Smartphone Charger Color Fact: आजच्या डिजिटल युगात आपण सर्वजण स्मार्टफोनचा (smartphones) मोठ्या प्रमाणात वापर करीत आहोत. स्मार्टफोनमुळे आपल्या जीवनात अनेक बदल दिसून आले.आता या स्मार्टफोन बरोबरच तितकीच महत्त्वाची वस्तू म्हणजे चार्जर. आपल्याला बाजारात अनेक वेगवेगळ्या आकाराचे, वजनाचे किंवा क्षमतेचे मोबाईल चार्जर मिळतात. वेगवेगळ्या स्टाइलचे चार्जरही बाजारात उपलब्ध आहेत. पण तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का? या मोबाईल चार्जरचा रंग पांढरा किंवा काळाचं का असतो? तर दुसरीकडे मोबाईलमध्ये वेगवेगळे कलर ऑप्शन मिळतात. मग कंपन्यांना रंगीबेरंगी चार्जर द्यायला काय अडचण आहे, चला तर जाणून घेऊया या मागच नेमकं कारण काय आहे.
मोबाईलचे चार्जर फक्त दोनच रंगांचेच का असतात?
मोबाईल कंपन्या इतर रंगांचे चार्जर बनवत नाहीत यामागील कारण त्यांचा टिकाऊपणा आणि किंमत आहे. काळा आणि पांढऱ्या रंगांमुळे चार्जरचे आयुष्य वाढते. यामागील आणखी एक कारण म्हणजे इतर रंगांचे चार्जर बनवण्याच्या तुलनेत कंपन्यांना पांढरा आणि काळ्या रंगाचा चार्जर बनवताना कंपन्यांना कमी खर्च येतो.यामुळे मोबाईल कंपन्या लाल-पिवळे किंवा निळे चार्जर बनवत नाहीत.
(हे ही वाचा : Cheapest Laptop Market: भारतातील ‘या’ बाजारात किलोच्या भावाने मिळतात लॅपटॉप! )
पूर्वीचे चार्जर काळ्या रंगाचेच असायचे
काही वर्षांपूर्वी स्मार्टफोनच्या चार्जरचा रंग फक्त काळा होता. काळ्या रंगाचे वैशिष्ट्य म्हणजे, ते उष्णता इतर रंगांपेक्षा चांगले शोषून घेते. तसेच काळा रंग हा एक आदर्श उत्सर्जक (Emiter) देखील मानला जातो. त्याचे उत्सर्जन मूल्य १ आहे. ज्यामुळे चार्जिंग दरम्यान निर्माण होणाऱ्या उष्णतेपासून चार्जरचे संरक्षण होते. कंपनी कोणतीही असो, त्याच्या चार्जरचा रंग तोच राहिला. यामुळे चार्जर बराच काळ टिकले आणि त्यात कोणत्याही प्रकारची अडचण येत नाहीये. चार्जरचा काळा रंग देखील बाहेरील उष्णता चार्जरच्या आत जाण्यापासून रोखतो. दुसरे, कारण हे आहे की काळा सामग्री इतर रंगांपेक्षा स्वस्त आहे. त्यामुळे चार्जर बनवण्याचा खर्चही कमी होतो.
चार्जर आता पांढऱ्या रंगाचेच का आहेत?
आता कंपन्या मोबाईलसोबत अधिक पांढरे चार्जर देत आहेत. पांढरा चार्जर वापरण्याची तीन कारणे आहेत. प्रथम, पांढरा रंग बाह्य उष्णता चार्जरच्या आत प्रवेश करू देत नाही. प्रत्येकाला माहित आहे की, पांढरा रंग अधिक उष्णता ऊर्जा प्रतिबिंबित करतो आणि कमी उष्णता ऊर्जा शोषतो. यामुळे चार्जर कमी तापतो आणि जास्त काळ टिकतो.
काळ्या रंगाच्या चार्जरमध्ये अशीही समस्या आहे की, रात्रीच्या अंधारात तो शोधणे कठीण आहे. पांढऱ्या रंगाचा चार्जर अंधारातही सहज दिसतो. पांढरा रंग देखील सौम्यतेचे प्रतीक आहे आणि जवळजवळ प्रत्येक व्यक्तीला आवडतो. त्यामुळेच आता कंपन्यांनी अधिक पांढर्या रंगाचे चार्जर बनवायला सुरुवात केली आहे.