Why Passengers Always Board Planes From Left Side : तुम्ही विमानाने प्रवास करत असाल तेव्हा विविध गोष्टींचं निरिक्षण करत असाल. पहिल्यांदाच विमान प्रवास करणाऱ्यांसाठी तर विमान प्रवास स्वप्नवत असतो. अनेक प्रश्न डोक्यात असतात. त्यामुळे विमानतळावर पोहोचण्यापासून इच्छित स्थळी उतरण्यापर्यंत सर्वच बाबींकडे जाणीवपूर्वक लक्ष दिलं जातं. पण विमान प्रवासाबाबात काही प्रश्नां’ची उत्तरे नियमित विमान प्रवास करणाऱ्यांना ठाऊक नसतात. त्यातील एक प्रश्न म्हणजे विमानात प्रवासी कायम डाव्या बाजूनेच का प्रवेश करतात? यामागचं गंमतीशीर आणि प्राचीन उत्तर Dougie Sharpe यांनी दिलं आहे. एनडीटीव्हीने यासंदर्भातील माहिती दिली आहे.
Dougie Sharpe हे एक कंटेट क्रिएटर असून जगभरातील मनोजरंक तथ्ये शेअर करण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. याबाबत ते म्हणाले, “नेहमी डाव्या बाजूने विमानातून प्रवासी चढतात-उतरतात यामागे प्राचीन कारण आहे. माणूस जेव्हापासून बोटीने प्रवास करू लागला तेव्हाचा हा संदर्भ आहे. प्राचीन काळी जहाजांच्या डाव्या बाजूचा वापर माल आणि प्रवाशांना चढवण्या-उतरवण्याकरता केला जात असे.”
डाव्या बाजूने बोर्डिंग तर उजव्या बाजूला स्टारबोर्ड
“यामुळे तार्किक गोष्टी सोप्या झाल्या. जहजांना जगभरातील बंदर ते बंदर असा प्रवास करण्यास अनुमती मिळाली. नेहमी उपकरणे उजव्या बाजूला ठेवण्याची प्रथा झाली. यामुळे डावीकडील बाजू जहाजाची बंदर बाजू आणि उजवी बाजू स्टारबोर्ड बनली. यामुळे सुसंगत पोर्ट बांधण्यात सहजता आली. ही परंपरा आधुनिक विमानचालनापर्यंत पोहोचली.
जहाजातील बोर्डिंग प्रक्रिया विमानातही
जसजसे तंत्रज्ञान प्रगत झाले आणि हवाई प्रवास सामान्य झाला, तसे अभियंत्यांनी विमानांसाठी ही संकल्पना स्वीकारली. प्रत्येक विमानतळ आणि विमान असे डिझाइन केले होते की प्रवासी नेहमी डाव्या बाजूने चढतील असंही शार्प म्हणाले.
एव्हिएशन तज्ज्ञांनीही या दाव्याला पुष्टी दिली. एव्हिएशन हिस्टोरिअनचे व्यवस्थापकीय संपादक मायकेल ओकले यांनी एएफएआर मीडियाला सांगितले की, “ही अनेक विमानचालन पद्धतींपैकी एक पद्धत आहे, जी जहाज चलनाच्या परंपरेपासून चालत आली आहे.” ओकले यांनी स्पष्ट केले की विमान वाहतूक शब्दावलीची मुळे सागरी भाषेत आहेत. त्यामुळे बोर्डिंग प्रक्रियाही त्याला अपवाद नाही. “जशी बोटी आणि जहाजांना बंदराची बाजू असते, त्याचप्रमाणे विमानेही त्याच तत्त्वाचे पालन करतात. लोकांनी समंजसपणे बंदराच्या दिशेने (किंवा डावीकडे) बोर्डिंग सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला.”