xmas traditions from around the world: ख्रिसमस हा ख्रिश्चन धर्मातील सर्वात मोठा सण आहे. आजच्या काळात प्रत्येक धर्माचे सण सर्वत्र साजरे होऊ लागले आहेत, त्यामुळे जगभरात ख्रिसमस साजरा केला जातो. पण, ख्रिसमस सर्वत्र सारख्या पद्धतीने साजरा केला जातो असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकीचे आहात. जगभरात अशी अनेक ठिकाणे आहेत, जिथे आजही ख्रिसमस साजरा करण्याच्या पारंपरिक चालीरीती आणि परंपरा पाळल्या जातात. जगाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये ख्रिसमस साजरा करण्याच्या वेगवेगळ्या परंपरा आहेत. चला जाणून घेऊया जगात ख्रिसमस कोणत्या पद्धतीने साजरा केला जातो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मिस्टलेटोच्या झाडाखाली चुंबन घेणे ही एक अतिशय प्रसिद्ध ख्रिसमस परंपरा आहे, जी प्रेम आणि प्रणय (रोमान्स) दर्शवते. ही सुंदर परंपरा धावपळीच्या आयुष्यात नातेसंबंधांमधील उत्स्फूर्ततेची आठवण करून देते. जेव्हा दोन व्यक्ती मिस्टलेटोच्या खाली भेटतात तेव्हा त्यांनी एकदा चुंबन घ्यावे लागते. ही परंपरा थोडी वेगळी वाटतेय, पण प्रथा कशी सुरू झाली यामागे रंजक कथा आहे.
मिस्टलेटो म्हणजे काय?
TOI ने दिलेल्या माहितीनुसार, मिस्टलेटो ही एक अशी वनस्पती आहे जी फळझाडे, मॅपल, ओक इत्यादींवर उगवलेली आढळते. या वनस्पतींला पिवळी फुले, पांढरी बेरी येतात. परंपरेप्रमाणे रोमँटिक वाटते पण मिस्टलेटो त्याच्या ज्या झाडावर उगवते त्यावर परजिवी म्हणून कार्य करते आणि स्वतःसाठी सर्व पोषकद्रव्ये शोषून घेते.
हेही वाचा – ‘घरघंटी किणकिणती घंटा…सांताक्लॉज आला…”; मराठी ‘जिंगल बेल’ गाणं ऐकलं का? नाही मग ‘हा’ व्हिडीओ बघाच!
लोक मिस्टलेटोच्या झाडाखाली का चुंबन घेतात?
TOI ने दिलेल्या माहितीनुसार, मिस्टलेटोच्या झाडाखाली चुंबन घेण्याच्या प्रथेमागे एक पौराणिक कथा प्रसिद्ध आहे. प्रेमाची देवी, फ्रिग्गा हिने एका मुलाला जन्म दिला ज्याचे नाव बाल्डर(Baldr) ठेवते जो निरागसता आणि प्रकाशाचा देव होता आणि म्हणून फ्रिगाने घोषित केले की, कोणत्याही प्राण्याने त्याला कोणत्याही प्रकारे इजा करू नये. पण, मिस्टलेटोचा समावेश करण्यास विसरते. आगीची देवता असलेल्या लोकीला (Loki) जेव्हा हे समजले आणि मिस्टलेटोपासून बनवलेल्या बाणाने बाल्डरच्या(Baldr) हृदयावर वार करतो. त्यानंतर तो बाल्डरच्या आंधळ्या भावाला फसवून त्याला गोळी मारतो. दुःखाने, फ्रिगाचे अश्रू मिस्टलेटोवर पडले आणि पांढरे बेरी तयार झाले आणि तेव्हापासून फ्रिगाने घोषित केले की, “प्रत्येकाला आपआपसात शांती निर्माण करावी लागेल आणि मिस्टलेटोच्या झाडाखाली चुंबन घ्यावे लागेल, जरी ते शत्रू असले तरीही.”
मिस्टलेटोच्या झाडाचा संबंध लग्नाशी कसा जोडला जातो.
एका लोककथेनुसार, एकट्या स्त्रियांनी लग्नासाठी योग्य वराला आकर्षित करण्यासाठी त्यांच्या दारावर मिस्टलेटोपासून बनवलेले गोळे टांगत असे. मिस्टलेटोच्या झाडाखाली भेटलेली स्त्री चुंबन नाकारू शकत नाही.
