गेल्या काही दिवसांपासून व्हॉट्सअ‍ॅप चर्चेत आहे कारण अनेकांना परदेशी नंबरवरून कॉल आणि मेसेज येत आहेत. आजच्या काळात लाखो-करोडो लोक व्हॉट्सअ‍ॅप वापरतात त्यापैकी अनेकजण या आंतरराष्ट्रीय नंबरवरुन येणाऱ्या फसवणूकीच्या कॉलला बळी पडतात. गेल्या काही दिवसांमध्ये अशा घटना घडल्याची अनेक प्रकरण समोर आली आहे. तुम्हालाही जर +२१२, + ८४ + ६२+ ६० अशा आंतरराष्ट्रीय कोडच्या नंबरवरून कॉल आला असेल तर सावध राहा. तुम्हाला जर अशा नंबर कॉल आला तर काय करावे याची माहिती या लेखात देणार आहोत. त्यापूर्वी हा व्हॉट्सअ‍ॅपस्कॅम नक्की काय आहे ते समजून घेऊ या.

काय आहे हा व्हॉट्सअ‍ॅप स्कॅम?
ट्विटर, फेसबूक सारख्या सोशल मीडिया माध्यमांवर अनेकांनी +८४, +६२, +६० +२५४, +६३,+१(२१८) यांसारख्या नंबरवरून कॉल येत असल्याचे सांगितले आहे. हे कॉल साऊथ अफ्रिका, इंडोनेशिया, व्हिएतनाम, मलेशिया, केनया, इथोपियासारख्या काही देशांमधून येतात. ISD कोडवरून हे कॉल कोणत्या देशातून आला आहे हे समजते. ज्या लोकांनी नुकतेच नवीन सिम कार्ड घेतले आहे त्यांनाही असे आंतरराष्ट्रीय कॉल येत आहेत. व्हॉइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉलच्या (VoIP) माध्यामातून केले जातात. यामागे आंतरराष्ट्रीय स्कॅमर्सचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. अशा कॉलद्वारे ‘मालवेअर’ सारखे धोकादायक व्हायरm तुमच्या फोनमध्ये पाठवला जातो. कित्येकदा ब्लँक कॉलही केले जातात अशा नंबरवरून व्हॉट्सअ‍ॅपवर एक लिंक पाठवली जाते. त्या लिंकवर क्लिक करणे धोकादायक असू शकते किंवा तुमच्या बँक अकाउंटमधून पैसे गायब होऊ शकतात. त्यामुळे असे कॉल कधीही उचलू नयेत किंवा अशा नंबरवरून आलेल्या मेसेजला रिप्लाय देऊ नये.

भारतीय सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटरने (I4C) व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्यांना अशा प्रकारच्या फसवणूकीपासून वाचवण्यासाठी सावगिरी बाळगण्याचा इशारा देत आहे.

Reserve Bank,
“मी लष्कर-ए-तोयबाचा सीईओ बोलतोय, तुमच्या मागचा रस्त्यावर…”; रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन!
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
rbi received threatening phone call from Lashkar e Taiba
रिझर्व बँकेला ‘लश्कर-ए-तैयबा’च्या नावाने धमकी, कशी आणि कोणती धमकी दिली वाचा…
loksatta kutuhal artificial intelligence in decision making
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने निर्णयांची अंमलबजावणी
Revanth Reddy Express Adda
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी एक्स्प्रेस अड्डावर, पाहा मुलाखत लाईव्ह
Nashik Voting, satellite phone, polling stations in Nashik district , Nashik latest news,
मतदानाच्या माहितीसाठी १० उपग्रहाधारित फोन, ८८ धावपटूंचा वापर, नाशिक जिल्ह्यात १०३ मतदान केंद्र संपर्कहिन
RBI announces changes to KYC rules! How it will impact you
KYC : RBI ने केली KYC नियम बदलण्याची घोषणा, आपल्यावर नेमका कसा परिणाम होणार?

कसे राहाल सुरक्षित?
या फसवणुकीपासून सुरक्षित राहण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपने दोन महत्त्वाच्या गोष्टी सुचवल्या आहेत ज्या वापरकर्ते करू शकतात.
१. अशा अनोळखी आणि संशयास्पद नंबरवरून आलेला कॉल उचलू नका किंवा मेसेजला रिप्लाय देऊ नका.
२. असे सर्व संशयास्पद नंबर ब्लॉक करा आणि या फोन नंबरची व्हॉट्सअ‍ॅपवर तक्रार करा.
३. अशा कोणत्याही नंबरवरून आलेल्या लिंकवर चूकनही क्लिक करू नका.

हेही वाचा – आधार कार्ड फसवणुकीची चिंता सतावतेय? आधार कार्ड बायमॅट्रिक्स लॉक करा आणि निश्चिंत राहा

व्हॉट्स अ‍ॅपवर नंबरची तक्रार कशी करावी?

“संशयास्पद मेसेज/कॉल ब्लॉक करणे आणि तक्रार करणे हे होणाऱ्या फसवणूकीचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी एक महत्त्वाची पायरी आहे आणि जेव्हा व्हॉट्स अ‍ॅप वापरकर्त्यांना अज्ञात आंतरराष्ट्रीय किंवा देशांतर्गत फोन नंबरवरून असे कॉल येतात, तेव्हा व्हॉट्सअ‍ॅप संशयास्पद अकांउट ब्लॉक करण्याचा आणि तक्रार करण्याचा एक सोयीस्कर मार्ग असतो. या अकांउटची व्हॉट्स अ‍ॅप वर तक्रार करणे महत्त्वाचे आहे ज्यामुळे आवश्यक ती कारवाई करू व्हॉट्सॅअ‍ॅपद्वारे केली जाऊ शकते आणि त्यांच्यावर बंदी घालू शकतो. तुम्हाला कोणताही कॉल आल्यास तो बंद करून, ‘रिपोर्ट आणि ब्लॉक’ करू शकता.

  • व्हॉट्स अ‍ॅप उघडा.
  • त्यानंतर उजव्या कोपऱ्यातील तीन डॉट असलेल्या चिन्हावर क्लिक करा.
  • More या पर्यायावर क्लिक करा आणि ब्लॉक ऑप्शनवर क्लिक करा.
  • तुम्ही ‘रिपोर्ट आणि ब्लॉक’ क्लिक करू शकता.

काळजी घेऊनही जर तुमच्यासह अशी फसवणूकीची घटना घडल्यास लवकरात लवकर सायबर सेलची मदत घ्या.