागांचे शहर. येथून सुमारे २७ मैलांवर नाग नदी वाहते. अर्थातच नदीचे नाव येथे राहणाऱ्या लोकांवरून आले आहे.

आणखी वाचा: विश्लेषण: बुद्ध पौर्णिमा २०२३- भारतात सर्वाधिक बौद्ध लेणी का आढळतात?

“नाग वस्तीच्या मध्यभागी नाग नदी वाहते. हे ठिकाण निवडण्यामागचे हे प्रमुख कारण आहे. त्यामुळे नागपूरची निवड करण्यात आली. या प्रकरणात, एखाद्याला भडकवण्यासाठी खोटे बोलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. हा काही मानसिक खेळ नाही. आरएसएसचे कारण माझ्या मनातही आले नाही, त्यामुळे अफवा कोणीही खऱ्या मानू नये.”
आरएसएसला घेरण्यासाठी नागपूरची निवड केल्याचा ठपका ठेवणाऱ्या तत्कालीन विरोधी नेत्यांवरही बाबासाहेबांनी हल्लाबोल केला. आंबेडकरांच्या धर्मांतराच्या निर्णयाला विरोध करणारे टीकाकारही होते आणि त्यांनी गरीब, अस्पृश्य लोकांना “भ्रष्ट” केल्याबद्दल त्यांना दोषही दिला. बाबासाहेबांनी अशा दाव्यांना “निरुपयोगी रडे ” असे संबोधले.

आणखी वाचा: विश्लेषण: बुद्ध पौर्णिमा २०२३- बुद्धमूर्तीमुळे प्रकाशात आले पहिल्या शतकातील प्राचीन जागतिकीकरण !

डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, “कदाचित इतर कारणांसाठी (या निवडीला) विरोध होऊ शकतो. मी ही जागा केवळ विरोधातून निवडलेली नाही, मी तुम्हाला सांगतो. मी सुरू केलेल्या या कामावर विविध लोक आणि वृत्तपत्रांनी टीका केली होती. काही लोकांच्या टीका पराकोटीच्या असतात. त्यांच्या मते, मी माझ्या गरीब अस्पृश्य लोकांना भरकटवत होतो. ते म्हणतात, ‘आज जे अस्पृश्य आहेत ते अस्पृश्यच राहतील आणि अस्पृश्यांना मिळालेले ते अधिकार नष्ट होतील’ त्यामुळे आपल्यातील काही लोक गोंधळून गेले आहेत. आपल्यातील अशिक्षित लोकांना ते म्हणतात, “पारंपारिक मार्गाने जा” [पगदंडी (हिंदी), “पायपाथ,” महारांनी निकृष्ट मार्गाचा वापर करावा असे ते सुचवितात]. आपल्यातील काही वृद्ध आणि तरुण प्रभावित असू शकतात. यामुळे लोकांच्या मनात शंका निर्माण झाली असेल, तर ती शंका दूर करणे आपले कर्तव्य आहे; आणि ही शंका दूर करणे म्हणजे आपल्या चळवळीचा पाया मजबूत करणे होय.”

Story img Loader