Why Milk Overflow When Boiled: दूध उकळल्यावर भांड्यातून बाहेर का पडतं? याचा कधी तुम्ही विचार केला आहे का? तर पाण्याच्या बाबतीत बघायला गेलं तर असं काही होत नाही. पाणी जेव्हा उकळते तेव्हा भांड्याच्या बाहेर पडत नाही. असं का होत? आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की कशाप्रकारे यामागे एक वैज्ञानिक कारण आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आपल्या दैनंदिन जीवनात अशा अनेक गोष्टी घडत असतात. आपण त्या पाहतो पण त्यांचे कारण आपल्याला माहीत नसते. दूध उकळणे हे देखील यापैकीच एक आहे. दुधाला उकळी आली की ते पातेल्याबाहेर पडते. पण पाण्याच्या बाबतीत याउलट होते. पाणी उकळत आले की ते भांड्यांमध्येच उकळत राहते. दुधाला आणि पाण्याला उकळी येते त्यावेळी एक प्रकारची वैज्ञानिक प्रक्रिया घडत असते. चला तर मग जाणून घेऊ…

दुधामध्ये चरबी, प्रथिने, कार्बोहायड्रेट, जीवनसत्त्वे आणि अनेक प्रकारची खनिजे असतात. दुधात प्रामुख्याने चरबीचे रेणू असतात आणि कॅसिनचे रेणू प्रथिनांच्या स्वरूपात आढळतात. दुधात ८७ टक्के पाणी, ४ टक्के प्रथिने, ५ टक्के लॅक्टोज असते. दुधात भरपूर पाणी असल्याने ते गरम केल्यावर वाफेत बदलू लागते. त्यामुळे चरबी, प्रथिने, कर्बोदके, जीवनसत्त्वे आणि अनेक प्रकारची खनिजे घट्ट होऊ लागतात.

( हे ही वाचा: मॉल मधील टॉयलेटचा दरवाजा खालून उघडा का असतो? यामागील कारण जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल)

‘हे’ आहे दूध उकळण्याचे कारण..

वास्तविक दुधात आढळणारे फॅट, प्रथिने, कर्बोदके, जीवनसत्त्वे आणि खनिजे हे वजनाने हलके असतात, त्यामुळे ते दूध गरम होताच वर तरंगू लागते. त्यामुळे जास्त पाणी तळाशी राहते. या पाण्याची हळू हळू वाफ होते. पण फॅट, प्रथिने आणि इतर गोष्टींचा वर असलेला थर वाफेला बाहेर पडू देत नाही. पण असं म्हणतात ना ज्याची संख्या जास्त असते तोच प्रबळ असतो. म्हणूनच पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे पाणी आपल्या मार्गावरून वरचा थर काढून वाफ बाहेर काढते. या प्रक्रियेत भांड्यातून वरचा थर बाहेर येतो आणि उरलेले दूध भांड्यातच उकळत राहते.

पाणी उकळल्यावर भांड्याबाहेर का येत नाही? ( Why Water Does Not Overflow While Boiling)

पाण्यात असलेले फॅट, प्रथिने, कार्बोहायड्रेट, जीवनसत्व नसतात. त्यामुळे पाण्यावर कोणताही थर तयार होत नाही. त्यामुळे वाफ बाहेर पडण्यासाठी जागा उपलब्ध असते. उकळत्या पाण्यात वाफ बाहेर येण्यास कोणताही अडथळा नसल्यामुळे ती भांड्यातच उकळत राहते आणि पाणी भांड्याबाहेर पडत नाही.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why does milk overflow when boiled but water not know scientific reason behind it gps