प्रश्न:
हिवाळ्यात पानगळ का होते?

उत्तर:
हिवाळा (शिशिर ऋतू) सुरू झाला की वातावरणातील तापमान कमी होते. वृक्षांची वाढ मंदावते. पानांमधील हरितद्रव्य कमी होते, प्रकाशसंप्रेषण मंदावते. हरितद्रव्य [क्लोरोफिल]  कमी झाल्यामुळे पिवळ्या रंगाचे  झान्थोफिल्स, नारंगी रंगाचे कॅरेटेनॉइड्स, लाल जांभळ्या रंगाचे अँथोसायनीन इत्यादी रंगद्रव्ये वाढतात. म्हणून पानगळ होताना झाडांच्या पानांच्या रंगामध्ये बदल दिसून येतात. हरितद्रव्य कमी होण्याची सुरुवात पानांच्या देठातील पेशींपासून होते. देठातील या पेशींच्या थरामध्ये सबइरीन आणि लीगनिन स्र्वले जाते. या पदार्थांचा थर ते पान फांदीपासून वेगळे होण्यास मदत करतो. या प्रRियेत वनस्पतीमधील संप्रेरके जसे ऑक्झीन, इथिलीन, व अ‍ॅबसिसिक अ‍ॅसिड  यांच्या महत्त्वाच्या भूमिका असतात. पानझडीच्या वृक्षांमध्ये हिवाळ्यात पानगळ दिसते तर सदाहरित वृक्षांमध्ये सर्व ऋतूत पानगळ दिसते. पानगळीप्रमाणे वनस्पतीमध्ये फुलांची, पिकलेल्या फळांची, काही फांद्यांचीसुद्धा गळती दिसून येते. वसंत ऋतूमध्ये होऊ  घातलेल्या बदलांसाठी पानगळ होते, तर फुलांमध्ये फलनानंतर फळं तयार होताना फुलांच्या पाकळ्या, निदलपुंज इ. ची गळती दिसून येते तसेच फळ पिकल्यानंतर, फांद्यांमध्ये झालेल्या वाईट बदलांमुळे त्यांच्यात गळती दिसते. पानगळीचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे अन्नद्रव्यांची साठवण आणि वसंत ऋतूमध्ये सुरू होणाऱ्या फुलांचा बहर आणि पर्यायाने फळधारणा हा आहे. काही वनस्पतींमध्ये पानगळीनंतर फुले येतात, ती फुले कीटकांना पटकन दिसतात, त्यामुळे अशा वनस्पतींमध्ये कीटकांद्वारे परागीभवन यशस्वीरीत्या पार पडते.

Bigg Boss Marathi Season 5 Fame Jahnavi Killekar Dance on Zara sa jhoom loon main song
Video: ‘बिग बॉस मराठी’ फेम जान्हवी किल्लेकरचा शाहरुख खान आणि काजोलच्या गाण्यावर सुंदर डान्स, पाहा व्हिडीओ
27th Rashibhavishya In Marathi Horoscope Today
27 October Horoscope : अचानक धनलाभ ते‌ वैवाहिक…
nikki tamboli on suraj chavan won bigg boss sympathy card
सूरज चव्हाण सहानुभूतीमुळे बिग बॉस जिंकला, या टीकेवर निक्की तांबोळी म्हणाली, “मी ट्रॉफी उचलली असती तर…”
कल्याणीनगर भागात १९ मे रोजी झालेल्या अपघातात संगणक अभियंता तरुण-तरुणीचा मृत्यू झाला होता
कल्याणीनगर अपघात प्रकरणातील मुलाला दिल्लीतील शिक्षण संस्थेने प्रवेश नाकारला 
aspirants in congress increased in nandurbar district to contest assembly elections
Maharashtra Elections 2024 : नंदुरबार जिल्ह्यात काँग्रेसमध्ये इच्छुकांची संख्या वाढली
Bigg Boss Marathi 5 चा विजेता ठरला? सूरज चव्हाण, अंकिता नव्हे तर ‘हा’ सदस्य मारणार बाजी, ‘तो’ फोटो चर्चेत
shocking video | Three young boys risk their lives at visapur fort lonavala
“निसर्गात खेळा पण निसर्गाशी खेळू नका” एक छोटीशी चुक त्यांचा जीव गमावू शकते, किल्ले विसापूरचा VIDEO पाहून येईल अंगावर काटा
hives pitta skin problem
Health Special: तुम्हालाही पित्ताचा त्रास सतावतोय? कारण, लक्षणे व उपचार सर्व माहिती एका क्लिकवर मिळवा

– डॉ. मनीषा कर्पे (मराठी विज्ञान परिषद, अंबरनाथ विभाग)