निरोगी राहण्यासाठी वेगवेगळी भाज्या, फळं यांचा आहारात समावेश करण्याचा सल्ला डॉक्टर देतात. भाज्या, फळं यांमध्ये शरीराला आवश्यक पोषकतत्त्व आढळतात. ऋतुनुसार उपलब्ध होणाऱ्या पदार्थांचा आपण जेवणात समावेश करतो. पण कोणत्याही हवामानात काही भाज्या, फळं कापली की त्यांचा रंग गडद होत जातो, त्यांचा रंग तपकिरी काळसर होत असल्याचे तुम्हाला जाणवले असेल.

बटाटे, सफरचंद, वांगी यांना कापल्यानंतर त्यांचा रंग तपकिरी किंवा कालसर होऊ लागतो. पण यामागचे कारण अनेकांना माहित नसते. यामागे काय वैज्ञानिक कारण आहे जाणून घ्या.

Orange Peel Theory What is the Orange Peel Theory Why is this theory trending in 2024
Orange Peel Theory : ऑरेंज पील थेअरी काय आहे? २०२४मध्ये का ट्रेंड होत आहे ही थेअरी?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Consuming too many fruits every day can cause various health issues said doctors
तुम्हाला रोज जास्त फळे खाण्याची सवय आहे? मग शरीरावर होऊ शकतो ‘हा’ परिणाम, वाचा तज्ज्ञ काय सांगतात…
Solapur jowar crops loksatta news
सोलापूर : ज्वारीच्या कोठारात यंदा ज्वारीचा पेरा निम्म्यावर, लांबलेल्या पावसाचा परिणाम
Winter special recipe in marathi Eat sweet and sour tomato chutney with jaggery to stay healthy during winters
हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी खा गुळ-टोमॅटोची चटणी; रेसिपी आहे एकदम सोपी
price of potatoes increased up to rs 10 per kg due to supply restrictions from west bengal
उत्तरेत ऐन थंडीत बटाटा तापला; पश्चिम बंगालने राज्याबाहेर बटाटा, कांदा विक्री, वाहतुकीस घातली बंदी
Green chillies from Vidarbha, Green chillies,
विदर्भातील हिरवी मिरची थेट दुबईच्या बाजारात
What fruits should not be eaten before going to bed
झोपण्यापूर्वी कोणती फळे खाऊ नये? वाचा, तज्ज्ञांचा सल्ला

आणखी वाचा: गुडघ्यावर बसून का केलं जात प्रपोज? जाणून घ्या यामागचा रंजक इतिहास

फळं, भाज्या कापल्यानंतर काळी पडण्याचे वैज्ञानिक कारण

बटाटे, सफरचंद, वांगी अशी फळं, भाज्या कापल्यानंतर काळी पडण्यामागे एक वैज्ञानिक क्रिया जबाबदार आहे. ज्याचे नाव इंनझिमॅटिक ब्राउनिंग (Enzymatic Browning) आहे. ज्यामध्ये फळं किंवा भाज्या हवेच्या संपर्कात आल्यानंतर त्यांमध्ये एक रासायनिक बदल घडून येतो, ज्यामुळे त्यांचा रंग गडद तपकिरी किंवा काळा दिसू लागतो.

आणखी वाचा: रेल्वे प्लॅटफॉर्मवर का असते ही पिवळी पट्टी? जाणून घ्या यामागचे महत्त्वपूर्ण कारण

इंनझिमॅटिक ब्राउनिंग म्हणजे काय?
इंनझिमॅटिक ब्राउनिंग ऑक्सीकरणाची प्रतिक्रिया आहे. हवेत ऑक्सिजन असते आणि फळांमध्ये फिनोल व इंजाइम फिनोलस असते. जेव्हा हे हवेतील ऑक्सिजनच्या संपर्कात येते तेव्हा त्यामध्ये रासायनिक बदल घडून येतो. ज्यामुळे फिनोलेज फिनोलला मेलेनिनमध्ये बदलते. यामुळेच फळं किंवा भाज्यांचा रंग बदलून तपकिरी किंवा काळा होतो.

Story img Loader