शिंकणे ही अत्यंत नैसर्गिक आणि सामान्य गोष्ट आहे. आपल्या आसपास कोणीही शिंकले की, आपण पटकन “bless you” किंवा “God bless you” (देव तुझ्यावर कृपा करो!”) असे म्हणतो. अगदी अनोळखी व्यक्ती जरी शिंकली तरी नकळतपणे हे शब्द ओठांमधून बाहेर पडतात. ही अशी गोष्ट आहे जी की, आपल्याला लहानपणापासून शिकवली जाते आणि आता मात्र ती आपली सवय झाली आहे. पण, आपण असे का म्हणतो? याचा तुम्ही कधी विचार केला आहे का?

एखादी व्यक्ती शिंकल्यानंतर ‘God Bless You’ म्हणणे हा एक सामाजिक वर्तन शिष्टाचाराचा (Social Behavior Etiquette) एक भाग आहे. फोर्डहॅम विद्यापीठातील इतिहासाचे प्राध्यापक डब्ल्यू डेव्हिड मायर्स यांच्या म्हणण्यानुसार, “ऐतिहासिकदृष्ट्या शिंक येणे हा एक चांगली गोष्ट किंवा देवांचा इशारा मानला जात असे.”

Paaru
Video: “देवीआईंनासुद्धा कळायला पाहिजे…”, पारू अनुष्काचे सत्य अहिल्यादेवीसमोर आणणार? मालिकेत ट्विस्ट, पाहा प्रोमो
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Health tips diet advice from social media influencers can be harmful
तुम्हीही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सचा डाएट सल्ला ऐकत असाल तर सावध व्हा; शरीरावर होऊ शकतो घातक परिणाम
philosophers exploring the good life
तत्त्व-विवेक : सरधोपट जगण्याच्या अल्याडपल्याड…
Nagpur 3 idiot latest news in marathi,
नागपूर : ‘थ्री इडियट’ फेम सोनम वांगचुक म्हणाले, “विकास करतोय याचा अहंकार नको…”
Viral Girl Shravanis New Video
मित्रांची साथ सोडून देण्याचा चिमुकलीने दिला सल्ला; पण ‘ती’ असं का म्हणाली? Viral Video तून बघा
NCP Sharad Pawar Group Politics
NCP : ‘प्रदेशाध्यक्षांसह सर्वांचे राजीनामे घ्या’, शरद पवारांसमोरच कार्यकर्त्याची जयंत पाटलांच्या राजीनाम्याची मागणी, नेमकं काय घडलं?
Rohit Pawar On Ajit Pawar group
Rohit Pawar : अजित पवार गटाकडून शरद पवारांच्या खासदारांना ‘ऑफर’? रोहित पवारांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “अधिवेशन होतं तेव्हा…”

“युरोपियन ख्रिश्चनांसाठी जेव्हा ५९० च्या आसपास आताच्या ख्रिश्चन रोमन साम्राज्याला कमकुवत करणारी पहिली प्लेगची साथ आली होती तेव्हा ‘पोप ग्रेगरी द ग्रेट’चा असा विश्वास होता की, शिंक हे प्लेगचे प्राथमिक लक्षण आहे म्हणून त्याने ख्रिश्चन लोकांना शिंक आल्यानंतर “God bless you” म्हणजेच “तुला देवाचा आशीर्वाद मिळो,” असा प्रतिसाद देण्याची आज्ञा दिली,” असे प्राध्यापक मायर्स यांनी NYT माहिती देताना सांगितले.

हेही वाचा – पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री: तिन्ही पद्म पुरस्कारांमध्ये नेमका फरक काय? जाणून घ्या…

प्राचीन काळी लोकांचा असा विश्वास होता, “शिंकणे ही कृती वाईट आत्म्यांना तुमच्या शरीरात प्रवेश करण्याची परवानगी देते आणि “देव तुम्हाला आशीर्वाद देईल,” असे म्हटल्यास त्या दुष्ट आत्म्यांना दूर ठेवण्यास मदत करते.”

हार्वर्ड मेडिकल स्कूलमधील मनोचिकित्सक ओमर सुलतान हक यांच्या मते, “जरी शिंका येणे ही बाब अचानक घडत असली तरी जेव्हा सामान्य स्पष्टीकरणे नसतात तेव्हा गोष्टी स्पष्ट करण्यासाठी दैवी आशीर्वादासह त्याचा संबंध जोडला जातो. मानवी मनामध्ये धर्म, स्वच्छता व तिरस्काराची भावना खोलवर रुजलेल्या असतात; ज्यामुळे जशा इतर वाईट गोष्टी घडल्यानंतर देवाचा धावा केला जातो त्याचप्रमाणे शिंकल्यानंतर देवाचे आवाहन करणे अधिक सहज शक्य आहे.

“फक्त God bless you असे म्हणणे हे धार्मिक परिणाम कमी करतो किंवा तुमच्या स्वतःचा विश्वास प्रकट करतो,” असे टेंपल युनिव्हर्सिटीतील मानसशास्त्राचे प्राध्यापक फ्रँक फार्ले यांनी सांगितले.

TOI च्या वृत्तानुसार, एखाद्याला शिंकल्यानंतर बरे वाटण्यासाठी सदिच्छा प्रकट करणे हे कदाचित हजारो वर्षांपूर्वी उदभवले असावे. एखादी व्यक्ती शिंकल्यानंतर रोमन लोक Jupiter preserve you (बृहस्पती तुमचे रक्षण करतील) असे म्हणतात ज्याचा अर्थ “तुमचे आरोग्य चांगले राहो”, असा होतो. तसेच ग्रीक लोक एकमेकांना “long life” असे म्हणतात; ज्याचा अर्थ दीर्घायुष्य मिळो, असा होतो.

हेही वाचा – साप वारंवार जीभ का बाहेर काढतात? काय आहे या मागील नेमकं कारण, जाणून घ्या

TOI च्या वृत्तानुसार, याबाबत प्राचीन अंधश्रद्धा अशी आहे, “शिंकण्यामुळे आत्मा नाकातून शरीराच्या बाहेर पडतो.” काहींची अशी अंधश्रद्धा होती, ” शिंक आल्यानंतर दुष्ट आत्मे एखाद्या व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करण्याची संधी म्हणून वापरतात. अशा वेळी “bless you” म्हटल्यास सैतानाला व्यक्तीच्या मुक्त आत्म्याचा ताबा मिळवण्यापासून रोखता येते, असा त्यांचा अंधविश्वास होता.

Story img Loader