Hole On The Bottom Of A Padlock: जेव्हा आपण घराबाहेर पडतो तेव्हा सर्वात महत्वाची गोष्ट जी आपण कधीही विसरत नाही ती म्हणजे घराचा दरवाजा लॉक करणे. घराच्या सुरक्षेसाठी दरवाजा लॉक करणे महत्त्वाचे आहे. पण तुम्ही कधी लॉकला जवळून पाहिले आहे का? लॉकच्या की- होलसोबत एक छोटे छिद्र देखील असते. पण हे छिद्र लॉकला असण्यामागचं नेमकं कारण काय? यामागचे कारण आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत हे वाचून तुम्ही थक्क व्हाल..
ज्याप्रमाणे लॉक आपल्या घराचे रक्षण करते त्याचप्रमाणे लॉकवर असलेले हे लहान छिद्र कुलूपाच्या सुरक्षिततेसाठी काम करते. घराच्या बाहेर लॉक बऱ्याचवेळा लटकलेले असते, त्यामुळे काही वेळा पाणी त्यामध्ये शिरते. त्यामुळे हे लॉक आतमधून गंजण्याची शक्यता असते. पण लॉकवर असलेले हे छिद्र लॉकला गंजण्यापासून वाचवते आणि तुमचे कुलूप वर्षानुवर्षे टिकते.
गंज धरत नाही..
लॉकखालील हे छिद्र खूप विचार करून बनवले आहे. जेव्हा कोणत्याही कारणाने लॉकमध्ये पाणी भरले जाते, तेव्हा ते पाणी कुलूपाच्या खाली दिलेल्या छोट्या छिद्रातून बाहेर येते. यामुळे लॉकच्या आत गंज धरत नाही. हे छिद्र लॉकवर नसल्यास लॉकमध्ये पाणी भरल्यानंतर बाहेर पडायला जागा राहणार नाही आणि लॉक खराब होईल.
( हे ही वाचा: ‘हे’ आहे देशातील सर्वात शेवटचे रेल्वे स्टेशन; नाव वाचून तुम्हीही थक्क व्हाल..)
तसेच, लॉकला भरपूर वर्षे झाल्यास, ते हळूहळू काम करणे थांबवते. काहीवेळा असे होते की चावी नीट काम करत नाही. अशा वेळी तुम्ही त्या छोट्या छिद्राच्या मदतीने लॉकच्या आत ऑइलिंग करू शकता. त्यामुळे लॉक आणि चावी व्यवस्थित काम करेल.