Toilet interesting fact: तुम्ही अनेकदा खरेदीसाठी किंवा फिरण्यासाठी मॉल मध्ये गेला असाल. यावेळी तुमचे लक्ष त्याठिकाणी असलेल्या टॉयलेटकडे नक्की गेले असेल. मॉलमधील टॉयलेट्स एका खास पद्धतीने बनवलेले आहेत हे तुमच्या लक्षात आले असेल. मॉलमधील दरवाजे खालून उघडे असतात. तुम्ही कधी विचार केला आहे का की हे दरवाजे तळापासून का कापले जातात? वास्तविक, अशा प्रकारे हे दरवाजे डिझाइन करण्यामागे अनेक हेतू आहेत. जाणून घेऊया मॉलमधील दरवाजे उघडे ठेवण्यामागचे नेमके कारण..
‘हे’ छोटे दरवाजे आपत्कालीन परिस्थितीसाठी असतात
टॉयलेट वापरताना एखाद्या व्यक्तीची तब्येत अचानक बिघडली तर त्याला या दरवाज्यांमुळे सहज बाहेर काढता येते. मॉल्समध्ये मुलंही असतात, जर त्यांनी चुकून स्वतःला आतमधून लॉक केले तर कोणत्याही तणावाशिवाय त्यांना या दरवाज्यांमुळे बाहेर काढले जाऊ शकते.
साफसफाईची करण्यात अडचण येत नाही
शॉपिंग मॉल्स, मल्टिप्लेक्स किंवा कोणतीही सार्वजनिक टॉयलेट्स दिवसभर वापरली जातात. अशा स्थितीत साफसफाई करण्यात अडचणी येऊ शकतात. म्हणूनच येथे दरवाजे तळापासून कापले आहेत कारण टॉयलेट नीट पुसला जाऊ शकतो. जेणेकरून टॉयलेट्स स्वच्छ राहतील.
( हे ही वाचा: तुम्हाला टुथपेस्ट ट्युबच्या खाली असलेल्या ‘या’ रंगाचा अर्थ माहित आहे का? नसेल तर एकदा जाणून घ्याच)
लैंगिक चाळे करणाऱ्यांवर आळा बसतो..
काही लोक लैंगिक चाळे करण्यासाठी सार्वजनिक टॉयलेट्सचा वापर करतात. अशा परिस्थितीत जर दारं खालून कापली गेली तर त्या लोकांना प्रायव्हसी मिळणार नाही आणि ते अशी कामे करणार नाहीत.
धूम्रपान करणाऱ्यांसाठी
जर बंद टॉयलेटमध्ये धूम्रपान केले जात असेल तर ते खूप धोकादायक असू शकते. तुम्हाला माहीत आहे की अशा ठिकाणी लोक धूम्रपान करतात. अशा स्थितीत बंद टॉयलेटमधील धूर तुमच्या आरोग्याला हानी पोहोचवू शकतो. जर तुम्ही हे दरवाजे तळापासून कापले तर ही समस्या उद्भवणार नाही.