सुपरमार्केटमध्ये गेल्यानंतर खरेदी केलेल्या वस्तु ठेवण्यासाठी आपल्याला शॉपिंग कार्ट दिले जाते. कितीही मोठे सुपरमार्केट असले तरी सामान घेऊन फिरण्याचा आपल्याला कंटाळा येत नाही, त्याचे कारण म्हणजे हे कार्ट. कार्ट घेऊन कुठेही फिरणे आपल्याला सोपे वाटते. पण तुम्हाला या कार्टच्या डिझाईनबाबत कधी प्रश्न पडलाय का? कार्टमध्ये नेहमी जाळ्या का असतात? ते पूर्णपणे बॉक्सप्रमाणे बंद का बनवण्यात येत नाही? असे प्रश्न तुम्हालाही पडले असतील. यामागे काही कारणं आहेत. कोणती आहेत ती कारणं जाणून घ्या.
शॉपिंग कार्टच्या डिझाईनमागचे कारण
शॉपिंग कार्टमध्ये जाळ्यांची डिझाइन विचारपुर्वक ठरवण्यात आली आहे. जर हे कार्ट पुर्णपणे बंद बनवण्यात आले, तर त्यासाठी जास्त धातूची गरज भासेल. पुर्ण बंद कार्ट बनवले तर धातूमुळे ते जड होईल आणि त्यात सामान भरल्यानंतर ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाणे कठीण होईल. याउलट जाळ्यांमुळे कार्ट हलके वाटते आणि त्याला सहज कुठेही घेऊन जाता येते.
आणखी वाचा: सुपरमार्केटमध्ये खिडक्या का नसतात? यामागचे कारण जाणून तुम्हीही व्हाल चकित
याचे आणखी एक कारण स्वच्छतेशी निगडित आहे. जर कार्ट पुर्ण बंद बनवण्यात आले आणि त्यात दुध, ज्युस अशी पेयं जर चुकून सांडली तर कार्ट स्वच्छ करणे खुप कठीण जाऊ शकते. याउलट जाळ्यांमुळे कार्ट लगेच स्वच्छ करता येते.