आतापर्यंत सगळ्यांनीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे इंजेक्शन्स हे घेतलेच असणार. अगदी लहान बाळाला सुद्धा इंजेक्शन देण्यात येतो. तुम्ही कधी डाॅक्टरांकडे गेलात आणि इंजेक्शन्स लावायची वेळ आली तर डाॅक्टर कंबरेवर आणि हातावर इंजेक्शन टोचतात. पण बऱ्याचदा डाॅक्टर हाताच्या दंडावर आणि कंबरेवरच का इंजेक्शन टोचतात..? बर्याच लोकांच्या मनात असा प्रश्न पडत असेल की, यामागचं सायन्स आहे काय…? चला तर जाणून घेऊया यामागील खरं कारण…
इंजेक्शनचे प्रकार
खरंतर शरीरात कुठे इंजेक्शन दिले जाईल हे इंजेक्शनच्या प्रकारावर अवलंबून असतं. वास्तविक, इंजेक्शनचे अनेक प्रकार आहेत आणि प्रत्येक इंजेक्शन शरीराच्या वेगवेगळ्या भागात लावल्यास ते अधिक प्रभावी ठरतं, असं तज्ज्ञाचं म्हणणं आहे. इंजेक्शनच्या प्रकाराबद्दल बोलताना, त्यात इंट्राव्हेनस, इंस्ट्रामस्क्युलर, सबक्यूटेनियस आणि इंट्राडर्मल सारख्या इंजेक्शन्सचा समावेश आहे.
(हे ही वाचा : भारतातील ‘या’ ठिकाणी राहतात ‘गुगल’ अन् ‘कॉफी’ नावाची लोकं; राज्याचे नाव वाचून तुम्हीही व्हाल थक्क!)
कोणते इंजेक्शन कुठे दिले जाते?
इंट्राव्हेनस इंजेक्शन – हे इंजेक्शन औषध थेट रक्तवाहिनीत पोहोचवण्यासाठी वापरले जाते. त्यामुळे हे इंजेक्शन हातावर टोचण्यात येते. टिटॅनस असो की कोविड लस, ही सर्व इंट्राव्हेनस इंजेक्शन्स आहेत, म्हणूनच ती हातामध्ये दिली जातात.
इंट्रामस्क्युलर इंजेक्शन – काही औषधं ही स्नायूंद्वारे शरीरात पोहोचवणं आवश्यक असतं. त्याचा शरीरावर जलद परिणाम होतो. त्यामुळे अशी इंजेक्शन्स कधीकधी आपल्या नितंबांमध्ये किंवा कमरेवर दिली जातात.
सबक्यूटेनियस इंजेक्शन – इन्सुलिन आणि रक्त पातळ करणारी औषधं या इंजेक्शनद्वारे दिली जातात. एक हातावर आणि मांडीच्या वरच्या भागावर किंवा ओटीपोटात हे इंजेक्शन टोचले जाते.