Why Do We Cry In Happiness Or Fight: आपल्या आयुष्यात एखादा दुःखाचा क्षण आला की चटकन डोळ्यातून पाणी येतं. दुःखात अश्रू हे समीकरण तसं कॉमन आहे. पण तुम्हाला कधी हा प्रश्न पडलाय का की एखाद्या अत्यंत सुखाच्या क्षणी किंवा तुम्ही मनसोक्त हसतानाही तुमचे डोळे का पाणावतात? याचं एक साधं कारण म्हणजे अश्रुंचे सुद्धा वेगवेगळे असे तीन प्रकार असतात. या प्रकारानुसारच तुम्हाला वेगवेगळ्या परिस्थितीत रडू येत असतं. आता हे प्रकार नेमके कोणते व आनंदाश्रू येण्यावर त्यांचा कसा प्रभाव पडतो हे आपण सविस्तर जाणून घेऊया..

अश्रुंचे तीन प्रकार कोणते? (Three Types Of Tears)

वैज्ञानिकांच्या मते पाण्याच्या थेंबासारख्या दिसणाऱ्या अश्रुंचे सुद्धा तीन प्रकार असतात. पहिला प्रकार म्हणजे बेसल, दुसरा म्हणजे नॉन-इमोशनल आणि तिसरा म्हणजे क्राइंग अश्रू. नावातून तुम्हाला अंदाज आलाच असेल पण या तीन प्रकारात अश्रूंचे विभाजन केले आहे हे पाहूया..

behavior, offensive, past, someone behavior,
माणसं अशी का वागतात?
10th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
१० सप्टेंबर पंचाग: अनुराधा नक्षत्रात सुखाने भरेल तुमची झोळी! प्रिय व्यक्तीची भेट तर व्यापारात होईल मोठा फायदा; वाचा तुमचे भविष्य
drinking hot lemon water in a copper pot
तांब्याच्या भांड्यात गरम लिंबू पाणी प्यायल्याने विषबाधा होऊ शकते? तज्ज्ञांनी मांडले मत..
Man wrote message for his wife in back of the car video goes viral
किती ते प्रेम! नवऱ्यानं बायकोसाठी कारच्या मागे लिहला खास मेसेज; रस्त्यावर सर्व बघतच राहिले, VIDEO पाहून कराल कौतुक
pradnya daya pawar
‘भय’भूती: भित्यंतराचे कल्लोळ
how to become a loco pilot training to become loco pilot
चौकट मोडताना : हळूहळू सकारात्मक होणारा समाजाचा दृष्टिकोन
childhood, fear, rural life, resilience, thunderstorms, snakes, farming, education, marriage, societal expectations, economic uncertainty
‘भय’भूती : भयकातर हिरवे हुंकार
woman have to fight against atrocities marathi news
आता तूच भेद या अन्यायाच्या भिंती…

१) बेसल अश्रू हे शरीराने डोळ्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी तयार केलेल्या प्रणालीचा एक भाग असतात. बेसल अश्रूच्या थेंबात ९८ टक्के पाणीच असते आणि यामुळे डोळ्यांमध्ये आद्रता आणि ल्युब्रिकेशन टिकून राहण्यास मदत होते. डोळे येणे किंवा धूलिकणांमुळे होणारे संसर्ग टाळण्यासाठी या अश्रूचा वापर होतो.

२) दुसरा प्रकार म्हणजे नॉन- इमोशनल अश्रू, ज्यांचा साहजिकच भाव भावनांशी काहीही संबंध नसतो. साधारणतः कचरा काढताना, स्वच्छता करताना, कांदा चिरताना आपल्या डोळ्यात हे अश्रू येतात. डोळ्यात गेलेला एखादा धुळीचा कण बाहेर टाकण्यासाठी हे अश्रू मदत करतात. कांदा चिरताना उग्र दर्प व संयुगांमुळे सुद्धा असे अश्रू चटकन वाहू लागतात.

३) अश्रूंचा तिसरा प्रकार म्हणजे भावुक झाल्यावर डोळ्यातून येणारे अश्रू यामध्ये पाण्यासह शरीरातील टॉक्सिन्स व स्ट्रेस वाढवणारे हार्मोन्स सुद्धा असतात. हे हार्मोन्स बाहेर पडल्याने तुम्हाला रडल्यावर लगेच काही वेळ अगदी फ्रेश वाटते. शिवाय चटकन झोप सुद्धा लागते.

आनंदात व रागातही डोळ्यातून अश्रू का येतात?

वैज्ञानिकांच्या माहितीनुसार प्रत्येकाच्या मेंदूत एक लिम्बिक सिस्टीम असते ज्यात हाइपॉथेलेमस नावाचा भाग असतो. जेव्हा कोणतीही भावना (आनंद, राग, मत्सर, दुःख) ही उत्कट होते आणि त्याची तीव्रता वाढते तेव्हा मानसिक संतुलनासाठी न्यूरोट्रांसमिटर मेंदूला सिग्नल देतो आणि आपल्या डोळ्यावाटे अश्रू वाहू लागतात. ज्यात वर म्हटल्याप्रमाणे पाण्यासह हार्मोन्स सुद्धा असतात.

हे ही वाचा<< लग्नात नवऱ्याचे शूज/ चप्पल चोरणे ही खरंच परंपरा आहे का? मराठमोळ्या लग्नातही का केलं जातं पालन?

ज्याप्रकारे घाम आल्याने शरीरातील फॅट्स वितळून बाहेर पडण्यास मदत होते, लघवीवाटे शरीरातील घातक व अनावश्यक द्रव पदार्थ बाहेर फेकले जातात त्याप्रमाणे मानसिक व भावनिक संतुलनासाठी रडणे सुद्धा महत्त्वाचे असते