हेही वाचा – Jingle Bell गाणे कसे झाले प्रसिद्ध? काय आहे या गाण्याचा अर्थ; जाणून घ्या त्यामागची रंजक गोष्ट
ख्रिसमस साजरा करण्याच्या विविध परंपरा
- सहसा ख्रिसमसच्या दिवशी ख्रिश्चन लोक त्यांच्या घरी ख्रिसमस ट्री आणतात आणि त्यांची सुंदर सजावट करतात. यासोबतच ते संपूर्ण घर सजवतात. यानिमित्ताने मिस्टलेटोजच्या झाडाची पानेही ठिकठिकाणी टांगली जातात. हिंदू धर्मात अशोकाची पाने टांगली जातात, तसेच ते दिसते. मिस्टलेटो हे प्रेमाचे प्रतीक मानले जाते. लोक ख्रिसमसच्या मध्यरात्री चर्चमध्ये जातात आणि कॅरोल गातात, तसेच एकमेकांसोबत भेटवस्तूंची देवाणघेवाण करतात.
- या सामान्य नियमाव्यतिरिक्त अशीही परंपरा आहे की, ख्रिसमसच्या रात्री मुले गरम दूध आणि कुकीज एका विशिष्ट ठिकाणी ठेवतात. सांता रात्री येईल आणि आपली भेट स्वीकारेल अशी आशा ते बाळगून असतात. ख्रिसमसमध्ये सांताक्लॉजचे महत्त्व आपल्या सर्वांना माहीत आहे. सांताक्लॉज हा चौथ्या शतकातील महान संत होता. लोकांचा असा विश्वास आहे की, सांताक्लॉज उत्तर ध्रुवावर राहतो आणि दरवर्षी ख्रिसमसच्या निमित्ताने अनेक भेटवस्तू आणतो.
- या दिवशी ख्रिश्चन अनुयायी आपली घरे खूप सजवतात. ख्रिसमस ट्रीमध्ये कँडी केन, मिस्टलेटो इ. ठिकठिकाणी दागिने लटकवण्याची परंपरा आहे, रंगीबेरंगी दागिने यामध्ये प्रमुख आहेत.
- ख्रिसमसच्या वेळी एक परंपरा अशी आहे की, लोक त्यांच्या घरात किंवा चर्चमध्ये प्रभु येशू ख्रिस्ताच्या जन्माचे दृश्य पुन्हा तयार करतात. म्हणजेच जोसेफ, मेरी आणि बेबी जीझसच्या पुतळ्याने ते दृश्य जिवंत केले आहे; जिथे एका घरात मेंढ्या, काही भांडी आणि बाळ येशू, जोसफ आणि मेरीसह अनेक देवदूत आहेत. हे लोक अनेक देवदूतांनी वेढलेले आहेत.
- ॲडम आणि इव्हच्या फीस्ट डे प्रदर्शित करण्यासाठी जर्मन लोक या दिवशी मिरवणूक आयोजित करतात. यामध्ये स्वर्गाच्या झाडासोबत (Trees of Heaven) सफरचंद निषिद्ध दाखवण्यात आले आहे. ही कथा सांताक्लॉजशीही जोडलेली आहे. दरवर्षी सांताक्लॉज उत्तर ध्रुवावरून अनेक हरणांनी ओढलेल्या स्लेजवर भेटवस्तू आणतो असे मानले जाते.
काही ठिकाणी ख्रिसमसच्या दिवशी काही तरुण गट तयार करतात आणि घरोघरी जाऊन संगीत वाद्ये वाजवून, गाणी गाऊन आनंद साजरा करतात. - या दिवशी लोक बहुतेक ठिकाणी फ्रूट केकचे वाटप करतात. ख्रिसमसच्या दिवशी लोक एकमेकांशी भेटवस्तूंची देवाणघेवाण तर करतातच, पण गरजूंमध्ये वाटपही करतात. या दिवसासाठी केक, पेस्ट्री आणि कुकीज बनवण्याची तयारी बरेच दिवस सुरू असते.
ख्रिसमस ट्री हे जीवनाच्या अनंतकाळचे प्रतीक मानले जाते. जेव्हा ब्रिटनची राणी व्हिक्टोरियाने प्रिन्स अल्बर्टशी लग्न केले तेव्हा ते प्रसिद्ध झाले.