Why Do Companies Deliberately Give Short Wires in Phone Chargers: स्मार्टफोन हा आपल्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग बनला आहे. कामानिमित्त दिवसभर मोबाईल वापरल्यानंतर त्याची बॅटरी संपते आणि तुम्ही मोबाईल पुन्हा चार्ज करता. चार्जर हा कोणत्याही फोनसाठी खूप महत्त्वाचा असतो. याशिवाय फोन चार्ज करता येत नाही. तुम्हाला जवळपास प्रत्येक फोन बॉक्समध्ये चार्जर मिळतो, आजकाल कंपन्या मोबाईल चार्जरसोबत छोटी वायर देत आहेत. यामुळे अनेकवेळा चार्जिंग दरम्यान फोन वापरताना अडचणीचा सामना करावा लागतो. जरी तुम्हाला या छोट्या वायर्सचा त्रास होत असेल, पण ते तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे, हे तुम्हाला माहितेयं का? तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, मोबाईल कंपन्या तुमच्या चार्जरमध्ये जाणूनबुजून शॉर्ट वायर देतात. चला तर मग कंपन्या असं का करतात, जाणून घेऊया…
…म्हणून मोबाईल कंपन्या चार्जरमध्ये जाणूनबुजून छोटी वायर देतात
वास्तविक, मोबाईल कंपन्या फोनच्या Charger ची वायर लहान करतात ज्यामुळे फोन चार्जिंग करताना आपल्याला तो जास्त वेळ वापरता येणार नाही. कारण चार्जिंग करताना फोन वापरल्याने त्याची बॅटरी लवकर खराब होते. इतकंच नाही तर मोबाईल चार्ज करताना वापरल्यानेही तो गरम होतो. याशिवाय जर तुम्ही फोन चार्जिंगला लावून वापरत असाल तर तो चार्ज होण्यासाठी खूप वेळ लागतो. अशा स्थितीत मोबाईलची बॅटरी अनेक वेळा ब्लास्ट होऊ शकते. चार्जिंग करताना मोबाईल वापरल्याने फोनचा बॅटरी बॅकअपही कमी होतो.
(हे ही वाचा : मोबाईलचे चार्जर काळ्या-पांढऱ्या रंगाचेच का असतात? जाणून घ्या यामागील ‘हे’ गुपित)
काही वर्षांपूर्वी चार्जरची वायर होती लांब
काही वर्षांपूर्वी, चार्जरला लांब वायर दिली जात असे. ज्यामुळे फोन चार्ज करताना तो अनेक लोकांकडून वापरला जायचा. मात्र, कालांतराने लांब तारा असण्याचे तोटे समोर येऊ लागले. चार्जवर फोन वापरल्याने फोनच्या बॅटरीमध्ये समस्या निर्माण होऊ लागल्या आणि ग्राहकांनी बॅटरी खराब झाल्याच्या तक्रारी कंपन्यांकडे करण्यास सुरुवात केली.
वाढत्या तक्रारींमुळे कंपन्यांचेही नुकसान होऊ लागले. कंपन्यांच्या उत्पादनांची चुकीची माहिती पसरवली जाऊ लागली. वापरकर्ते त्यांच्या फोनबद्दल वाईट गोष्टी करू लागले. याशिवाय बॅटरीमध्ये स्फोट झाल्याच्या घटनाही अनेकदा समोर आल्या. याच समस्या लक्षात घेऊन मोबाईल कंपन्यांनी चार्जरची वायर लहान केली.