आपल्या प्रत्येकालाच निसर्गाच्या सान्निध्यात रहायला आवडते. आजूबाजूला हिरवीगार झाडी बघून मन प्रसन्न होतं. अनेकजण तर प्रसन्न वातावरण रहावं यासाठी घरातच छोट्या छोट्या झाडांची लागवड करतात. पण, अनेकदा आपण हिरव्यागार टवटवीत झाडांना कोमेजलेल बघितलं असेल. अशी कोमेजलेली झाडे कोणालाच बघायला आवडत नाहीत. परंतु, झाडं/वनस्पती का कोमेजतात? याचं कारण तुम्हाला माहिती आहे का? नसेल तर घ्या जाणून

हेही वाचा- आवडत्या व्यक्तीला प्रपोज करताना ‘या’ देशातील मुली शर्टचं दुसरं बटण का मागतात? जाणून घ्या

The unique friendship of a leopard and a deer
“अशी मैत्री कधी पाहिली नसेल…” बिबट्या आणि हरणाची अनोखी मैत्री; VIDEO पाहून व्हाल थक्क
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
sixth mass extinction earth currently experiencing a sixth mass extinction
पृथ्वीवरील बहुतेक जीवसृष्टी नष्ट होण्याच्या मार्गावर? काय सांगतो ‘सहाव्या महाविलोपना’चा सिद्धान्त?
soil making for plants in glass pot
काचपात्रातील बागेसाठी माती तयार करताना…
konkan hapus mango season likely to deley due to prolonged monsoon
लोकशिवार: लांबलेल्या पावसाने ‘आंबा’ही लांबवला
readers comments on Loksatta editorial,
लोकमानस : हीच ‘सप्रेम इच्छा’अनेकांची!
leopard and deer Viral Video
‘नशीब प्रत्येक वेळी साथ देत नाही…’ हरणाची शिकार करण्यासाठी बिबट्या वेगाने धावला; पण पुढे जे घडलं… VIDEO पाहून चुकेल काळजाचा ठोका
white giant squirrel spotted in mahabaleshwar
Video : महाबळेश्वरमध्ये पांढऱ्या शेकरूचे दर्शन !

अनेक वनस्पती पाण्यावर अवलंबून असतात. गरम वातावरणात वनस्पतींमधील पाण्याचे संतुलन बिघडू शकते. गरम वातावरणात झाडांमधील पाणी त्यांच्या पानांच्या लहान छिद्रांद्वारे सतत शोषले जात असते. त्यामुळे अनेक वनस्तपती गळून पडल्यासारख्या वाटतात. पाण्याच्या कमतरतेमुळे वनस्पतींच्या पेशी ताठ राहू शकत नाहीत आणि त्या कोमेजायला लागतात. कोमेजलेल्या वनस्पतींना वेळेवर पाणी दिल्यास त्या पुन्हा टवटवीत होतात. परंतु, त्यांना वेळवर पाणी मिळाले नाही तर त्या पूर्णपणे वाळून जातात.

हेही वाचा- सर्वांत जास्त पाकळ्या असलेलं फुल कोणतं माहितेय? जाणून घ्या निसर्गाची अजब किमया!

वनस्पतींचे अनेक रोगदेखील आहेत. या रोगांना एकत्रितपणे “विल्ट” म्हणून ओळखले जाते. या रोगांमुळे झाडे कोमेजतात आणि त्यांचा रंगही खराब होतो. झाडांवर हे संक्रमण विषाणू, जिवाणू किंवा बुरशीमुळे होऊ शकते. वेळीच उपचार न मिळाल्यास या रोगांमुळे अनेक वनस्पती नष्ट होतात. जर कोमेजलेल्या वनस्पतींना पाणी घालूनही त्या वाढत नसतील तर त्यांना रोगाची लागण झाली असल्याचे समजून घ्यावे. मुख्य करून अन्न पिके वाळलेल्या रोगांना बळी पडतात. परंतु, आता नव्या प्रकारच्या वनस्पतींच्या प्रतिरोधक जाती आणि वाण विकसित करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा- कासवांचं आयुष्य १५० वर्षांपेक्षा जास्त कसं असतं? जगातील सगळ्यात म्हातारे कासव कोणते? घ्या जाणून

काही झाडे विशेषत: शेंगासारख्या वनस्पती रात्रीच्या वेळी कोमेजतात. या प्रकाराला निक्टीनस्टी म्हणून ओळखले जाते. यापैकी बर्‍याच प्रजातींच्या पानांवर पल्विनी नावाच्या रोगाची वाढ होते. या रोगामुळे वनस्पतीची पाने अंधार पडल्यानंतर किंवा तापमानात बदल झाल्यानंतर लगेच कोमेजतात. पल्विनीमधील टर्गर दाब मोठ्या प्रमाणावर रासायनिक फोटोरिसेप्टरद्वारे नियंत्रित केला जातो.