Why Do We Show Pinky Finer To Go To Washroom: आपल्याला लहानपणापासून अनेक गोष्टी अंगवळणी पडतात. या गोष्टी व सवयी आपण कधी शिकलो हे आठवतही नाही पण तरीही त्या आपल्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग ठरतात. आयुष्यभर आपणही त्याचे पालन करतो व आपल्याकडून पुढच्या पिढीला सुद्धा या सवयी दिल्या जातात. यातीलच एक सवय म्हणजे जेव्हा आपल्याला वॉशरूमला म्हणजेच लघुशंकेला जायचं असेल तेव्हा आपण करंगळी दाखवतो. शाळेतच अनेकांना बाथरूमला जाण्यासाठी कसे विचारावे हे सांगताना ही सवय लावली जाते. मुळात ही काही जगभरात पाळली जाणारी सवय नाही पण तरीही या करंगळी व लघुशंका या संबंधाशी सर्वच परिचित आहेत. पण आपल्या पाच बोटांपैकी वॉशरूमला जाण्यासाठी नेमकी करंगळीच का दाखवायची हा प्रश्न तुम्हाला पडला आहे का?

इंस्टाग्रामवर @gree_yogabhyas या योगगुरू तरुणीने या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. वॉशरूमला जाण्यासाठी करंगळी दाखवण्याचे कारण म्हणजे आपल्या हाताच्या पाचही बोटांना पंचमहाभूतांचे स्वरूप मानले जाते. यामध्ये हाताचं सर्वात लहान बोट, म्हणजेच करंगळी ही ‘जल’ या तत्वाचं प्रतीक आहे. हाताची करंगळी उंचावून केला जाणारा हा इशारा म्हणजे एका मुद्रेचाच भाग आहे. जिला जल/ वरूण असे या मुद्रेचं नाव आहे.

Govinda father in law refused to attend his wedding with Sunita Ahuja
“माझे आजोबा श्रीमंत, तर वडील…”, गोविंदाच्या लेकीचं वक्तव्य; म्हणाली, “माझी आई शॉर्ट्स घालायची…”
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Tula Shikvin Changalach Dhada akshara is pregnant
अक्षराच्या प्रेग्नन्सीबद्दल अधिपती अनभिज्ञ! भुवनेश्वरी खेळणार मोठा डाव…; ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत पुढे काय घडणार?
Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
pushpa 2 song controversy
चेंगराचेंगरीनंतर ‘पुष्पा २’बद्दल नवा वाद, निर्मात्यांना युट्युबवरून हटवावं लागलं ‘हे’ लोकप्रिय गाणं; कारण काय?
Video of Nagpur Mr Calendar kaka
नागपूरच्या ‘कॅलेंडर’ काकांना तोंडपाठ आहे संपूर्ण कॅलेंडर; अचूक सांगतात माहिती, VIDEO एकदा पाहाच
loksatta editorial on rupee getting weaker day by day against the dollar
अग्रलेख : बबड्या रुपया, कारटा डॉलर
prathamesh parab regret for not getting enough screens
“महाराष्ट्रात स्क्रिन्स मिळत नाहीयेत यापेक्षा दुर्दैव…”, प्रथमेश परबने व्यक्त केली खंत; म्हणाला, “मायबाप प्रेक्षकांपर्यंत…”

ग्रीशा यांनी सांगितले की, मानवी शरीरात ६० ते ७० टक्के पाण्याचा अंश आहे. यामध्ये लाळ, स्पर्म, त्वचेतील आर्द्रता, डोळे, नाक आणि तोंडातील द्रव्याचा समावेश आहे. ही मुद्रा साकारल्याने पाण्याचा अंश टिकून राहण्यास म्हणजेच शरीर हायड्रेटेड राहण्यास मदत होते. याशिवाय थंडीत त्वचेचा रुक्षपणा घालवण्यासाठी तुमच्या इंद्रियांना सक्रिय करण्यासाठी, हार्मोन्सवर नियंत्रण ठेवण्यासाठी व एकूण किडनीसहित शरीराचे आरोग्य जपण्यासाठी या मुद्रेचा फायदा होऊ शकतो.

हे ही वाचा<< ..म्हणून Zudio एवढे स्वस्त कपडे विकतं! वाचून म्हणाल याला बोलतात ‘डोकं’

वॉशरूमला जाताना करंगळीच का दाखवतात?

हे ही वाचा<< जीन्सच्या छोट्या खिशात पेन्शन.. माजी निवडणूक आयुक्तांचं ट्वीट चर्चेत, तुम्हाला माहित आहे खिशाचं खरं कारण?

कशी साकारावी ही मुद्रा?

मांडी घालून बसा. पाठीचा कणा ताठ ठेवा. आता अंगठा आणि करंगळी एकत्र आणत मधली तिन्ही बोटं सरळ ठेवा. १५ ते २० मिनिटं याच मुद्रेत राहा.
gree_yogabhyas या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून देण्यात आलेल्या माहितीनुसार सर्दी, थंडीचा त्रास असणाऱ्यांनी ही मुद्रा करु नये.

Story img Loader