तुम्ही कधी ना कधी वेगवेगळ्या कारणांसाठी हॉस्पिटलमध्ये गेलाच असाल. हॉस्पिटलमध्ये एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल ती म्हणजे डॉक्टर आणि तिथला स्टाफ नेहमी पांढऱ्या कपड्यांमध्ये दिसून येतात. मात्र, डॉक्टर आणि नर्स ऑपरेशनसाठी जातात तेव्हा हिरव्या किंवा निळ्या रंगाचे कपडे घालतात. असे का घडते याचा कधी तुम्ही विचार केला आहे का? खरं तर यामागे एक संपूर्ण विज्ञान आहे. जाणून घेऊया यामागचे रंजक कारण…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खरं तर पूर्वी ऑपरेशन करतेवेळी डॉक्टर पांढऱ्या कपड्यातच असायचे. पण विसाव्या शतकाच्या सुरुवातीला, एका सुप्रसिध्द डॉक्टराने पांढऱ्या कपड्याच्या ऐवजी हिरव्या रंगाच्या कपड्याचा वापर केला. त्यांना वाटले की, अस केल्याने डॉक्टर आणि इतर स्टाफ यांच्या डोळ्यांना आराम मिळेल. काही संशोधक आणि तज्ज्ञांच्या मते हिरवा रंग आपले मन शांत ठेवतो.

( हे ही वाचा: Book Train Tickets Online: आता घरबसल्या Paytm वरून ट्रेनची तिकिटे झटपट बुक करा; जाणून घ्या ‘या’ सोप्या स्टेप्स)

काहीवेळा डॉक्टरांना बराच वेळ ऑपरेशन थिएटरमध्ये राहावे लागते. अशावेळी त्यांना रक्ताचा लाल रंग पुन्हा पुन्हा पहावा लागतो. लाल रंग जास्त वेळ नजरेसमोर असल्याने डॉक्टर आणि इतर स्टाफच्या डोळ्यांवर ताण येऊ शकतो. अशावेळी डॉक्टर शस्त्रक्रियेवर लक्ष केंद्रीत करु शकत नसल्याची शक्यता आहे. त्यांच्या डोळ्यांना सतत लाल रंग दिसू नये यासाठी ऑपरेशन थिएटरमध्ये डॉक्टर हिरव्या रंगाचा पोशाख घालतात.

व्हिज्युअल एक्सपर्टच्या म्हणण्यानुसार लाल रंगावर सतत लक्ष केंद्रित केल्यानंतर ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टरला पांढऱ्या रंगाचा पृष्ठभाग दिसला तर हिरवा रंग दिसल्याचा भ्रम निर्माण होईल. म्हणजेच, जर डॉक्टर रुग्णाच्या लाल रक्ताचे सतत निरीक्षण केल्यानंतर, पांढऱ्या रंगाचा कोट किंवा मास्क घातलेल्या स्टाफवर नजर टाकतील, तेव्हा त्यांना प्रत्येक रंगाचे भ्रम दिसतील.

( हे ही वाचा: धागे निघतात म्हणून नाही तर ‘या’ कारणामुळे साडीला लावला जातो फॉल; जाणून घ्या कशी सुरु झाली ही पद्धत)

वैज्ञानिक भाषेत याला ‘व्हिज्युअल इल्युजन’ म्हणतात. खर तर पांढऱ्या प्रकाशात इंद्रधनुष्याचे सर्व रंग असतात. लाल रंगाचा प्रभावामुळे डोळ्यांना पांढऱ्या पृष्ठभागावरूनही हिरवा रंग दिसण्याचा संकेत मिळतो, अशावेळी जेव्हा डॉक्टर रुग्णाच्या लाल रंगाकडे पाहून त्याच्या स्टाफने आधीच घातलेल्या हिरव्या किंवा निळ्या रंगाकडे बघेल तेव्हा हिरव्या रंगाचा भ्रम त्यात लगेच मिक्स होईल आणि त्यामुळे कोणताही व्हिज्युअल डिस्टरब्रँस होणार नाही.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why do doctors wear green clothes during operation or surgery know scientific reason gps
Show comments