विमान हा नेहमीच मानवी कल्पकतेचा चमत्कार राहिला आहे; ज्यामुळे तुलनेने कमी कालावधीत मोठे अंतर पार करता येते. विमान प्रवासाचा अनुभव रोमांचक असतो, कारण प्रवास करताना आकाशातून उंच पर्वत रांगा, नदी, समुद्र अशी अनेक दृश्ये पाहायला मिळतात. जितके आपले अनुभव रोमांचक असतात तितकेच काही भागातून विमान उडवणे अवघड असते. आधुनिक विमानांची रचना तीव्र हवामानापासून ते उच्च उंचीपर्यंत विविध आव्हाने हाताळण्यासाठी केली जाते. परंतु, जगात असे काही प्रदेश आहेत, जिथे उड्डाण करणे विशेषतः आव्हानात्मक आहे आणि असेच एक क्षेत्र तिबेटचे पठार आहे. वैमानिक तिबेटच्या पठारावरून विमाने उडवणे का टाळतात? त्यामागील प्रमुख कारणे काय? त्याविषयी जाणून घेऊ.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

तिबेट पठारावरून विमाने का उडत नाही?

तिबेट पठार याला जगाचे छप्पर असे संबोधले जाते. हा मध्य आशियातील एक विस्तीर्ण आणि उंच प्रदेश आहे. हे पठार अंदाजे २.५ दशलक्ष चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेले आहे आणि सरासरी ४,५०० मीटर उंचीवर आहे. सुंदर पठारांनी वेढलेला तिबेट प्राचीन इतिहास आणि सौंदर्यासाठी ओळखला जातो. समुद्रसपाटीपासून त्याची सरासरी उंची फक्त पाच किलोमीटर आहे. पठाराचा आतील भाग सपाट आहे; ज्यामध्ये अंतर्गत निचरा, पर्जन्य आणि कमी धूप दर आहेत. या अद्वितीय भौगोलिक वैशिष्ट्यांमुळे अनेक आव्हाने निर्माण होतात; ज्यामुळे व्यावसायिक विमानांना उड्डाण करणे कठीण होते.

तिबेट पठार याला जगाचे छप्पर असे संबोधले जाते. हा मध्य आशियातील एक विस्तीर्ण आणि उंच प्रदेश आहे. (छायाचित्र-फ्रीपीक/इंडियन एक्सप्रेस)

हेही वाचा : ‘हे’ मशीन ओळखणार तुमच्या मनातलं? त्याचा होईल फायदा की, बसेल फटका?

  • विमाने तिबेट पठारावरून उड्डाण करणे टाळतात, याचे एक प्राथमिक कारण म्हणजे पठाराची उंची. उच्च उंचीचा अर्थ असा की, वरील हवा खूपच पातळ असते, ज्यामुळे विमानाच्या इंजिनच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो. जेट इंजिने कार्यक्षमतेने कार्य करण्यासाठी हवेच्या विशिष्ट घनतेवर अवलंबून असतात आणि अशा उंचीवर कमी झालेल्या ऑक्सिजनच्या पातळीमुळे इंजिनची कार्यक्षमता कमी होऊ शकते. आणीबाणीच्या परिस्थितीला मोठी समस्या निर्माण होऊ शकते, जसे की इंजिनमध्ये बिघाड झाल्यास विमानाला अधिक ऑक्सिजनसह कमी उंचीवर लवकर लँड करावे लागते. अशात ऑक्सिजन कमी असल्यास गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते.
  • आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे हवामान. तिबेटी पठार त्याच्या कठोर आणि अप्रत्याशित हवामानासाठी ओळखले जाते. जोरदार वारे आणि हवामानात अचानक बदल, यामुळे विमानाला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. या प्रदेशात गडगडाटी वादळाचा धोका असतो, जे विमानांसाठी अत्यंत धोकादायक ठरू शकते. या हवामानामुळे वैमानिकांना सुरक्षितपणे नेव्हिगेट करणे कठीण होऊन अपघात होण्याचा धोका वाढतो.
  • तिबेटच्या पठाराचा भूभाग हा आणखी एक प्रमुख चिंतेचा विषय आहे. हा प्रदेश त्याच्या खडबडीत पर्वतांद्वारे वैशिष्ट्यीकृत आहे. जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट तिबेट पठाराच्या सीमेवर आहे. अशा उंच भूभागावरून उड्डाण केल्याने आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ शकते. विमानाला इंजिनमध्ये अडचण किंवा इतर समस्या आल्यास, सुरक्षित लँडिंगसाठी मर्यादित पर्याय रहात नाहीत. प्रदेशात योग्य आपत्कालीन लँडिंग साइट्स नसल्यामुळे जोखीम वाढते.
  • तिबेटच्या पठारावर हवाई वाहतूक नियंत्रण हे आणखी एक आव्हान आहे. हा प्रदेश विरळ लोकवस्तीचा आहे आणि तेथे कमी प्रमाणात विमानतळ आणि हवाई वाहतूक नियंत्रण सुविधा आहेत. यामुळे वैमानिकांना आपत्कालीन परिस्थितीत वेळेवर माहिती आणि मदत मिळणे कठीण होऊ शकते. पायाभूत सुविधांच्या कमतरतेचा अर्थ असा आहे की, तेथे कमी नेव्हिगेशन सहाय्यक आहेत; ज्यामुळे वैमानिकांना या प्रदेशात सुरक्षितपणे नेव्हिगेट करणे कठीण होते.
तिबेटी पठार हे राजकीयदृष्ट्या संवेदनशील भागात स्थित आहे. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)
  • प्रदेशातील भौगोलिक राजकीय परिस्थितीदेखील महत्त्वाची भूमिका बजावते. तिबेटी पठार हे राजकीयदृष्ट्या संवेदनशील भागात स्थित आहे. चीन, भारत आणि इतर अनेक देशांचे या प्रदेशात प्रादेशिक वाद आहेत, त्यामुळे विमानाचे नियोजन आणि राउटिंग क्लिष्ट होऊ शकते. कारण विमान कंपन्यांद्वारे एअरस्पेस नियम आणि निर्बंध नेव्हिगेट करणे आवश्यक आहे. राजकीय तणाव हवाई वाहतूक नियंत्रण सेवांच्या उपलब्धतेवर आणि प्रदेशावरील उड्डाणांसाठी इतर समर्थनांवरदेखील परिणाम करू शकतात.

