आपल्यातील बहुतेक जणांनी विमानामधून प्रवास केला असेल, विमानामध्ये प्रवास करण्याची मज्जा काही वेगळीच असते, पण पहिल्यांदाच या विमानामधून प्रवास करणाऱ्या लोकांसाठी विमान प्रवास हा तेवढाच भीतीदायक असतो. विमानाचा प्रवास हा अनेकांसाठी आता सोयीचा झाला आहे. कारण यामुळे लोकांचा वेळ वाचतो. फक्त हा थोडा खर्चिक आहे, ज्यामुळे तो सर्वांच्याच खिशाला परवडणारा नसतो. पण असं असलं तरी देखील आता सध्याच्या काळात विमानाने प्रवास करणाऱ्या लोकांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की बहुतांश लोकांनी एकदा तरी विमानातून प्रवास केला असावा. पण तरीही विमानातील काही छोट्या छोट्या गोष्टींचा उपयोग कदाचीत तुम्हाला माहित नसेल चला तर जाणून घेऊया.
विमानामधील खिडक्या ह्या गोल असतात आणि पूर्णपणे झाकलेल्या असतात. पण जर तुम्ही कधी विमानाच्या खिडक्यांच्या बाजूला बसला असाल, तर तुम्ही पाहिले असेल की, त्या खिडक्यांच्या खाली एक छोटेसे छिद्र असते.कदाचित तुम्ही कधी याकडे बारकाईने लक्ष दिले नसेल, पण तिथे छिद्र असते आणि ज्यांनी ते पाहिले असेल, त्यांचा डोक्यामध्ये नक्कीच असा प्रश्न निर्माण झाला असेल की, हे छिद्र इथे कशाला आहे ? याचा उपयोग तरी काय ? त्यावेळी तुम्ही वेगवेगळे तर्क लावले असतील. पण खरे कारण कदाचित तुम्हाला माहित नसेल. चला तर मग जाणून घेऊया या छिद्राबद्दल काही महत्त्वपूर्ण माहिती.
“ब्लीड होल” म्हणजे काय? –
विमान उडत असताना बाहेरचं प्रेशर आत जाणवू नये म्हणून खिडक्या दरवाजे घट्ट बंद ठेवले जातात. पण मग असं असलं तरी विमानांच्या खिडक्यांना असं लहान छिद्र का दिलं जातं? व्यावसायिक फ्लाइटच्या (कमर्शियल फ्लाइट) खिडक्यांना एक लहान छिद्र दिला जातो. या छिद्राला ‘ब्लीड होल’ म्हणतात. याला “ब्लीड होल” का म्हणतात. केबिनच्या आतून विमानाच्या खिडक्यांवर जो दबाव टाकला जातो, हा दबाव नियंत्रित करण्यास या छिद्राची मदत होते. बहुतेक व्यावसायिक विमानांच्या खिडक्या काचेच्या बाह्य, मध्य आणि आतील थरांनी बनलेल्या असतात. या प्रकरणात, प्रवाशांचे संरक्षण करताना खिडकीच्या बाहेरील स्तरावर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे खिडकीची बाहेरची काच आधी फुटते. जे सहसा ऍक्रेलिकचे बनलेले असतात.
हेही वाचा – रेल्वे ट्रॅकजवळील बोर्डवर ‘W/L आणि सी/फा’ असे का लिहिलेले असते? जाणून घ्या याचा अर्थ
म्हणून विमानातील हवेचा दाब हा बाहेरील हवेच्या दाबापेक्षा जास्त असावा
विमानात राखण्यात येणारा जास्त हवेचा दाब हा प्रवाश्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने जरी गरजेचा असला तरी मात्र तो उंचावर उडणाऱ्या विमानासाठी म्हणावा तितका सुरक्षित नसतो. म्हणूनच बाहेरील आणि विमानातील एका विशिष्ट प्रमाणात हवेचा संतुलित दाब राखावा म्हणून विमानाच्या खिडकीवर ती लहान लहान छिद्रे असतात. या लहान लहान छिद्रांना ब्लीड होल्स म्हणतात, हे छिद्र विमानाला सुरक्षित ठेवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात.