कांदा हा युनायटेड स्टेट्समधील तिसरा सर्वात मोठा ताज्या भाजीपाला उद्योग आहे. कांदे चिरलेले असोत, तळलेले असोत किंवा नसोत ऑम्लेटपासून सूपपर्यंत सर्वच गोष्टींमध्ये कांदा वापरला जातो. पण कांदा चिरणे हे काम आजिबात सोपे नाही कारण कांदा चिरताना आपल्या डोळ्यातून अश्रू येतात आणि नाकातून पाणी येते. पण असे का होते हे तुम्हाला माहित आहे का? कांदे तुम्हाला का रडवतात आणि कांदे चिरताना डोळ्यातून पाणी येऊ नये यासाठी काय करावे जाणून घ्या ..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कांदा चिरताना डोळ्यातून पाणी का येते?

जेव्हा तुम्ही कांदा चिरता तेव्हा त्यातून त्रासदायक वायू बाहेर पडतात ज्यामुळे तुमच्या डोळ्यांत पाणी येते. कारण कांद्याचे एन्झाईम हवेत मिसळून हा वायू तयार करतात ज्यामुळे डोळ्यांना त्रास होतो. आपल्या डोळ्यांना स्वतःचेसंरक्षण करण्यासाठी एक संरक्षण यंत्रणा असते. डोळ्यांना होणारा त्रास दूर करण्यासाठी आणि संरक्षण करण्यासाठी ही यंत्रणा अश्रू निर्माण करतात.

काही लोकांना कांदा चिरताना इतरांपेक्षा जास्त त्रास होतो. जर तुम्हाला कांद्याची ऍलर्जी असेल, तर तुम्हाला अधिक तीव्रतेने त्रास होऊ शकतो किंवा खाज सुटण्यासारखखी लक्षणे दिसू शकतात.

हेही वाचा – तुम्हाला माहितीये का, सॅलरी शब्दाचा पैशाबरोबर काही संबंधच नाही; पण मिठाबरोबर आहे! कसा ते जाणून घ्या….

कांद्याचा प्रकार महत्त्वाचा आहे का?

  • कांद्याचे अनेक प्रकार आहेत, ज्यात काही कमी अश्रू निर्माण करतात.
  • सर्वात कठोर रासायनिक अभिक्रिया निर्माण करणाऱ्या कांद्यामध्ये भरपूर सल्फरयुक्त संयुगे असतात. यामध्ये पिवळे, लाल आणि पांढरे कांदे समाविष्ट आहेत.
  • गोड प्रकार, जसे की हिरव्या कांद्यामध्ये कमी सल्फर असते, ते कमी तिखट असतात आणि बहुतेक लोकांमध्ये कमी अश्रू निर्माण करतात.
  • अनुवांशिक परिवर्तनाद्वारे, पीक शास्त्रज्ञांनी कांद्याचे अश्रूमुक्त वाण देखील तयार केले आहेत. अद्याप मोठ्या प्रमाणावर उत्पादन झालेले नसले तरी, तुम्हाला काही खास बाजारपेठांमध्ये सनिओन्स नावाचे कांदे सापडतील जे चिरताना डोळ्यातून पाणी येत नाही.

कांदे तुमच्या डोळ्यांना त्रास देऊ शकतात आणि डोळ्यातून पाणी आणू शकतात, परंतु ते तुमच्या डोळ्यांना कायमस्वरूपी हानी किंवा नुकसान पोहचवत नाहीत. तरीही, लालसरपणा दूर करण्यासाठी आणि अस्वस्थता कमी करण्यासाठी डोळ्यांची आग होत असेल तर त्वरीत उपचार

हेही वाचा –Black Friday 2024: ब्लॅक फ्राय डे म्हणजे काय? कधी आणि का साजरा केला हा दिवस?

कांद्यामुळे होणारा त्रास कमी करण्यासाठी येथे काही टिप्स आहेत:

  • तुम्ही चिरत असलेला कच्चा कांदा आणि स्वतःमध्ये अंतर ठेवा. चिरलेले कांदे काचेच्या खाली ठेवा.
  • आपले डोळे थंड, स्वच्छ पाण्याने स्वच्छ धुवा.
  • डोळ्यांची आग कमी होण्यासाठी डोळ्यांवर थंड काकडी ठेवा.
  • डोळ्यांना थंडावा मिळण्यासाठी डॉक्टरांनी शिफारस केलेले आय ड्राप वापरा.
  • प्रथम, लक्षात ठेवा की तुम्ही जितक्या काळासाठी कांदे साठवून ठेवता त्याचा कांद्याच्या अश्रू उत्पादन क्षमतेवर परिणाम होतो. जास्त काळ साठवलेल्या कांद्यापेक्षा ताजे कांद्यामुळे डोळ्यातून अश्रू येण्याची शक्यता कमी असते.

हेही वाचा –NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

कांदे चिरताना अश्रू येऊ नये यासाठी काही टिप्स

  • कांदे व्यवस्थित चिरून घ्या
    तुम्ही कांदे चिरून घेतल्याने अश्रू काही प्रमाणात कमी होण्यास मदत होऊ शकते. काही शेफ कांदा चिरताना थोडे अंतर ठेवण्यास सांगतात जेणेकरून कांद्याची वाफ थेट तुमच्या डोळ्यांपर्यंत पोहचणार नाही पण तुम्ही त्यांचे तुकडे केले तरी, मुळाच्या टोकाजवळ कांदा चिरणे टाळण्याचा प्रयत्न करा. हा असा भाग आहे ज्यामध्ये सल्फ्यूरिक संयुगे सर्वाधिक प्रमाणात असतात ज्यामुळे अश्रू येतात.
  • धारदार चाकू वापरा
    धारदार चाकू वापरणे देखील मदत करू शकते. चाकू जितका धारदार असेल तितके कांद्याचे कमी नुकसान होते आणि परिणामी हवेत कमी एन्झाईम सोडले जातात.
  • पाणी वापरा
    कांदा चिरताना अश्रू येऊ नये म्हणून कांद्यामध्येच सल्फ्यूरिक ऍसिड संयुगे कमी करू शकता यासाठी कांदा चिरण्यापूर्वी ३० मिनिटे बर्फाच्या पाण्यात कांदा थंड करण्यासाठी ठेवा.
  • कांद्याच्या वाफेपासून डोळ्यांचे रक्षण करा
    हवा खेळती राहण्यासाठी पंखा चालू ठेवा कांदे चिरताना डोळ्यांचे संरक्षण करा जसे की, गॉगल घाला.
मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why do onions make you cry and how do you stop it snk