पठारावरून उड्डाण केले तेव्हा काय घडले?

इतिहासात तिबेटच्या पठारावर उड्डाण करण्याच्या धोक्यांवर प्रकाश टाकणाऱ्या अनेक घटना घडल्या आहेत. उदाहरणार्थ, १९९२ मध्ये चायना एअरलाइन्स फ्लाइट ३५८ या प्रदेशातून उड्डाण करत असताना टरब्यूलन्सची परिस्थिती निर्माण झाली, परिणामी अनेक प्रवासी आणि क्रू सदस्य जखमी झाले. २०२२ मध्ये रशियन निर्मित एमआय-२६ हेलिकॉप्टर या प्रदेशात कोसळले आणि १९ लोक ठार झाले. या घटना तिबेटच्या पठारावरून उड्डाण करण्याशी संबंधित धोके अधोरेखित करतात.

या प्रदेशात उड्डाणांची सुरक्षा सुधारण्यासाठी काही प्रयत्न केले गेले आहेत. विमान तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे विमानांना अधिक उंचीवर आणि अधिक कार्यक्षमतेने उड्डाण करणे शक्य झाले आहे. आधुनिक जेट इंजिने उच्च उंचीवरील पातळ हवा हाताळण्यास अधिक सक्षम आहेत आणि सुधारित हवामान अंदाज आणि नेव्हिगेशन प्रणालींमुळे वैमानिकांना सुरक्षितपणे या प्रदेशात नेव्हिगेट करणे सोपे झाले आहे. परंतु, तिबेटी पठारावरील अतिउंची, कठोर हवामान आणि खडबडीत भूभागाशी संबंधित मूळ जोखमीमुळे ते व्यावसायिक विमान वाहतुकीसाठी एक आव्हानात्मक आणि संभाव्य धोकादायक क्षेत्र आहे.

हेही वाचा : ट्रम्प यांच्या हॉटेलबाहेर स्फोट घडवून आणणारा संशयित ‘PTSD’ने ग्रस्त; काय आहे हा आजार?

अत्यंत उंची, कठोर हवामान, खडबडीत भूप्रदेश, मर्यादित पायाभूत सुविधा आणि भू-राजकीय गुंतागूंत यांचे संयोजन तिबेटच्या पठाराला व्यावसायिक विमान वाहतुकीसाठी एक आव्हानात्मक आणि धोकादायक क्षेत्र करते. तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे या प्रदेशातील उड्डाणांची सुरक्षितता सुधारली आहे, परंतु जेव्हा शक्य असेल तेव्हा विमान कंपन्या तिबेट पठारावरून उड्डाण करणे टाळतात. एअरलाइन्स कंपन्या प्रवासी आणि कर्मचारी यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत आले आहेत, त्यामुळे या पठारावरून उड्डाण करणे टाळले जाते.