Mall Roads on Hill Stations: थंडीची चाहुल लागली की पर्यटक थंडीचा आनंद घेण्यासाठी हिल स्टेशन्सकडे कूच करतात. उत्तर भारतातील अनेक हिल स्टेशन्सवर आता बर्फवृष्टीही होत आहे. मसुरी, शिमला, नैनीताल, मनाली आणि इतर अनेक हिल स्टेशन्सवर थंड हवामानासह एका गोष्टीचे साम्य आढळते. ते म्हणजे सर्वच ठिकाणी मॉल रोड आहे. या मॉल रोडवर खरेदी करता येते, चविष्ट पदार्थांचा आनंद तर घेता येतोच, त्याशिवाय मॉल रोडवरून निसर्गाचे विहंगम दृश्यही पाहता येते.

मॉल रोड म्हणजे काय?

हिल स्टेशन्सवर सपाट पठारावर मॉल रोड बांधला जातो. जिथून पर्यटक आजूबाजूच्या निसर्गाचाही आनंद घेऊ शकतील. या रस्त्यावर चार चाकी वाहने किंवा इतर वाहनांना येण्याची परवानगी नसते. जेणेकरून पर्यटकांना व्यवस्थित चालता येईल आणि खरेदीचा आनंद घेता येईल.

Traffic changes due to flyover work at Savitribai Phule Pune University Chowk Pune news
पुणे: विद्यापीठ चौकातील वाहतुकीत बदल
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
z morch tunnel
सामरिक महत्त्व असलेल्या ‘झेड मोढ’ बोगद्याचं पंतप्रधान मोदींकडून उद्घाटन; याचे वैशिष्ट्य आणि फायदे काय?
Tuljapur Temple Vikas Arakhada loksatta news
२१०० कोटींचा तुळजाभवानी तीर्थक्षेत्र विकास आराखडा मान्यतेसाठी मुख्यमंत्र्यांकडे सादर, आमदार पाटील यांची माहिती
dombivli donkey parking
डोंबिवलीत सोसायटीच्या प्रवेशव्दारासमोर वाहने उभे करणाऱ्यांना गाढवाची उपमा, टाटा लाईनखाली दुचाकी वाहनांचे बेशिस्त वाहनतळ
Old Bhandara road, Nagpur , Old Bhandara road news,
रस्ते, उड्डाणपुलांमुळे प्रसिद्ध नागपुरात एक रस्ता असाही आहे जो २५ वर्षापासून…
Pune Mumbai Expressway New Link Road to Cut from Pune to Mumbai
पागोटे ते चौक मार्गामुळे मुंबई पुणे अतिजलद प्रवास; २० ते २५ किलोमीटरचे अंतर कमी होण्यास मदत
Traffic congestion persists despite 33 bridges in Pimpri-Chinchwad
पिंपरी-चिंचवडमध्ये ३३ पूल; वाहतूककोंडी मात्र कायम

मॉल रोडची संकल्पना कधी आली?

ब्रिटिश राजवटीत असताना १८०० च्या दशकात हिल स्टेशन्सवर मॉल रोड बांधले गेले. लंडनमधील द मॉल वरुन मॉल रोड असे नाव दिले गेले. ब्रिटिश अधिकारी हिल स्टेशन्सवर राहायला येत असताना ते मॉल रोडवर भटकण्याचा आनंद घेत असत. या रस्त्यावर मार्केट, रेस्टॉरंट आणि मनोरंजनाची साधने निर्माण केली गेली. त्याकाळी ब्रिटिश अधिकाऱ्यांनी सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी ही सुविधा निर्माण केली होती.

भारतातील उन्हाळा असह्य होत असल्यामुळे अनेक ब्रिटिश अधिकारी उन्हाळ्यात हिल स्टेशन्सवर जाऊन राहत होते. अनेक मॉल रो़वर बँड स्टँडदेखील आहे. जिथे मिलट्री बँड कला सादर करत असत.

हिल स्टेशन्सवरील मॉल रोडवर जी दुकाने आहेत, त्याचेही वेगळे वैशिष्टे आहेत. यात प्रामुख्याने हस्तकला, लोकर आणि स्थानिक कलांना वाव दिलेला पाहायला मिळतो. पर्यटकांना वेगळे काहीतरी देण्याचा यातून प्रयत्न केला जातो. महाराष्ट्रातही माथेरान, महाबळेश्वरसारख्या ठिकाणी अशी बाजारपेठ वसलेली आहे. जिथे पर्यटक खरेदीसह, खाण्या-पिण्याचा आनंद घेत असतात.

Story img Loader